एक्स्प्लोर

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

‘कॅमेलिया सायनेन्सिस’ हे अनेकांसाठी अमृत किंवा जीवनावश्यक गरज असते. ते पोटात गेल्याशिवाय जगभरातल्या कोट्यवधी लोकांचा दिवस सुरु होऊ शकत नाही, ते कॅमेलिया सायनेन्सिस ऊर्फ चहा नावाचे पेय म्हणजे अनेकांचा विक पॉईंट, चहा मग टपरीवरचा कटिंग असो, घरातला आलं घातलेला चहा असो की बिना दुधाचा ब्लॅक टी असो चहाची आवड तशी युनिव्हर्सल.. या अमृततुल्य चहाचे जवळपास १०० प्रकार पिण्याची तुमच्याकडे संधी असेल तर चहाप्रेमींचे पाय नक्कीच तिकडे वळतील.. म्हणूनच तर ‘टी व्हिला कॅफे’ च्या मुंबईच्या विविध भागात निघालेल्या शाखा सध्या लहान थोर, युवक सगळ्यांनाच खुणावतायत.. असे किती प्रकार ठाऊक असतील आपल्याला चहाचे, कटिंग चहा, दुधाचा चहा, गवती चहा, फार तर ग्रीन टी आणि फारतर साखरेचा किंवा बिनसाखरेचा चहा, याच्यापुढे काही आपली यादी जात नाही.. पण या टी व्हिला कॅफेच्या खास चहाच्या वेगळ्या मेन्यू कार्डमध्ये मात्र ऐकून नवल वाटावं अशा नावांचे चहाचे प्रकार आहेत.. आसाम टी एक चहाचा प्रकार आहे अर्ल ग्रे टी – अर्ल ग्रे हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांचं नाव, त्यांनी म्हणे पहिल्यांदा ब्लॅक टीमध्ये किंचितशी संत्र्याची चव घ्यायला सुरुवात केली, त्यामुळे तशा चवीचा चहा अर्ल ग्रे टी ठरतो.. तुळशीच्या पानांची चव असलेला तुलसी चहा किंवा चॉकलेट चहा चवीला कसा लागेल अशा सगळ्या वाफाळत्या प्रश्नांची वाफाळती उत्तरं मिळतील टी व्हिला कॅफेमध्येच, अर्थात नावात टी आहे म्हणून इथे कॉफीच्या चाहत्यांवर अन्याय मुळीच होत नाही.. तऱ्हेतऱ्हेच्या कॉफीचे इथले प्रकारही चांगलेच प्रसिद्ध आहेत.. कोल्ड कॉफीचे प्रकार किंवा गरम कॉफीचे प्रकार यात तर टी व्हिला कॅफे अगदी कॅफे कॉफी डे आणि स्टारबक्सशीही स्पर्धा करतंय.. पण या सगळ्याबरोबर तरुणाई आकर्षित होते ती इथल्या डेझर्टसकडे.. वॅफल्स आणि वेगवेगळे मिल्कशेक्ससाठी कॉलेज तरुण इथे तासतासभर ताटकळतांना दिसतात.. ओरिओ वॅफल आता वॅफल म्हणजे नक्की काय तर आपण कोनमधून आईसक्रीम खातो, त्या कोनसारखा कुरकुरीत थोडासा जाडसर चौकोनी आकाराचा आणि त्यावर चौकोन कोरलेले असा गोड पदार्थ म्हणजे वॅफल, वेगवेगळ्या प्रकारचे गोड सिरप्स या वॅफलवर ओतून तसंच फळांसारखे टॉपिंग्स टाकून हे वॅफल्स खाल्ले जातात. पाश्चिमात्य देशांमध्ये सकाळचा नाश्ता म्हणून वॅफल्स चांगलेच लोकप्रिय आहेत.  गोड सिरपचं टॉपिंग आणि खाली कुरकुरीत वॅफल असा असा चविष्ट आणि तितकाच देखणा पदार्थ आहे. टी व्हिला कॅफेमध्ये चॉकलेट वॅफल, बनाना वॅफल, फ्रुट वॅफल, न्युटेला वॅफलपासून थेट लाडकं चॉकलेट किटकॅट आणि लहानग्यांचं आवडतं बिस्कीट ओरियो याचंही टॉपिंग असलेली वॅफल्स मिळतात, ही वॅफल्स टेबलवर आणून ठेवण्याची पद्धत तर खरोखर अनोखी म्हणावी लागेल.. कारण साधारणपणे आपण ऑर्डर दिल्यावर आपण मागवलेला पदार्थ कुठल्यातरी प्लेटमध्ये आपल्यासमोर आणून ठेवला जातो..  इथेही वॅफल्स मागवल्यावर आपल्या पुढ्यात प्लेटच येते पण एकदम हटके.. कॅडबरी चॉकलेटच्या आकाराच्या एका पाटीवर सजवलेली वॅफल्स आपल्या पुढ्यात येतात, वॅफल्ससोबत एका छोट्याशा बाऊलमध्ये आपण मागवलेल्या गोड सिरपचा छोटासा बाऊलही येतो. आपल्या समोर आलेला पदार्थ इतका देखणा दिसतो की थोडावेळ बघतच रहावासा वाटतो.. डेझर्टस जितकी देखणी तितकीच देखणी इथली मिल्कशेक्सही. न्युटेला शेक नावाचा एक मिल्कशेक तर थेट काचेच्या बाटलीतच आपल्या पुढ्यात येतो.. त्यावर भरपूर क्रीम, आईसक्रीम आणि अनेकांच्या लाडक्या किटकॅट चॉकलेटचा अख्खा बार... किटकॅट मिल्कशेक नावाचा केवळ आणि केवळ किटकॅट चॉकलेटचा वापर करुन तयार केलेला मिल्कशेक म्हणजे चॉकलेट चाहत्यांची चंगळच.. गोडाच्या आणि त्यातही चॉकलेटच्या चाहत्यांना अजून काय हवं.. किटकॅट शेक चहाची, डेझर्टसची इतकी व्हरायटी आहे टी व्हिला कॅफेत, पण चटकदार, चटपटीत असे खारे पदार्थ काही मिळतात की नाही असा प्रश्न पडायचीही काही गरज नाही कारण एक भलं थोरलं मेन्यू कार्ड वाटच बघत असतं आपली.. त्यात लेबनिज, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेन्टल, चायनिज आणि सिझलर असे युवापिढीच्या फेवरेट लिस्टमधल्या पदार्थांची जंत्रीच दिसते तिथे.. त्या प्रत्येक पदार्थातही वेगळेपण जपलंय या कॅफेनं.. चहाचे नविन प्रकार आता खरं तर सॅण्डविचसारखा नेहमीचा पदार्थ पण इथे मात्र पूर्णपणे नव्या अवतारात आपल्या समोर येतो.. तीच तऱ्हा बर्गर्सची, आलु पॅटी, व्हेज किंवा चिकन बर्गर खाण्याची सवय असलेल्यांना एकदम वांग्याचं बर्गर मेन्यू कार्डात पाहून शॉक बसतो, पण खरंच भाजलेल्या वांग्याच्या चकत्यांचं बर्गर चवीला जबरदस्त लागतं यात शंका नाही.. टी व्हिला कॅफे हे कॉलेजवयीन मुलामलींचं अतिशय लाडकं ठिकाण झालंय त्याला एक कारण आहे इथले खिशाला परवडणारे काही पदार्थ. पिझ्झा आता पिझ्झा कसा महाग़डा पदार्थ आणि इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झे मिळतात की त्यांच्या किंमती नक्कीच जास्त असणार, पण इथे १/४ म्हणजे चतकोर पिझ्झाही मिळतो. तो अर्थातच चतकोर दरातच मिळतो.. तसंच खिशाला परवडणारे फ्रेंच फ्राईजचेही अनेक प्रकार कॉलेजच्या मुलांमध्ये जबरदस्त फेमस आहेत. आपल्या सगळ्यांना आवडणाऱ्या देसी चायनिजच्याही जरा वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज इथे चाखायला मिळतात.. सगळ्यात महत्त्वाची शाकाहारी खवय्यांना सुखावणारी बाब म्हणजे टी व्हिला कॅफेत जगभरातील पदार्थांची चव चाखायला मिळत असली तरी हे रेस्टॉरन्ट पूर्णपणे शाकाहारी आहे, त्यामुळे नॉन व्हेजच्या चाहत्यांना थोडी निराशा येणार हे नक्की. लेबनिज प्लॅटर टी व्हिला कॅफेतले सगळे खारे पदार्थ पेश करण्याचीही टी व्हिला कॅफेची एक अनोखी पद्धत आहे.. त्यांच्याकडल्या सगळ्या सर्व्हिंग प्लेट्स म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या कढया, छोट्या, मोठ्या, ट्रेसारख्या आडव्या, पसरट अशा सगळ्या प्रकारच्या पकडायला कान असलेल्या कढयांमध्येच तुम्ही मागवलेला पदार्थ येतो.. सूपासारखा पातळ पदार्थ असो किंवा बर्गरसारखा कोरडा पदार्थ असो, तुम्हाला तो मिळणार कढईतच.. इथले चहाचे प्रकारही टेबलवर येतात ते वेगवेगळ्या पद्धतीने..  तुम्ही जसा चहा मागवाल तसा कप आणि किटली तुमच्यासमोर येणार, म्हणजे अगदी देशी आल्याचा चहा थेट कुल्हडच्या आकाराच्या कपात येणार आणि सोबतची किटली तांब्याची, तर इंग्लिश ब्रेकफास्टबरोबरचा चहा स्वच्छ पांढऱ्या कपात आणि किटलीही त्या कपाला साजेशी स्वच्छ पांढरी. स्पेशल असा ब्लॅक टी काचेच्या पारदर्शक कपात मिळणार. टेबलवर हे कप येत असते तरी टी व्हिला कॅफेत नजर जाईल तिथे कप आणि किटल्यांची अतिशय आकर्षक सजावट दिसते. डेकोरेशनकप्सचं डेकोरेशन रेस्टॉरन्टच्या मधोमध एखादं झुंबर असावं तशा पांढऱ्या कपांच्या आणि पांढऱ्या किटल्यांच्या माळा लटकवलेल्या आहेत.. दर्शनी भागात तर मोठं एम्बॉसिंग केलेलं चित्र आहे चहाच्या कपाचं. अगदी भिंतीमधल्या विटांवरही चहाच्या कपाची छोटीछोटी चित्रं कोरलीत हे नीट निरखून पाहिल्यावर दिसतं.. खरं तर लांबून ती सजावट पाहून सहजच पावलं वळतात या कॅफेकडे.. इतर रेस्टॉरन्टच्या तुलनेत हा कॅफे असल्याने बसायची व्यवस्थासुद्धा जरा वेगळी निवांत अशी आहे, या आसनव्यवस्थेमुळे तासनतास गप्पा मारत चहा किंवा कॉफीची चव चाखणाऱ्यांना ही जागा भलतीच आवडतेय. म्हणूनच चहाच्या चाहत्यांनी तर चुकवूच नये अशी ही जागा आहे पण खवय्यांनीही इथल्या पदार्थांवर ताव मारायला मुळीच हरकत नाही.. ‘जिभेचे चोचले’मधील याआधीचे ब्लॉग : जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया !  जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget