एक्स्प्लोर
पाण्याची किंमत!
आता फक्त एवढंच सांगायचं होतं की आपल्या हातातनं वेळ निघून गेलेली असली तरी आपण आपलं उद्याचं पाण्याविना तडपणं, आजच्या कष्टाने वाचवू शकतो एवढी वेळ मात्र नक्कीच आपल्या हातात अजूनही शिल्लक आहे.
सोसायटीला एक ते दोन दिवसाला साधारण 5 लाख लिटर पाणी लागतं.
महानगरपालिकेकडून पाणी येतं फक्त 30 हजार लिटर.
म्हणजे 4 लाख 70 हजार लिटर पाण्याचा शॉर्टफॉल.
...ही कमी पडलेल्या पाण्याची गरज कशी भागवली जाते??
तर सोसायटीतल्या 26 बोअरवेलसनं आजवर दिलेलं भरमसाठ पाणी. अन हे गेल्या वर्षीपर्यंत कसं तरी चाललं.
पण आता यावर्षी यातले सध्या जवळजवळ सगळे बोअरवेल कोरडे पडलेत. अन काही फक्त 5 ते 10 मिनिटे चालतात.
(बोअरवेल कोरडे का पडले????
तर त्याचं 'अति' सोपं उत्तर आहे,
------- पाणी हा Finite सोर्स आहे.)
(Finite - बोल्ड, रेड विथ अंडरलाईन,
कारण आपल्याला हे Finiteच अजून नीट समजलेलं नाही.)
मग बोअरवेल कोरडे पडल्यामुळे, हे उरलेलं 4 लाख 70 हजार लिटर शॉर्टफॉल पाणी कसं मिळवलं जातं?
तर नाईलाजानं बाहेरून टँकर विकत घ्यायचे-जे आज सगळेच करतायत. कारण दुसरा मार्ग नाही. मागच्या महिन्यापर्यंत बोअरवेल थोडे बहुत चालत असल्याने उरलेल्या पाण्यासाठी रोज 9 टँकर लागायचे , तर आता मात्र लागतात 25 ते 26 टँकर्स डेली. एक टँकर सरासरी 1000 रुपयांचा.
म्हणजे "रोज" -- पाव लाख रुपयांचं पाणी आम्ही विकत घेतोय.
(थोडक्यात देश म्हणून आपल्यावर अरब देशांसारखं पाणी विकत घ्यायची वेळ already आलीय. त्यांना तेलाचे साठे तरी आहेत अन फक्त पाणी विकत घ्यावं लागतंय. आपल्याला तर तेल अन पाणी दोन्ही विकत घ्यावं लागतंय.)
सोसायटीसाठी जेव्हा 9 टँकर लागायचे तेव्हा हिशोब केला होता तर तो आला होता 12 जूनपर्यंत आम्हाला जवळजवळ 1380 टँकर लागणार होते.
--ज्याची किंमत आहे 14 लाख रुपये.
तो रोज 9च टँकर लागतील हा हिशोब इतका - इतका - इतका चुकीचा होता की 12 जून पर्यंत जेवढ्या टँकरची संख्या आम्हाला लागणार होती --- ती परवाच म्हणजे 1 मे लाच पूर्ण झालीय. म्हणजे जेवढं पाणी 12 जूनपर्यंत लागायला हवं होतं तेवढं 1 मे ला म्हणजे दिड महिना आधीच संपलंय. दुष्काळाची तीव्रता फक्त खेड्यात नाही, हे अधोरेखित.
आता,
अजून दिड महिने आम्हाला पाणी विकत घ्यावं लागेल. म्हणजे हा 14 लाखाचा आकडा पोचणार आहे जवळ जवळ 25 लाखांपर्यंत.
तुम्हाला विश्वास बसो अथवा न बसो... म्हणजे फक्त या जानेवारी ते जून पर्यंत आम्ही "पाव कोटी" पेक्षा जास्त रुपयांचं पाणी विकत घेतोय.
अन
हे अजूनच भयानक होतंय कारण...
सध्या पुण्यातल्या अनेक सोसायटीज मध्ये exact हीच स्थिती आहे.
पुणे आणि PCMC मिळून जवळपास 35 हजार सोसायटीज आहेत, पैकी "कमीतकमी" फक्त 5 ते 6 टक्के सोसायटीज मध्ये ही पाण्याची अडचण आहे असं मानलं,
तर
सरासरी 15 लाख एका सोसायटीला * 2100 सोसायटी = 3 अब्ज 15 कोटी रुपयांचं पाणी फक्त पुणे विकत घेणार आहे या 5 ते 6 महिन्यात.
3 अब्ज 15 कोटी.
आता हा पाण्याचा हिशोब- पैशात सांगायचं कारण एवढंच की, आपल्याला पैशाच्या स्वरुपात एखादी गोष्ट समोर आली तरच ती समजते. नाहीतर नाही.
म्हणजे शेतात किंवा घरावर 2000 रुपयांच्या गुलाबी नोटा आकाशातनं पडल्या तर आपण त्या गोळा करायला वेड्यासारखं धावू , पण हेच लाखो-करोडो रुपयांचं पाणी शेतातनं किंवा आपल्या घरावरनं कित्येक वर्षे सपशेल "वाहून" अक्षरक्ष: गटारीत जातंय त्याची मात्र आपल्याला 'काडीचीही' किंमत नाहीये, हे सत्य कोणी नाकारु शकेल काय?
आता...
काही तथ्य:
१. पुणे आपल्या राज्यातला सर्वात जास्त पाऊस पडतो त्यापैकी एक ठिकाण आहे.
२. पुण्याच्या कडेने 7 धरणं आहेत.
३. पुणे देशातलं रेन वॉटर हार्वेस्टिंग कम्पलसरी करणारं जवळजवळ पहिलं शहर आहे.
४. पुण्यात गेल्या वर्षीही सरासरीएवढाच पाऊस पडला होता. म्हणजे अगदीच कमी झालता असं अजिबात नाही,
तरीही,
पुण्यात आज ही वाईट स्थिती आहे.
आता
तुमचं काय??
यावर्षी ठीक मानू, पुढच्या वर्षी काय? त्याच्या पुढच्या वर्षी काय??
एकट्या पुण्यात 3 अब्ज रुपयांचं पाणी फक्त 3 महिन्यात , तर औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, नागपूर, अशा शेकडो शहरांचं अन गावखेड्यांचं काय?
आता हा फोटो का??
तर 2.0 फिल्म मधे खाली पडलेले अनेक मोबाईल्स एकत्र येऊन ते एका नॅनो वगैरे सेकंदात अशा घातकी पक्षाचं अक्राळविक्राळ रूप धारण करतात. आणि आपल्या पंजानं शहरं तबाह करत सुटतात. लोकांना नंतर आपल्या वागण्याचा प्रचंड पश्चाताप होतो.
पाणी समस्या ही अशीच एक शांत रेंगत चाललेला भला मोठा नाग होती, जिने आता अचानक आपल्यासमोर असा अक्राळविक्राळ फणा काढलाय...
वेळीच सावध नाही झालो तर निसर्ग आपल्याला डसणार... डसणार म्हणजे डसणार. आपली इच्छा असो अथवा नसो. तिथं एकमेकांकडं बोट दाखवणं असा प्रकार नाही.!!
महत्वाचा प्रश्न...
आपण आज, आतापासून पाण्याची बचत आणि पाणी मुरवण्यासाठी काम नाही केलं तर......???
आता फक्त एवढंच सांगायचं होतं की आपल्या हातातनं वेळ निघून गेलेली असली तरी आपण आपलं उद्याचं पाण्याविना तडपणं , आजच्या कष्टाने वाचवू शकतो एवढी वेळ मात्र नक्कीच आपल्या हातात अजूनही शिल्लक आहे...
शहाणं बनून, कष्ट करून, पाणी वाचवूया, पाणी साठवूया......... आणि यासाठी अनेक मार्ग आहेत, आपल्याला फक्त एक पाऊल पुढं टाकायचंय... वेळ आहे, सहज सोप्पं "रेन वॉटर हार्वेस्टिंग" आपापल्या घरावर या पावसाळ्याआधी नक्की करून घ्या...!!
--
सचिन अतकरे
टीप:
आकडेवारी बरीच अभ्यासानंतर काढलेली आहे. तरीही थोडाफार फरक असू शकतो
संबंधित ब्लॉग
दुष्काळाला एकटा हरवत असलेला जांबाज...!
BLOG : शेर से भिडा शेर
काळीज चिरणारी चिठ्ठी
धमन्या पेटलेले 40 सैनिक...
जगावेगळ्या रोपवाटिकेची कहाणी
श्रमदानासाठी परदेशातून मदत करणारे सादिकभाई
...हे वाचायला थोडीशी ताकद लागेल...!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement