एक्स्प्लोर

राज ठाकरे यांना अक्षयकुमारच्या चाहत्याचं पत्र

तुम्ही अभिनेता अक्षय कुमारबद्दल म्हणालात की, तो भारतीय नागरिक नसून कॅनेडियन आहे. खरंच या भाषणात हा उल्लेख करणं योग्य होत का?

माननीय, श्री. राज ठाकरे साहेब, शिवतीर्थावरील तुमचे भाषण ऐकले. खूप छान झालं. त्या सभेत तुम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही जे मुद्दे मांडता, ते खूप महत्वाचे असतात आणि ते मुद्दे जर खरंच अंमलात आले, तर खरंच आपल्या महाराष्ट्रात खूप चांगला बदल घडू शकतो. पण साहेब, त्या भाषणात तुम्ही अभिनेता अक्षय कुमारबद्दल म्हणालात की, तो भारतीय नागरिक नसून कॅनेडियन आहे. खरंच या भाषणात हा उल्लेख करणं योग्य होत का? असो. अक्षय कुमार हा नागरिकत्वाने कॅनेडियन आहे. अक्षय कुमारचा अभिनय, तसेच भारत आणि कॅनडामधील सामाजिक काम बघून त्याला कॅनडा सरकारने २००८ साली 'ऑनररी डॉक्टरेट' या मानद पदवीने गौरवलं. बहाल केली. (Honorary Doctorate Of Law by the university of windsor in Ontario, Canada for his outstanding work in the film industry and contribution to social work. ) मुळात कोणत्या देशाचे नागरिकत्व घ्यायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याही पलिकडे आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल, अक्षय कुमार त्याने आपल्या भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी बहुमोल मदत केली आहे. आणि त्याने जे काही काम केले आहे, ते एवढे उत्तुंग आहे की त्याची पाठ थोपटायला हवी. पण साहेब, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा साधा उल्लेख सुद्धा नाही केलात. साहेब, अक्षय कुमार भारतीय नसून कॅनेडियन आहे, ही माहिती कशी तुम्हाला मिळाली, तशीच तुम्हाला त्याने केलेल्या कामांची माहिती सुद्धा मिळाली असेल. मग त्या कामांचा पुसटसा उल्लेख सुद्धा तुम्ही केला नाहीत. हे माझ्यासारख्या लाखो फॅन्ससाठी निराशाजनक आहे. १. महाराष्ट्रातील दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या १८० कुटुंबियांना ९० लाख रुपये मदत म्हणून दिले. २. सलमान खानच्या बिईंग ह्यूमन या सामाजिक संस्थेला ५० लाखाची मदत दिली. ३. चेन्नईतील पूरग्रस्तांना एक कोटी रुपयांची मदत दिली. ४. अक्षय कुमार कित्येक वर्षांपासून मुंबईत महिलांसाठी सेल्फ डिफेंन्स ट्रेनिंग मोफत देतोय. आणि आतापर्यंत तब्बल ५ हजाराहून अधिक महिला तेथे ट्रेन झाल्या आहेत. ५. ऑगस्ट २०१६ मध्ये शाहिद जवानांच्या (BSF) कुटुंबियांना ८० लाखाची मदत केली. ६. मार्च २०१७ मध्ये शाहिद झालेल्या जवानांच्या (CRPF) कुटुंबियांना १ कोटी ८ लाखांची मदत दिली. (१२ कुटुंबांना प्रत्येकी ९ लाख रुपये) ७. नोव्हेंबर २०१६ मध्ये जेव्हा अक्षय कुमारने विदर्भातील यवतमाळ या गावाची कहाणी ऐकली की, दुष्काळाला शेतकरी कंटाळून तेथील शेतकरी आत्महत्या करत आहेत. तेव्हा अक्षयने त्वरित महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन ते गाव दत्तक घेतले. ८. आपल्या शाहिद जवानांच्या कुटुंबियांना मदत व्हावी म्हणून bharatkeveer.gov.in या नावाने वेब पोर्टल सुरू केलं आणि जेणेकरून प्रत्येक कुटुंबला १५ लाख रुपये मदत मिळेल. ९. एप्रिल २०१७ मध्ये सिनेमात जे डब रोल करतात आणि जे जीवाची बाजी लावून अॅक्शन स्टंट करतात, त्यांच्यासाठी प्रत्येकी ६ लाखाचा मेडिकल इन्शुरन्स सुरू केला. १०. २०१७, गेल्या दिवाळीत एकूण १०३ शाहिद जवानांच्या घरी अक्षय कुमारने दिवाळी फराळ, आणि २५ हजारचा चेक भेट म्हणून दिली होती. राज साहेब, हे सर्व काही तुम्ही ज्याला कॅनेडियन नागरिक म्हणता, त्या अक्षय कुमारने केले आहे. कारण अक्षयने सामाजिक काम करताना देश किंवा नागरिकत्व पहिले नाही, माणूस पहिला. कारण सारी मदत त्याने माणुसकीच्या नात्याने केली. मग आपणही त्याच्याकडे माणूस म्हणून न पाहता कॅनेडियन म्हणून का पाहता? अजून बऱ्याच गोष्टी आहेत. खूप बोलता येईल. पण आता नको. साहेब, काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला भेट दिली होती. माझा कट्टा या कार्यक्रमात त्याने दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी त्याने महाराष्ट्रासाठी संपूर्ण त्याचे विचार आणि दृष्टिकोन व्यक्त केले होते. ते तुम्ही एकदा बघितलात तर नक्कीच तुम्हाला कळेल. (माझा कट्टाची लिंक : ) साहेब शेवटी एकच सांगतो, मदर तेरेसा असो भगिनी निवेदिता असो, आपल्या देशाने कधीच कुणाला परके मानले नाही. करण आपल्या देशात व्यक्ती नव्हे, व्यक्तीचे कार्य बघितले जाते, माणुसकी पहिली जाते, प्रामाणिकपणा पहिला जातो...मग अक्षय कुमारकडेही आपण माणुसकी, प्रामाणिकपणा आणि दानशूर व्यक्ती म्हणून का पाहत नाही? आणि तसेही, कॅनेडियन नागरिकत्व असले म्हणून त्याने केलेल्या भारतातील सामाजिक कामांचे महत्व कमी होत नाही. प्रथमेश मोरे #WeSupportAkshayKumar
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Murlidhar Mohol : माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अश्रू  अनावर
माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अश्रू अनावर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Murlidhar Mohol On Girish Bapat : गिरीश बापटांचं मताधिक्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न : मोहोळMurlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहनRaosaheb Danve on Jalna Loksabha : 4 लाख मतांनी निवडणूक जिंकून येईल, रावसाहेब दानवेंना विश्वासAllu Arjun Hyderabad voting : चौथ्या टप्प्यातील मतदान, अल्लू अर्जूनने बजावला मतदानाचा हक्क

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Murlidhar Mohol : माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अश्रू  अनावर
माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अश्रू अनावर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Sanjay Raut: मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा, संजय राऊतांचा आरोप
मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डसच्या हातात पैशांनी भरलेल्या बॅगा, संजय राऊतांचा आरोप
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Embed widget