एक्स्प्लोर
जिभेचे चोचले : ताज्या पदार्थांसाठी – दादरचं ओव्हनफ्रेश
दादरला थेट शिवाजीपार्काच्या गल्लीत असलेलं आणि बाहेरुन तरी छोटंसंच दिसणारं ओव्हनफ्रेश रेस्टॉरन्ट, फक्त रेस्टॉरन्ट म्हणून प्रसिद्ध नाही तर तिथल्या बेकरी प्रॉडक्टस आणि चॉकलेट डेझर्टससाठीही प्रसिद्ध आहे.
कुठलाही खाद्यपदार्थ खायचा झाला तर तो पदार्थ ‘फ्रेश’ असावा अशी आपली सगळ्यांची अपेक्षा असते. आहारतज्ञांचाही आग्रह असतो की जितकं जमेल तितकं ताजंच खाण्याचा प्रयत्न करावा, बेकरीत तयार होणारे केक, बिस्कीटं, पाव किंवा खारी यासारखे पदार्थ तर जितके ताजे तितके चवदार असतो, त्यामुळे बेकरीच्या बाहेरुनही जातांना कितीतरीदा गरमागरम पाव किंवा बिस्कीटांचा सुवास आल्याशिवाय रहात नाही. असं हे सगळं फ्रेश पदार्थांचं महत्त्व जाणूनच की काय कोण जाणे दादरच्या अतिशय प्रसिद्ध रेस्टॉरन्टच नावच ठेवलं गेलंय – ओव्हनफ्रेश. दादरला थेट शिवाजीपार्काच्या गल्लीत असलेलं आणि बाहेरुन तरी छोटंसंच दिसणारं हे रेस्टॉरन्ट, फक्त रेस्टॉरन्ट म्हणून प्रसिद्ध नाही तर तिथल्या बेकरी प्रॉडक्टस आणि चॉकलेट डेझर्टससाठीही प्रसिद्ध आहे
‘ओव्हनफ्रेश’ हे शिवाजी पार्कात अगदी मोक्याच्या जागी आहेच पण ते तितकंच लोकप्रिय आहे याची जाणीव आपल्याला बाहेर वाट बघत असलेल्या लोकांची संख्या पाहूनच होते. आत गेल्यानंतरही खरं तर खूप सजावट वगैरे मुळीच केलेली नाही. याउलट अगदी कमी जागेत जास्तीत जास्त टेबलं ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. अगदी जवळजवळ टेबलं असल्याने जास्तीत जास्त लोक बसता येतील अशी व्यवस्था केली गेली आहे. रेस्टॉरन्टमध्ये शिरण्याआधी आपण थेट शिरतो ते बेकरीमध्ये. इथे केक पेस्ट्रीज बरोबरच कप केक्स, मफिन्स, छोटे केक अशा गोड पदार्थांबरोबरच पिझ्झा पिसेस, ब्रेड आणि पावाचे विविध प्रकार वेगवेगळ्या चवींचे टोस्ट असे सगळे पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटावं असे पदार्थ मांडलेले दिसतात.
शेजारीच एका उभ्या फ्रिजमध्ये चॉकलेटच्या विविध चवी आणि आकार ठेवलेले दिसतात, म्हणजे व्हाईट चॉकलेट, नॉर्मल चॉकलेट, डार्क चॉकलेट अशा चवी, काही लाडूच्या आकारात तर काही लॉलीपॉपच्या आकारात, काही चॉकलेट बारसारखे सजवलेले. अशी सगळी चॉकलेटी आणि केक पेस्ट्रीजची दुनिया पाहिली की समोर रेस्टॉरन्टमध्ये प्रवेश करण्याआधीच खवय्यांची गाडी इथे थबकते आणि इथल्या ताज्या पदार्थांची मनसोक्त खरेदी झाल्यानंतरच ती गाडी पुढे रेस्टॉरन्टमध्ये जाते.
रेस्टॉरन्टचा मेन्यू बघितल्यानंतर झटकन लक्षात येतं की जगभरातील पदार्थांची चव चाखण्याची संधी देणारं हे रेस्टॉरन्ट मात्र प्युअर व्हेज म्हणजे शुद्ध शाकाहारी आहे. इथे तुम्हाला इटालियन, लेबनिज, मेक्सिकन, अमेरिकन, फ्रेंच, स्विस आणि कॉन्टिनेन्टल असे वेगवेगळ्या देशातले प्रसिद्ध पदार्थ मिळतात, पण सगळे शाकाहारी. जगभरातील विविध खाद्यसंसंकृतीची केवळ झलक जरी द्यायची म्हटली तरी मोजका मेन्यू ठेऊन चालणारंच नाही, त्यामुळे इथलं मेन्यूकार्ड म्हणजे १०-१२ पानी पुस्तकच आहे. ज्यात तोंडी लावण्याच्या स्टार्टर्सपेक्षाही छोट्या पदार्थांपासून स्मुदीज, मिल्कशेकपर्यंत विविध पदार्थांचा समावेश आहे. अशा सगळ्या पदार्थांमध्येही इथे अगदी प्रत्येक टेबलवर ऑर्डर केलेला दिसणारा पदार्थ म्हणजे इटालीयन पिझ्झा. एरव्हीच्या डॉमिनोज किंवा पिझ्झा हटसारख्या पिझ्झा चेन्सच्या जाड्याभरड्या पिझ्झा बेसचा एव्हाना सगळ्यांनाच कंटाळा येऊ लागला आहे. अशा वेळी ताजा तयार केलेला पातळ बेसचा फ्रेश भाज्या वापरुन केलेला पिझ्झा हा कधीही पहिला चॉईस ठरतो. तसंच आपल्या सोबत किती लोक आहेत आणि सगळ्यांना किती भूक आहे त्यानुसार ८ इंची किंवा १२ इंची पिझ्झाचा पर्यायही सर्वांना हवाहवासा वाटतो. अर्थात त्यापुढे जाऊन पिझ्झाची परफेक्ट चव हे ही इथे आलेल्या प्रत्येकाला पिझ्झा ऑर्डर करायला भाग पाडते.
पिझ्झा ऑर्डर केल्यावर आपण घरी माठ ठेवायला जशी तीन पायाची आढणी वापरतो, तशा त्रिकोणी पायाच्या गोलाकार आढणीवर लाकडी ट्रे मध्ये ठेवलेला पिझ्झा आपल्यासमोर येतो, येतो तो ही अगदी गरमागरम. हा पिझ्झा कडक किंवा खरपूस नसतो. अगदी पोळीसारखा मऊ बेस हेच इथल्या पिझ्झाचं वैशिष्ट्य. या पिझ्झाइतकाच प्रत्येकाच्या टेबलवर दिसणारा ओव्हनफ्रेशमधला आणखी एक फ्रेश पदार्थ म्हणजे इथला गार्लिक ब्रेड.
खरं तर गार्लिक ब्रेड हा पदार्थ आता समोसा किंवा वडापावसारखा सगळीकडे मिळू लागला आहे. पण मुंबईतला सगळ्यात चांगला चिज गार्लिक ब्रेड कुठला असा सर्व्हे किंवा मतदान झाल्यास माझं मत डोळे मिटून ओव्हनफ्रेशच्या गार्लिक ब्रेडला मिळेल. लुसलुशीत ब्रेडवर ताजं वितळतं चिज असा हा गार्लिक ब्रेड आपण पूर्ण एक प्लेट किंवा अर्धा प्लेटही मागवू शकतो. ही आणखी एक चांगली सोय. याशिवाय खास स्विस फॉन्द्युचे इतर कुठेही मिळणार नाहीत असे प्रकार हीदेखील ओव्हनफ्रेशची एक खासियत.
या सगळ्यांबरोबर व्हेज सिझलरचे प्रकार आणि पास्ताचे प्रकारही जवळपास सगळेच खवय्ये मेन कोर्सचा पर्याय म्हणून चाखतात. अनेक चवींचे छोटेमोठे पदार्थ एकत्र ठेऊन गरमागरम प्लेटवर ठेवलेले असतात आणि त्या कॉम्बिनेशनला आपण सिझलर म्हणतो. ती सिझलरची प्लेट कशी आणि कोणत्या पदार्थांनी सजवायची हे सर्वस्वी शेफचं कौशल्य असतं . प्रत्येक रेस्टॉरन्टच्या सिझलरमध्ये काहीतरी युनिक गोष्ट असते. इथे सिझलिंग प्लेटवर कॉर्न मिक्स केलेला चिज टार्ट ठेवलेला असतो. तो चिज टार्ट चवीलाही छान लागतो. इतर ठिकाणी सिझलरवर फ्रेंच फ्राईज असतात तर इथे फ्रेंच फ्राईजच्या जागी जाडसर मसाला लावलेले पोटॅटो वेजेस असतात.
पास्ताचेही फक्त इटालियन रेस्टॉरन्टमध्ये मिळणारे कितीतरी प्रकार इथे चाखायला मिळतात. म्हणजे लसानिया नावाचा पास्ताचे लेयर असलेला प्रकार इथे मिळतो, तसंच रॅव्हिओली नावाचा आतमध्ये सारण भरलेला पास्ताही ओव्हनफ्रेशमध्ये मिळतो. रॅव्हिओली हा इटालियन पदार्थ इटालियन खाद्यसंस्कृतीतही महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे हा पदार्थ पास्ताच्या चाहत्यांनी नक्की चाखायला हवा. ओव्हनफ्रेशमध्ये अख्खी बेकरीच रेस्टॉरन्टचा एक भाग असल्यानं डेझर्टची तर कमतरताच नाही.
आपल्याला हवं ते डेझर्ट आपण बेकरीतून मागवू शकतोच पण त्याशिवायही अगदी युनिक असे ताज्या फळांचा समावेश असलेले डेझर्टस इथे आपल्याला चाखता येतात. नावातल्या फ्रेश शब्दाला सार्थ ठरवणारा ताज्या फळांचा सॉर्बै ही खायलाच पाहिजे असा पदार्थ. जगभरातले प्रसिद्ध पदार्थ चाखायचे तर शाकाहारी लोकांसाठी नेहमी मोजकेच पर्याय असतात कारण जास्तीत जास्त पदार्थ नॉनव्हेज असतात, पण इथे ओव्हनफ्रेशमध्ये मात्र जगभरातले सगळे पदार्थ चाखायला मिळतात ते ही व्हेज. त्यामुळे शाकाहारी लोकांनी तर ओव्हनफ्रेशला भेट द्यायलाच हवी.
संबंधित ब्लॉग
जिभेचे चोचले : चवदार मिल्कशेक्सचा ब्रॅण्ड : ‘केवेंटर्स’
जिभेचे चोचले : भारतीय पदार्थांचं इंडिया बिस्ट्रो... जिभेचे चोचले : द अमेरिकन जॉईंट जिभेचे चोचले : आजीच्या पोतडीतील पदार्थांसाठी 'ग्रॅण्डमामाज् कॅफे' जिभेचे चोचले : खवय्यांचं लाडकं लिजेंडरी स्टेटस जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे जिभेचे चोचले - सीएसटीपेक्षाही जुनं पंचम पुरीवाला जिभेचे चोचले : फ्रेंच फ्राईजसाठी – ‘द जे’ जिभेचे चोचले : भारतीय वैविध्याचं दर्शन – 29 जिभेचे चोचले : मुलुंडचं केक्स एन केमिस्ट्री जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना जिभेचे चोचले : स्पेशालिटी ट्रिपल ट्रिट जिभेचे चोचले : जिवाची मुंबई – पंचतारांकित रेनेसॉंचा संडे ब्रंच जिभेचे चोचले : वाह ताज !– मसाला क्राफ्ट जिभेचे चोचले : पारंपरिक जेवणाचा थाट – भगत ताराचंद जिभेचे चोचले: बोटीच्या थीमचं हार्बर ओ फोर जिभेचे चोचले : डोशासारख्या क्रेप्ससाठी ‘डी क्रेप्स’ कॅफे जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’ जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’ जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601 जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’ जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’ जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्टअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement