एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

‘माझा’ १० वर्षांचा प्रवास....

इलेक्ट्रॉनिक मीडियातलं दशक पूर्ण करताना आजही मला तो दिवस आठवतोय. जेव्हा मी दै. ‘नवशक्ति’ वृत्तपत्रातून रिझाईन केलं होतं. प्रिंटमध्ये सात वर्ष पूर्ण केल्यावर आता पाऊल ठेवायचं होतं ते इलेक्ट्रॉनिक मीडियात. लेखणीसोबतच आता बूम हाती घ्यायचा होता, सारं काही नवीन होतं. नवे बॉस, नवे सहकारी...नवं ऑफिस. बातम्यांचं प्रेझेंटेशन करण्याची स्टाईल. न्यूजचॅनलचं तंत्र. ८ मार्च २००७ ला मी माझाच्या (तेव्हा स्टार माझा आता एबीपी माझा) महालक्ष्मी ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं. तेव्हा पहिल्यांदा माझी गाठ पडली आमचे संपादक राजीव खांडेकर सरांशी. त्यांच्याबद्दल याआधी ऐकून होतो, त्यांचं लिखाण वाचलेलंही होतं. त्यांच्यासह झालेल्या पहिल्या भेटीनेच खूप रिलॅक्स झालो. सॉफ्ट स्पोकन, अदबीने बोलणारे सर......हॅट्स ऑफ टू हिम. डाऊन टू अर्थ राहून मोठं असणं म्हणजे काय,याचा पहिला धडा सरांनी त्यांच्या वागण्यातूनच घालून दिलाय, किंबहुना आजही देतायत. ट्रेनिंगमध्ये अमित भंडारी हा आमचा न्यूज पेपरपासूनचा मित्र भेटल्याने आणखी रिलॅक्स झालो, कुणीतरी ओळखीचं होतं म्हणून हायसं वाटलं. महाराष्ट्रभरातून आलेले तरुण सहकारी माझ्यासोबत होते, त्यांची काम करायची ऊर्जा, चिकाटी पाहून थक्क व्हायचो. यातले बरेचसे अननुभवी अगदीच रॉ टॅलेंट होते, पण जिद्द सोडायचे नाहीत, ट्रेनिंग प्रोसेसमध्ये मिलिंद खांडेकर सर आणि चंद्रमोहन सर यांच्यासारखे दिग्गज आमच्यासोबत होते. मिलिंद सरांचं डेडिकेशन याचि देही याचि डोळा पाहिलंय. पहाटेपासून रात्रीपर्यंत बातम्यांच्या विश्वात तितक्याच एनर्जीने, तितक्याच उत्साहाने वावरणारे मिलिंद खांडेकर सर आणि कोणत्याही सिच्युएशनमध्ये पॅनिक न होता, द्रविड स्टाईल कूल असणारे चंद्रमोहन सर. त्यांच्यासोबत अतिशय शांत, संयमी राजीव सर. ही तिन्ही मंडळी म्हणजे राजीव सर, मिलिंद सर आणि चंद्रमोहन सर ही माझ्या मते फक्त चांगली माणसं नाहीत, तर या इन्स्टिट्यूट्स आहेत, जर्नलिझमच्या व्यतिरिक्तही तुम्हाला एक समृद्ध माणूस म्हणून घडवणाऱ्या. २२ जून २००७ ला आम्ही ऑन एअर गेलो आणि सुरु झाला एक थरारक, थ्रिलिंग प्रवास. स्टार माझाने बाळसं धरलं आणि न्यूजचॅनल विश्वात नंबर वनचं बिरुद आपल्या नावावर केलं. याच दरम्यान प्रिंट टू इलेक्ट्रॉनिक हे ट्रांझिशन करताना माझी थोडी दमछाक झाली, म्हणजे बातम्यांच्या सादरीकरणाच्या पद्धतीपासून ते ब्रेकिंग न्यूज आल्यानंतर कसं रिअँक्ट व्हायचं इथपर्यंत सारंच अगदी नवीन होतं. सुरुवातीला विजय साळवीच्या नेतृत्वाखाली स्पोर्टस टीममध्ये होतो, नंतर जनरल डेस्क आणि १ ऑगस्ट २०१० पासून जनरल अँकरिंग. प्रत्येक टीममधलं चॅलेंज वेगळं. म्हणजे आयपीएल वनच्या वेळी मला आठवतंय, ५७ दिवस नॉनस्टॉप काम केलं. फायनल संपल्यावर पहाटे पावणे तीनला घरी आलो, तेही आठवतंय. दिल्लीची टेस्ट मॅच, मुंबई मॅरेथॉन (एकदा फिल्डवरून तर एकदा नॉनस्टॉप कॉमेंट्री स्टुडिओतून. अशी दोनदा कव्हर करता आली) स्पोर्टसनंतर जनरलला एन्ट्री झाली ती २००९ च्या राज्यातील निवडणुकांच्या वेळी. त्यावेळी पॉलिटिकल बातम्या लिहिण्याचा अनुभव काही औरच होता, तिथून पुढे खऱ्या अर्थाने कॅनव्हास मोठा होण्यात मदत झाली, अगेन थँक्स टू राजीव सर. जनरल डेस्कला आल्यावर बातम्यांचं वैविध्य हँडल करता आलं,  याचं श्रेय मला माझ्या न्यूजपेपरमधील अनुभवालाही द्यावं लागेल. ‘नवशक्ति’त केवळ स्पोर्टसच नव्हे तर विविध विषयांच्या, क्षेत्रांच्या बातम्या ट्रान्सलेट करायला दिल्या जायच्या त्याचा किती फायदा होतो,हे इथे कळून चुकलं. थँक्स टू संपादक प्रकाश कुलकर्णी सर, माझे तिकडचे सीनियर्स भगवान निळे, दीपक परब...किंबहुना सर्वांनाच. असाच उल्लेख मी व्हॉईस ओव्हरच्या बाबतीत ऑल इंडिया रेडिओ टीमचाही करेन. किशोर सोमण, राजेंद्र पाटणकर, श्रीराम केळकर, दिनेश अडावदकर, लता भालेराव आणि सुलभा सौमित्र या अनाऊन्सर्समधल्या दादा मंडळींनी केलेलं मार्गदर्शन प्राईजलेस आहे. रेडिओत काम करताना तुमच्याकडे फक्त तुमचा आवाज असतो, नो विज्युअल्स. आवाजातून व्यक्त व्हायचं असतं. यासाठी आवाजाचा थ्रो, प,फ सारखे ओष्ठ्य शब्द म्हणण्याची विशिष्ट पद्धत, माईक आणि आपला चेहरा यात किती अंतर ठेवायचं हे सारं या मंडळींनी आमच्याकडून घोटवून घेतलं. जे आता पावलोपावली उपयोगी पडतंय. खास करून मी जनरल अँकरिंगला आल्यावर. किंबहुना २०१० ते २०१७ हा काळ माझ्यासाठी जास्त थ्रिलिंग आहे. अँकरिंग करताना बातम्यांच्या निखाऱ्यांवर चालण्याचा. होय, मी याला निखाराच म्हणेन, कारण जनरल अँकरिंग म्हणजे काय असतं हे आतापर्यंत फक्त बघत होतो, आता अनुभवतोय. आमच्याप्रमाणेच कित्येक जनरेशनचा आयकॉन अँकर मिलिंद भागवत, नव्हे द मिलिंद भागवतच्या टीममध्ये माझी एन्ट्री झाली. मिलिंदचं अँकरिंग मी खूप वर्षांपासून पाहतोय, किंबहुना न्यूजचॅनलमध्ये एन्ट्री करताना मी ज्या काही व्यक्तींचं मार्गदर्शन घेतलं होतं, त्यातली एक व्यक्ती होती मिलिंद भागवत आणि दुसरी प्रदीप भिडे. माझ्या मते अँकरिंगमधली ही चालती बोलती विद्यापीठं आहेत. त्यात जनरल अँकरिंगला आल्यावर सुरुवातीलाच स्पोर्टस बुलेटिनच जास्त वेळा केलं, हे विशेष. चॅट कॉर्नरचे १४० एपिसोड्स, माझा सन्मानचं अँकरिंग. अशा अनेक अपॉर्च्युनिटीज आल्या,ज्याने माझ्यात भरच टाकली. चॅट कॉर्नरमध्ये अशोक सराफ, प्रशांत दामले, मृणाल कुलकर्णी, कविता मेढेकर अशा माझ्या अनेक फेव्हरेट कलाकारांसोबत संवाद साधता आला. त्यांचा कामाकडे आणि जगण्याकडेही पाहण्याचा दृष्टिकोन जवळून अनुभवता आला. चॅट कॉर्नरच्या एक्सपिरिअन्ससाठी अमितसोबतच सोनाली, विनोद आणि कीर्ती या तिघांनाही स्पेशल थँक्स. हा शो जरी मी प्रेझेंट करत होतो, तरी त्याची पडद्यामागची रिअल फोर्स ही सर्व मंडळी होती. क्रिकेटच्या मंचावरील सर्वोच्च स्टेजवर अर्थात वनडे वर्ल्डकपमध्ये 2011 ला आपण मिळविलेलं विजेतेपद...हाही माझ्या अँकरिंगच्या प्रवासातील एक महत्त्वाचा क्षण. क्रिकेटमधील सर्वोच्च बहुमान जेव्हा देशाला मिळाला, तेव्हा मी ऑन एअर होतो. याच 2011 मध्ये आणखी एक योग आला, तो ‘द माधुरी दीक्षित’च्या मुलाखतीचा. 17 डिसेंबर, 2011 चा तो दिवस फ्रेम बाय फ्रेम म्हणतात तसा मी मनात कोरुन ठेवलाय. अँकरिंगमधला आणखी एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे सचिन तेंडुलकरच्या मातोश्री रजनीताई तेंडुलकर यांच्याशी मी साधलेल्या संवादाचा. सचिनला पद्मविभूषण प्रदान करण्यात आल्यानंतर आम्ही त्यांचा फोनो घेतला. माझ्या मते न्यूज चॅनलला सचिनच्या मातोश्रींनी दिलेला तो एकमेव फोनो असावा. आई असं संबोधूनच त्यांच्याशी गप्पा केल्या. त्या खूप खुलून बोलल्या. त्यांच्या भेटीचाही योग आला होता, एकदा. थँक्स टू आमचा प्रिंटमधला मित्र संदीप चव्हाण अँड टीम. सचिनचा एक सन्मान सोहळा आम्ही मराठी क्रीडा पत्रकारांनी केला होता, तेव्हा सचिनच्या घरी जाऊन त्याचं निमंत्रण देऊन आलो होतो, त्यावेळी आई होत्या घरी. फोनवरुन त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा हाही क्षण आठवला. मिसेस सीएम अमृता फडणवीस यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा, तर आदित्य ठाकरेची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबियांच्या ‘मातोश्री’वरही जाऊन आलो. मी जर जनरल डेस्कला आलो नसतो, तर मला नाही वाटत हे अनुभव मला कधी मिळाले असते. ज्यांचं लिखाण वाचून लिहिण्याची इच्छा होऊ लागली, त्या एव्हरएनर्जिटिक द्वारकानाथ संझगिरी सरांसह स्क्रीन शेअर करता आलं आणि कार्यक्रमांच्या निमित्ताने स्टेज शेअर करता आलं तेही गेल्या १० वर्षात. संझगिरी सरांच्या लिखाणाचा आणि त्यांच्या कार्यक्रम सादरीकरणाचा मी मोठा फॅन आहे. त्यांच्याबरोबरच संदीप पाटील सरांशी होणाऱ्या ऑफ स्क्रीन गप्पा माझ्यासाठी पर्वणी असतात. आज न्यूजचॅनलमध्ये पूर्ण केलेल्या 10 वर्षांच्या निमित्ताने अशा अनेक क्षणांचा कोलाज समोर येतोय. या 10 वर्षांनी मला खूप काही दिलंय, टेलिव्हिजनची स्वत:ची अशी एक वेगळी भाषा असते, ती मला जाणून घेता आली.... प्रत्येक तासाला बुलेटिन असल्याने आवश्यक असलेला विचारांचा, सादरीकरणाचा स्पीड, त्याला जुळवून घेण्याचं कसब तुमच्यामध्ये येण्यासाठीचे प्रयत्न यावर अजूनही अभ्यास सुरुच आहे. स्पोर्टस व्यतिरिक्तच्या अनेक बातम्या प्रेझेंट केल्याने तसंच आले गणराय सारखी गणेशोत्सव स्पेशल मालिका, माझा सन्मान, माझं व्हिजन, रिइनव्हेंट माझा महाराष्ट्र यासारख्या कार्यक्रमांचं अँकरिंग केल्याने न्यूज मीडिया पर्सनसोबतच माणूस म्हणूनही माझ्या कक्षा रुंदावण्यात मोठी मदत झालीय आणि याहीपुढे होत राहील. यासोबत आणखी एक किंवा कदाचित सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे तुमचं टेलिव्हिजनवर दिसणं, तुम्हाला चार लोक ओळखू लागणं, ही बाब तुमच्या डोक्यात हवा जाऊ देणारी ठरु शकते, मात्र तुम्ही नोन फेस झाल्यावरही लो प्रोफाईल राहणं हेच कसं आवश्यक आहे, हे बोलण्यापेक्षा जास्त त्यांच्या वागण्यातून आमच्यावर बिंबवणारे राजीव सर, तसंच मिलिंद भागवत यांच्यासारखे आदर्श तुमच्या आजूबाजूला वावरत असल्याने तुमचे पाय आपसूक जमिनीवर राहतातच, नव्हे ते राहायलाच हवेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे टेलिव्हिजनची लँग्वेज आत्मसात करून बातम्या लिहिण्याचा आणि माणसं वाचण्याचा प्रयत्न यापुढेही सुरु ठेवायचाय, मोठ्यांच्या आशीर्वादाने....अन् सहकाऱ्यांच्या साथीने.

--अश्विन बापट

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget