Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
मुख्यमंत्र्यांनी जी संपलेली कुटुंबे उभा केली त्या कुटुंबांनी देवेंद्रजींची केलेली बेईमानी .. त्यांनी टाकलेल्या शब्दाची केलेली अवहेलना याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे मतदान करून त्यांची जागा दाखवा असे आवाहन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांचे नाव न घेता केले. सोलापूर विधान परिषदेचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांच्या प्रचारासाठी माळशिरस येथे बोलवलेल्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या मेळाव्यात रात्री गोरे यांनी मोहिते पाटलांना इशारा देत जोरदार टोलेबाजी केली. यावेळी उमेदवार राजेंद्र राऊत आमदार समाधान आवताडे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार माजी आमदार राम सातपुते यांचे सह अकलूज श्रीपुर महाळुंग नातेपुते आणि माळशिरस नगरपंचायत चे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.. आपल्यावर होत असलेल्या टीके बद्दल बोलताना काहीजणे म्हणतात की जिल्हा गोऱ्याच्या ताब्यात देता का .. पण मी आज सांगतो मी फक्त येथील जनता आणि नेत्यांचा पोस्टमन असून तुम्ही जी मते माझ्याकडे म्हणजे पोस्टात टाकता ती मी सरकारकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे पोच करतो .. त्यानंतर त्यांच्याकडून येणाऱ्या आदेशाचे पालन करतो .. मग त्यात कोणाचा कार्यक्रम करायचा असो किंवा कोणाला कार्यक्रमाला लावायच्या सूचना असो त्या सर्वांचे मी तंतोतंत पालन करतो अशा शब्दात मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला ..
सोलापूर विधान परिषदेमध्ये साडे 68% मत ही भाजपच्या चिन्हावर निवडून आलेली आहेत तर 22 टक्याच्या मध्ये बहुतांश मतेही आमच्या मित्रपक्ष आणि सहकाऱ्यांची आहेत ..विरोधकांकडे फक्त पाच ते दहा टक्के मते असताना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन आपण सर्वांना केल होते. मात्र काहींना अस्तित्व टिकविण्यासाठी ही निवडणूक लादायची होती आणि यात बळीचा बकरा वसंत राव देशमुख यांना करण्यात आल्याचा टोला लगावला.






















