एक्स्प्लोर

BLOG | मोहनलाल : दक्षिणेतील गॉडफादर

मोहनलाल यांनी जगात चुकीच्या ठिकाणी जन्म घेतला. मोहनलाल यांना हवी ती प्रसिद्धी इथला सिनेमा देऊ शकला नाही, त्यामुळे त्यांच्या कलात्मक प्रतिभेचं इथे शोषण झालं

'मेरा नाम जोकर' मधले राज कपूर, 'एक होता विदूषक'मधले लक्ष्मीकांत बेर्डे, 'नटरंग' मधले अतुल कुलकर्णी यांनी आपल्या भूमिकांमधून कलाकाराचं दुःख मांडलं. पण मोहनलाल यांचा 'वानप्रस्थम' बघितल्यावर मी काहीवेळ शॉकमध्येच होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात केरळमधल्या कथकली कलाकाराची ही कथा आपल्याला समाज म्हणून मान खाली घालायला लावते. पण या सिनेमाच्या निमित्तानं मोहनलाल यांच्यासारख्या दैवी कलाकाराची ओळख झाली. त्यानंतर मोहनलाल यांचे जमेल तितके सिनेमे मी बघत गेलो. अशा अफाट प्रतिभेचा कलाकार आपल्या आसपास असतो, पण आपल्याला ना त्यांच्या सिनेमाविषयी माहिती असते ना त्यांच्या कलेविषयी.. बॉन्डपटांवर चर्चा करणारे भरपूर भेटतात पण मोहनलाल यांच्याविषयी भरपूर बोलता येईल असा एकही जण मला अजून भेटला नाही हे माझं दुर्दैवं.. तर.. मोहनलाल.. एकेरी वाटतंय..! पण त्यांना केरळमध्ये आणि दक्षिणेतल्या इंडस्ट्रीत प्रेमानं 'लालेट्टा' म्हणतात. पण खरी ओळख करून द्यायची झाली तर.. पद्मभूषण, लेफ्टनंट कर्नल मोहनलाल विश्वनाथन नायर.. असं म्हणतात की कथकलीचं प्रशिक्षण अगदी वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून घेतलं तर ती कला तुम्ही प्रौढ होत जाता तशी अधिक मूरत जाते. पण 'वानप्रस्थम'साठी लालेट्टांनी वयाच्या 38व्या वर्षी फक्त 6 महिने प्रशिक्षण घेऊन सिनेमातली भूमिका साकारली. जगातल्या प्रसिद्ध कथकली कलाकार कलामंंडलम गोपी, रमणकुुट्टी नायर यांनी मोहनलाल यांचं त्या भूमिकेसाठी तोंडभरून कौतूक केलं. 1999 साली 'वानप्रस्थम' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कांमध्येे सर्वोत्कृष्ट सिनेमाचं सुवर्णकमळ मिळालं. मोहनलाल यांंना सर्वोत्कृष्ट कलाकाराचं रजत कमळ देऊन गौरवण्यात आलं. आपण कलाकाराला एखाद्या कलाकृतीवरून साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. मोहनलाल यांचा 'पुलीमुरूगन' बघितल्यावर आपल्याला एक वेगळेच मोहनलाल दिसतात. मार्शल आर्ट, युद्धकलेचा असा वापर कदाचितच भारतीय सिनेमात केला जातो. सुटलेलं पोट, भला मोठा गळा, एका हिरोला न शोभणारंं शरीर असं आपल्या कल्पनांना छेद देत मोहनलाल पुलिमुरूगनचे अॅक्शन सीन करतात तेव्हा आपण अवाक होतो. त्यानंतर 'ओप्पम' सिनेमातला आंधळा बाप बघणं म्हणजे डोळे दिपवणारं. कुठलीही अवघड भूमिका हा माणूस इतक्या सहजतेनं साकरतो. आपल्याला 'दृष्यम' मधला अजय देवगण माहितीय. पण मूळ मल्याळमधला 'दृष्यम' बघा, काही वेळ का होईना अजय देवगण तुम्ही विसराल. प्रादेशिक सिनेमांनी 100 कोटी कमावणं ही मोठी गोष्ट मानली जाते. गेल्यावर्षी आलेल्या 'लुसिफर' सिनमानं 200 कोटींची कमाई केली. अर्थात एकहाती किल्ला लढवला तो मोहनलाल यांनी.. कायिक अभिनयाचा असा अविष्कार मी थीएटरमध्ये बघत होतो. मोहनलाल यांच्या नुसत्या बेदरकार चालण्यावरही टाळया शिट्ट्या पडत होत्या. वयाच्या साठीत एका सिनेमात लीड करून प्रादेशिक सिनेमाला 200कोटी कमावून देणं हे आजपर्यंत भारतीय सिनेमात अभावानंच होतं. दक्षिणेत मात्र हा अविष्कार तमिळमध्ये रजनीकांत आणि मल्याळममध्ये फक्त मोहनलाल यांनी केलाय. हंगामा, गरम मसाला, खट्टा मिठा, क्योंकी, मुस्कराहट, भुल भुलैया, गर्दिश, सात रंग के सपने, यह तेरा घर यह मेरा घर, दृष्यम हे हिंदीतले सिनेमे प्रचंड हिट झाले. पण त्याआधी या सगळ्या सिनेमांना मल्याळममध्ये माेहनलाल यांनी हिट केलंय. हे आपल्याला माहितीच नाही. यात मोहनलाल यांना साथ लाभली ती दिग्दर्शक प्रियदर्शन यांची. प्रियदर्शन आणि मोहनलाल यांची शाळेपासूनची मैत्री.. या जोडीनं मल्याळम सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय. या जोडीबद्दल स्वतंत्र कधीतरी बोलता येईल. कारण तो विषय खूप खोल आहे. मोहनलाल आजही नटराजाची सेवा करतात. त्यांची निर्मिती असलेलं 'छायामुखी' हे नाटक केरळात प्रसिद्ध आहे. अगदी शाळेत असल्यापासून लालेट्टा स्टेज गाजवायचे. कुरूक्षेत्रावर युद्धाच्या आदल्या दिवशी कर्णाच्या मानसिक स्थितीला विषद करणारं 'कर्णाभारम' या नाटकात त्यांनी कर्णाची भूमिका बजावली. दिल्लीतल्या 'एनएसडी'मध्ये या नाटकाचा प्रयोग पार पडला. पण विशेष सांगायची गोष्ट अशी की फक्त 8 दिवसांचं प्रशिक्षण घेऊन मोहनलाल यांनी संस्कृत भाषेवर पकड बनवली. विचार करा काय प्रतिभा असेल या कलाकारामध्ये. म्हणूनच की काय कलादीच्या 'शंकराचार्य संस्कृत विश्वविद्यालया'द्वारे मोहनलाल यांना संस्कृतची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. 'कधायट्टम' हा मोहनलाल यांचा रंगमंचावरचा दुसरा अविष्कार.. मल्याळम भाषेतल्या 10 अविस्मरणीय चरित्राचं जीवंत चित्रण त्यांनी या माध्यमातून केलं. आपली मातृभाषा मल्याळमला त्यांनी दिलेली ही भेट आहे. मोहनलाल हे गातातही उत्तम.. ते एक उत्तम लेखक आहेत आणि सिनेमाबाहेरच्या जगात ते एक यशस्वी उद्योजकही आहेत. सव्वा तिनशेपेक्षा जास्त सिनेमे केलेल्या लोलेट्टांच्या सगळ्याच सिनेमांचा आणि पुरस्कारांचा उल्लेख करणं केवळ अशक्यप्राय आहे. त्यासाठी तुम्ही त्यांचा विकीपीडिया वाचा. शे पाचशे शब्दांमध्ये मोहनलाल यांच्याबद्दल बोलण्याचं साहस मी करणार नाही. जगातल्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांच्या यादीत ना शाहरूख खानचं नाव आहे ना अमिताभ बच्चन (दोघांप्रती आदरभाव) यांचं नाव आहे. दोन मल्याळम सुपस्टारची नावं येतात, एक मामुट्टी आणि दुसरे आपले मोहनलाल. आज लालेट्टा वयाची फक्त साठी (60 वर्षे) पूर्ण करताहेत. अजून बरंच मैदान गाजवायचं आहे. जगप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर रेनातो बर्ता यांनी वानप्रस्थम सिनेमाचं छायाचित्रण केलंय. त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. रेनातो बर्ता म्हणतात "मोहनलाल यांनी जगात चुकीच्या ठिकाणी जन्म घेतला. मोहनलाल यांना हवी ती प्रसिद्धी इथला सिनेमा देऊ शकला नाही, त्यामुळे त्यांच्या कलात्मक प्रतिभेचं इथे शोषण झालं" पण काळ बदलतोय. प्रादेशिक सिनेमा आता सोशल प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध आहे. त्याला आता भाषेचंही बंधन राहिलेलं नाही. साऊथच्या सिनेमांमध्ये क्लास आणि मास अशा सर्वच लोकांचं गेल्या 40 वर्षांपासून मनोरंजन करणाऱ्या साठीतल्या या तरूण अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Birth Day पद्मभूषण, लेफ्टनंट कर्नल मोहनलाल विश्वनाथन नायर..
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget