एक्स्प्लोर

गोविंदराव तळवलकर : पत्रकारितेतला ऋषी!

शक्यता अशी आहे की, आजच्या नव्या वाचकाला किंवा पत्रकारितेमध्ये उमेदवारी करत असलेल्या तरुणांना कदाचित गोविंदराव तळवलकरांविषयी पुरेशी माहिती नसेल. तळवलकरांची विद्वत्ता, त्यांचा व्यासंग, त्यांचे भाषाप्रभुत्व, सडेतोड भूमिका घेत जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तुटून पडण्याची त्यांची खासियत, तरीही सर्वपक्षीय राजकारण्यांच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड प्रमाणात असणारा आदरयुक्त दरारा आणि मराठी समाजमनावर असलेला त्यांचा विलक्षण प्रभाव... तळवलकरांची ही सारी रुपे पाहात माझी पिढी मोठी झाली आणि पत्रकारितेमध्ये आली. त्यामुळे आज त्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकल्यावर आपला पोषणकर्ता आता उरला नाही, अशी भावना माझ्या पिढीच्या पत्रकारांच्या मनात निर्माण झाली तर त्यात नवल नाही. तळवलकरांसोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला कधी मिळाली नाही. पण कळायला लागल्यापासून किंवा वाचायला शिकल्यापासून त्यांचे लिखाण वाचून माझ्यासारखे असंख्यजण मोठे झाले. पंडित नेहरू, जॉर्ज ऑर्वेल, आर्थर कोस्लर, एम. एन. रॉय, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, यशवंतराव चव्हाण यांचे मोठेपण त्यांच्यामुळेच त्या वयामध्ये कळले. त्याचबरोबर, व्यक्तिगत आयुष्यात खूप आदराची भावना असूनही यशवंतरावांच्या विरोधात ठोस भूमिका घेणारे किंवा व्यक्तिगत आयुष्यात निखळ मैत्री असूनदेखील मटामधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर सडकून टीका करणारे गोविंदरावही याच काळात पाहायला मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशाची घडण सुरू होत असताना १९५० च्या सुमारास गोविंदराव तळवलकर पत्रकारितेमध्ये आले आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तब्बल ६७ वर्षे सक्रीय राहिले. तळवलकरांची वैचारिक बैठक पक्की होती आणि भाषेवर हुकूमत होती. त्यामुळेच की काय, अन्य कुठल्यातरी नियतकालिकांमधले त्यांचे लिखाण वाचून लोकसत्ताचे तत्कालीन संपादक ह. रा. महाजनी यांनी तळवलकरांना आपल्याकडे बोलावून घेतले. कै. ह. रा. महाजनी (मागच्या पिढीतील अभिनेता रवींद्र महाजनींचे वडील) हे स्वतः रॉयवादी होते आणि तळवलकरही रॉयवादी. त्यामुळे, आपल्या विचारांचा तरुण पत्रकार म्हणून महाजनींनी त्यांना लोकसत्तात बोलावले असावे. पण नंतर त्यांनी तळवलकरांना मनसोक्त लिहिण्याचीही भरपूर संधी दिली. त्याची सुरुवातही नोकरीच्या पहिल्याच दिवशी झाली, जेव्हा जेमतेम २३-२४ वर्षांच्या तळवलकरांना चक्क अग्रलेख लिहावा लागला! लोकसत्तासारख्या तेव्हाही प्रतिष्ठीत असलेल्या वृत्तपत्रामध्ये पहिल्या दिवशी नवख्या उमेदवाराने अग्रलेख लिहिण्याची ती कदाचित पहिली आणि शेवटचीच वेळ असावी. तळवलकर ते करू शकले कारण त्यांचा वैचारिक पाया भरभक्कम होता आणि त्याला टिळकांसारखीच शैलीदारपणाची जोडही होती. बारा वर्षे लोकसत्तात काढल्यानंतर ते महाराष्ट्र टाइम्समध्ये आले आणि थोड्याच काळात मटाचे संपादक झाले. १९९६ पर्यंत तब्बल २७ वर्षे ते संपादकपदी होते. ज्या कालखंडाची स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेचा सुवर्णकाळ म्हणूनच नोंद होईल. या काळात, त्यांनी आपल्या वाचकांचे वैचारिक उन्नयन होईल यासाठी शक्य ते सगळे काही केले. जगाच्या पाठीवर जे जे उत्तम, उदात्त असेल ते ते आपल्या वाचकांपर्यंत नेण्याची भूक तळवलकरांना होती. त्यापोटी, इंग्रजीतील उत्तम लेखक, विचारवंत यांची मराठी वाचकांशी ओळख करून देण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. त्यातून आपल्या वाचकांची यत्ता वाढती राहील याची दक्षता त्यांनी घेतली. गोविंदराव तळवलकर : पत्रकारितेतला ऋषी! ऐंशीच्या दशकामध्ये सांगलीसारख्या शहरात किंवा आटपाडीसारख्या छोटेखानी गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येकासाठी महाराष्ट्र टाइम्स हीच जगाची खिडकी होती. त्या खिडकीतून दिसेल तेवढेच जग आम्हाला कळत होते, त्यातील ताणेबाणे समजत होते आणि नव्या प्रवाहांची ओळखही आम्हाला होत होती. त्या काळात ना टीव्ही होते, ना कॉम्प्युटर, ना इंटरनेट वा मोबाईल फोन! माहिती मिळणे किंवा मिळवणे हे अतिशय कर्मकठीण काम होते आणि त्यासाठी दोनच मुख्य साधने होती – गावातील वाचनालये किंवा रोजचा महाराष्ट्र टाइम्स! तळवलकरांना बहुधा याची जाणीव होती. आपल्या वाचकाला आणि पर्यायाने समाजाला सुजाण करण्याची नैतिक जबाबदारी आपली असल्याच्या कर्तव्यबुध्दीतून ते लिहित गेले आणि महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग समृद्ध होत गेला. त्यातून महाराष्ट्र टाइम्सलाही एका अनौपचारिक विद्यापीठाचे रूप मिळत गेले. तळवलकरांचे शैलीदार अग्रलेख ही त्यांच्या वाचकांच्या मनाची मशागत करणारी दररोजची मेजवानी असे. हातात सोटा घेऊन महाराष्ट्रावर जागता पहारा ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. चांगल्याला चांगले म्हणण्याचे दातृत्व त्यांच्याकडे होते. पण हे काम ते हातचे राखून करत. पण चुकीचे काम करताना कोणी आढळला तर ते आपल्या सोटारूपी लेखणीतून ते त्या व्यक्तीवर अक्षरशः तुटून पडत. मग समोरची व्यक्ती यशवंतराव किंवा एसेम जोशी असोत, शरद पवार वा ए. आर. अंतुले असोत किंवा बाबा आमटे वा शिवाजीराव भोसले! जेव्हा-केव्हा ते तडाख्यात सापडले तेव्हा गोविंदरावांनी त्यांना आपल्या सोट्याचा प्रसाद दिला. एका अर्थाने गोविंदराव ब्रिटिशच होते. उत्तर आयुष्यात ते अमेरिकेत स्थायिक जरी झाले तरी त्यांच्या स्वभावामध्ये ब्रिटिशपणाचे सारे गुणावगुण अगदी ठासून भरले होते. मुळातच ते मितभाषी होते. कोणी सलगी करू पाहिली तर जागीच फटकारत. एकदा समाजवादी चळवळीत वावरणारी पुण्याची एक महिला कार्यकर्ती गोविंदरावांना भेटायला गेली. मुद्द्याचे बोलून झाल्यावर उठता उठता म्हणाली, बाकी वहिनी कशा आहेत? तळवलरांनी तिरकस आवाजात विचारले, कोण वहिनी? त्यावर या बाई म्हणाल्या, वहिनी म्हणजे मिसेस तळवलकर... त्यावर तळवलकर ताडकन म्हणाले, त्या तुमच्या वहिनी कधीपासून झाल्या? उगाच नाती जोडण्याचा प्रयत्न करू नका! गोविंदराव तब्बल पाच दशके वृत्तपत्रीय जगतामध्ये सक्रीय होते. पण तरीही त्यांच्यामधला इतिहास संशोधक, अभ्यासक संपला नाही. समकालीन इतिहासावर त्यांनी विपुल लेखन केले. त्यांची विराटज्ञानी न्या. रानडे, नौरोजी ते नेहरू, टिळक दर्शन, सत्तांतर, बदलता युरोप आदी पुस्तके याची साक्ष देतील. त्यांना ब्रिटनविषयी जेवढे प्रेम होते तेवढीच रशियाविषयी उत्सुकता होती. त्यामुळे सोव्हिएत साम्राज्याची पडझड झाल्यानंतर त्यांनी चार खंडांमध्ये या साम्राज्याच्या उदय आणि अस्ताचे केलेले विश्लेषण जागतिक दर्जाचे होते. तळवलकरांनी लिहिण्यावर आयुष्यभर प्रेम केले. आत्ता वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत ते लिहिते राहिले. महाराष्ट्रातील बारीकसारीक घडामोडींचा मागोवा ठेवत जे जे गैर घडेल त्यावर अमेरिकेत बसून टोचा लावत आले. वयोपरत्वे त्यांच्या हातातील सोट्याला थोडा मऊपणा आला होता हे खरे, पण चुकीचे घडल्यावर तो सोटा चालवण्याचे त्यांनी कधी थांबवले नाही. या वयामध्ये हे करत राहणे त्यांच्यासाठीही अवघडच होते. प्रकृती फारशी साथ देत नव्हती. डोळ्यांचे विकार बळावले होते. आठवड्यातून दोनदा डोळ्यांमध्ये इंजेक्शन्स घ्यावी लागत. ते सगळे सहन करूनही गोविंदराव लिहिते राहिले. कारण महाराष्ट्रावर त्यांचे प्रेम होते. आयुष्यातील तब्बल ६९ वर्षे त्यांनी महाराष्ट्राला सुसंस्कृत बनवण्याचे काम केले. ते सांस्कृतिक, सामाजिक महाराष्ट्राचे ते पहारेकरीही राहिले आणि हे करता करता ते ऋषिपदाला पोहोचले.
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget