एक्स्प्लोर

अस्सल माणूस म्हणून जगलेला नेता

अटलबिहारी वाजपेयी जसं बोलले तसंच जगले... आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला...अटलजी आपल्यात नसतील...तरीही त्यांचे शब्द मात्र मनाला कायमच उभारी देत राहतील...माणसानं मृत्यूला न घाबरता माणसासारखं जिवंत जीवन कसं जगावं ते सांगत...

कौरव कौन कौन पांडव टेढ़ा सवाल है। दोनों और शकुनि  का फैला कूटजाल है। धर्मराज ने छोड़ी नहीं जुए की लत है। हर पंचायत में पांचाली अपमानित है। बिना कृष्ण के आज महाभारत होना है, कोई राजा बने, रंक को तो रोना है। मुद्दामच संपूर्ण कवितेनं सुरुवात. लक्षपूर्वक वाचा. नव्हे तुम्ही वाचली असेलच. फारशी लांब नाही. मात्र कमी शब्दांमध्ये गहन अर्थ सामावलेली. सामान्यांच्या कालातीत व्यथा-वेदनांना शब्दरुप प्राप्त करुन देणारी. वास्तवाशी अव्यभिचारी इमान राखणारी. ‘माणूस’ राजकारणी खरंतर फक्त साहित्यिक असणाऱ्या संवेदनशील माणसानं हे शब्द गुंफले असते तर समजण्यासारखं होतं. मात्र राजकीय नेता असणारा एखादा माणूस वर्तमान राजकारणाचे वस्त्रहरण सरळस्पष्ट शब्दात करतो तेव्हा तो राजकारणात असूनही माणूसपण जपणारा संवेदनशील सह्रद्य माणूसच असू शकतो. आणि आपल्या देशात ही सारी माणुसकीची लक्षणं अविभाज्य आहेत असं ज्यांचं जीवन असे एकमेव राजकारणी म्हणजे फक्त आणि फक्त अटलबिहारी वाजपेयीच. संघमार्ग अटलबिहारी वाजपेयी मूळ ग्वाल्हेरचे. ग्वाल्हेरमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी कानपूरला एम.ए.ची पदवी मिळवली. ग्वाल्हेरच्या आर्यकुमारसभेच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रवेश केला. १९४४मध्ये सरचिटणीसपदापर्यंत मजल मारली. याच दरम्यान १९३९मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. १९४० ते १९४४ संघाच्या प्रशिक्षण वर्गांमधील यशस्वी सहभागानंतर देशाला स्वातंत्र्य मिळत असताना ते १९४७मध्ये संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक बनलेत. पत्रकारिता संघाने त्यांच्यावर उत्तरप्रदेशाची जबाबदारी सोपवली. साहित्यिक वाजपेयी पत्रकारही होते. त्यांनी दीनदयाल उपाध्यायांसोबत राष्ट्रधर्म, पांचजन्य, स्वेदश. वीर अर्जून या नियतकालिकांची जबाबदारी सांभाळली. ते चांगले कवी म्हणून ओळखले जातात. ते राजकीय नेते असले तरी त्यांचे जीवन हे काव्यमयच. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यातील भावना शब्दांद्वारे कवितांच्या रुपाने व्यक्त होत राहिला. निर्धाराचा प्रवास स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात फक्त काँग्रेस आणि काँग्रेसचाच प्रभाव होता. नव्याने स्थापन झालेल्या भारतीय जनसंघाचे  १९५६ च्या लोकसभेत फक्त चार खासदार होते. त्यापैकी एक अटलबिहारी वाजपेयी. त्यांना शपथ देताना तत्कालिन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन म्हणाले. हा भारतीय जनसंघ काय आहे? मी यापूर्वी या पक्षाचे नावही ऐकलेले नाही. वाजपेयी काहीच बोलले नाही. त्यांच्या मनात एक निर्धार मात्र ठाम झाला असावा... बाधाएँ आती हैं आएँ घिरें प्रलय की घोर घटाएँ, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएँ, निज हाथों में हँसते-हँसते, आग लगाकर जलना होगा। क़दम मिलाकर चलना होगा। पुढे वाजपेयी राजकीय जीवनात पुढेच जात राहिले.  इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तेव्हा राजकारण बाजूला सारत वाजपेयींनी त्यांना पक्षभेद विसरुन साथ दिली. आता पक्ष वेगळे नाहीत. देश हा एकच पक्ष, असं त्यावेळी वाजपेयी म्हणाले. मात्र त्याच इंदिरा गांधींनी देशावर आणिबाणी लादून स्वातंत्र्य हिरावून घेतले तेव्हा तेच वाजपेयी संघर्षाला उभे ठाकले. सत्य का संघर्ष सत्ता से न्याय लड़ता निरंकुशता से अंधेरे ने दी चुनौती है किरण अंतिम अस्त होती है दाँव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते त्यांच्या या ताठ कण्याच्या लढवय्या बाण्यामुळे त्यांना गजाआडही जावे लागले. पुढे आणिबाणी सरली. निवडणुका झाल्या. जनता पार्टी सत्तेवर आली. मोरारजी देसाई मंत्रिमंडळात वाजपेयी मंत्रीही झाले. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेले हिंदीतील भाषण गाजले. जास्त काही न बोलता आपल्या भाषेला जागतिक मान्यता मिळवून देण्याचे त्यांचे हे कौशल्य सलाम करावा असेच. कवीह्रदय पण वज्राहून कठोरही पुढे त्यांच्या राजकीय प्रवासात एक टप्पा आला तो १९८४च्या पराभवाचा. त्यानंतर ते सावरले १९८६मध्ये राज्यसभेत गेले. १९९४च्या दरम्यान नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांना सरकारने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठवले. तेथे पाकिस्तानच्या प्रतिनिधीने काश्मीरशिवाय पाकिस्तानचे अस्तित्वच नसल्याचे उद्दामपणे सांगताच, पाकिस्तानशिवाय भारताचेही अस्तित्व पूर्ण नसल्याचे ठणकावले ते वाजपेयींनीच. देशाविषयीच्या त्यांच्या भावना या प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटाव्या अशाच... भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है। इसका कंकर-कंकर शंकर है, इसका बिन्दु-बिन्दु गंगाजल है। हम जियेंगे तो इसके लिये मरेंगे तो इसके लिये। तीनवेळा पंतप्रधान १९९६मध्ये त्यांना पंतप्रधानपदाची पहिली संधी लाभली. मात्र पंतप्रधानपद टिकले ते फक्त १३ दिवस. बहुमत जुळताना दिसले नाही तर ते धिरोदात्तपणे संसदेला सामोरे गेले. आपली भूमिका मांडणारे भाषण केले आणि थेट राष्ट्रपतींकडे जाऊन पदत्याग केला. त्यानंतर १९९८मध्ये पुन्हा ते पंतप्रधान झाले. त्यांच्या या कारकीर्दीत अणुचाचणी करण्याची हिंमत भारताने दाखवली. अमेरिकेसह सर्व जगाच्या नाकावर टिच्चून. १९९९मध्ये ते पुन्हा पंतप्रधान झाले. पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणारे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान ठरले. वाजपेयी नऊवेळा लोकसभेचे सदस्य तर दोन वेळा राज्यसभेत होते. पंतप्रधानपदाची जबाबदारीही त्यांनी तीनवेळा सांभाळली. २००४ची निवडणूक मात्र त्यांचा भारतीय जनता पक्ष हरला. शायनिंग इंडियाची प्रचारमोहीम भाजपाच्या राजकारणासाठी अंधकारमय ठरली. अणुशक्तिमान अकरा आणि तेरा मे रोजी पाच भूमिगत परमाणू परीक्षण स्फोट घडवून वाजपेयींनी देशाला परणाणुशक्तीसंपन्न देश घोषीत केले. त्याचबरोबर दिल्ली – लाहोर बससेवा, स्वर्णिम चतुर्भुज परियोजना, कावेरी जल विवाद मार्ग काढला, विमानतळांचा विकास, आर्थिक सल्लागार समिती, व्यापार एवं उद्योग समिती, राष्टीय सुरक्षा समिती, केन्द्रीय विद्युत नियामक आयोग, सॉफ्टवेयर विकासासाठी सूचना एवं प्रौद्योगिकी कार्यदल, आदिंची स्थापना करुन त्यांनी देशाच्या विकासाला एक दिशा दिली. तीन वर्षांपूर्वी शेवटचे छायाचित्र एकीकडे राजकारणात संकटे येत असतानाच दुसरीकडे त्यांच्या स्वत:च्या जीवनातही अडचणी सुरु झाल्या. पंतप्रधानपदी असतानाच त्यांच्या प्रकृतीने साथ सोडण्यास सुरुवात केली होती. डायमेल्सिया या विकाराने ग्रासलेल्या वाजपेयींना 2015 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तत्कालिन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी त्यांना भारतरत्न प्रदान करत असतानाचे त्यांचे छायाचित्र हे सार्वजनिक जीवनातील शेवटचे छायाचित्र ठरले. त्यानंतर सातत्याने त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता कराव्या अशाच बातम्या येत राहिल्या. वैयक्तिक जीवनात त्यांनी लग्नही केले नाही. एकटेच जगले. आजन्म अविवाहित राहिले.  त्यांनी दत्तक घेतलेली लेक.  तिच्याव्यतिरिक्त त्यांच्या जीवनात सारे काही देशासाठीच घडत राहिले. एकीकडे भारतरत्न सारखा देशातील सर्वोच्च सन्मान राष्ट्रपती थेट घरी येऊन प्रदान करत असतानाच दुसरीकडे वाजपेयींची तब्येत कमालीची खालावली. कोमल ह्यदयाच्या कवीमनातील भाव अखेरच्या संघर्ष काळात अभिव्यक्त होत नसले तरी ते त्यांच्याच शब्दात सांगायचं तर... ठन गई! मौत से ठन गई!  जूझने का मेरा इरादा न था आज झकझोरता तेज़ तूफ़ान है नाव भँवरों की बाँहों में मेहमान है।  पार पाने का क़ायम मगर हौसला देख तेवर तूफ़ाँ का, तेवरी तन गई।    असेच असावेत... अटलबिहारी वाजपेयी जसं बोलले तसंच जगले...आज दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला...अटलजी आपल्यात नसतील...तरीही त्यांचे शब्द मात्र मनाला कायमच उभारी देत राहतील...माणसानं मृत्यूला न घाबरता माणसासारखं जिवंत जीवन कसं जगावं ते सांगत... "मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ, लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?  तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ, सामने वार कर फिर मुझे आज़मा।  मौत से बेख़बर, ज़िन्दगी का सफ़र, शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर।"    - तुळशीदास भोईटे
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Ramayana : 'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPm Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, योगी आदित्यनाथदेखील उपस्थित : ABP MajhaSunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होतीRam  kadam On Ghatkopar Hording  :  राम कदमांकडून भावेश भिडेंचा ठाकरेसोबतचा फोटो ट्विट : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Ramayana : 'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
Aishwarya Divorce :  प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
South Movies : 'या' महिन्याच्या शेवटी   6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
'या' महिन्याच्या शेवटी 6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिंडेसोबतचा फोटो ट्विट
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिंडेसोबतचा फोटो ट्विट
Embed widget