एक्स्प्लोर

बीईंग अँकर

अँकर्सच्या खांद्यावर चॅनेल्सची खूप मोठी मदार असते. कारण न्यूज चॅनेलचा ते चेहरा असतात. हा चेहरा चांगला, अपीलिंग, हुशार, हजरजबाबी आणि जनतेशी कनेक्ट होणारा असणं अत्यंत गरजेचं असतं.

काही दिवसांपूर्वीच दक्षिणेकडील एका न्यूज चॅनेलच्या अँकरने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली, आमच्या न्यूजच्या भाषेत बोलायचं तर 30 सेकंदाचं वेटेज असलेली क्राईम न्यूज. पण यानंतर या अँकरच्या खासगी आयुष्याबद्दल आणि तिच्या सुसाईड नोट बद्दल वाचनात आलं. न्यूज अँकर्सच्या ऑफ-स्क्रीन लाईफबद्दल प्रश्न आणि चिंता निर्माण होईल, अशी ही घटना. एवढं कमी म्हणून की काय त्या तामिळनाडूच्या व्ही शेखरनंही आपल्या अकलेचे तारे तोडले. वरिष्ठांची शय्यासोबत केल्याशिवाय अँकर बनता येत नाही, असा शोध यानं लावला, तेव्हा रहावलंच नाही.. आणि हा पसारा लिहायला घेतला आम्ही अँकर्स ही तशी न्यूज इंडस्ट्रीमधील सर्वाधिक ग्लॅमर मिळणारी मात्र अल्पसंख्याक जमात. म्हणजे एखाद्या न्यूज चॅनेलचा पसारा साधारण 500 जणांचा असेल तर त्यात फार तर 7-8 अँकर असतात. पण या अँकर्सच्या खांद्यावर चॅनेल्सची खूप मोठी मदार असते. कारण न्यूज चॅनेलचा ते चेहरा असतात. हा चेहरा चांगला, अपीलिंग, हुशार, हजरजबाबी आणि जनतेशी कनेक्ट होणारा असणं अत्यंत गरजेचं असतं. माध्यमातल्या बहुतांश जणांना आणि माध्यमांबद्दल थोडीफार माहिती असलेल्यांना ‘अँकर काय करतात’ या प्रश्नाचं एक ढोबळ उत्तर माहित असतं, ते म्हणजे ‘अँकर समोरच्या टेलीप्रॉम्पटरवर लिहीलेलं वाचतात’. आजकाल अँकर्सचं काही चुकलं असेल तर ती क्लिप सोशल मीडियात व्हायरल करणं हा एक ट्रेंड झालाय. चॅनेलवर तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टीत जर एखादी चूक असेल तर त्याचा दोष बिनधास्तपणे तुम्ही अँकरला देता. तो भार अँकरला स्वतःच्या खांद्यावर पेलावा लागतो. त्यात एखादी चुकीची क्लिप व्हायरल होणं म्हणजे तर ग्रुप असॉल्ट सारखंच असतं. तुम्ही ती क्लिप पाहता. अँकरला दूषणं देता आणि पुढे ढकलता. मात्र अँकरला त्यानंतर काही-शे लोकांना या व्हायरल क्लिपमागचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. कारण अँकर्स म्हणजे चॅनेलवर दिसणारे चेहरे त्यामुळे अर्थातच अँकर्सना फॉलोअर्सची संख्या जास्त असते. प्रथमदर्शनी या सगळ्यात काय चॅलेंज आहे, प्रॉम्पटर तर वाचायचा असतो.. तो देखील सरळ वाचता येत नाही का... इतका साधा सरळ प्रश्न तुम्हाला पडला असेल, हो ना..? पण अँकरचं दुःख आणि कसरत अँकरलाच माहित. न्यूज चॅनल्सची धावाधाव 24 तास सुरु असते. अँकर्ससह सर्वच कर्मचारी त्यामुळे शिफ्टमध्ये काम करतात. यात दिवसातले पहिले वार छातीवर झेलतात मॉर्निंग अँकर्स. यांचा शनिवारवाड्यावर जाहीर सत्कार व्हावा असं मला अनेकदा वाटतं. सकाळी 5-6 वाजता यांची शिफ्ट सुरु होते. त्यात घर ऑफिसपासून दूर असेल तर कोंबड्याच्या आधी म्हणजे 3-3.30 वाजता उठून ऑफिससाठी निघावं लागतं. त्यात सकाळची बुलेटीन थुंकीशोषक बुलेटीन असतात. थुंकीशोषक अशासाठी, एकतर अघोरी वेळेत काम करायचं, बरं नुसतं काम असतं तर ठीक पण इथे सुजलेले डोळे, ओघळलेले गाल वगैरे गोष्टी लपवून फुल्ल एनर्जेटीक परफॉर्मन्स हवा असतो. त्यात घरुन निघताना चहा मिळाला तरच, नाहीतर ऑफिसच्या कँटीनमध्ये मिळतोच असं नाही. सतत बोलण्यामुळे वेळेआधी भूक लागलेली असते. पण सकाळी कोरड्या बिस्कीटाशिवाय काहीही मिळत नाही. अक्षरशः तोंडातली थुंकीसुद्धा आटते की काय असं वाटतं.. म्हणून हे सकाळचे थुंकीशोषक बुलेटीन. बरं या बुलेटिन्सना टीआरपी चांगला असतो. त्यामुळे ते कॅज्युअली पण घेऊन चालत नाही. दुपारच्या अँकर्सची निराळी आव्हानं असतात. दहा वाजल्यानंतर दिवसभरातलं बरंच काही घडायला सुरुवात होते. त्यामुळे ब्रेकिंग न्यूजचं वजन यांना आपल्या खांद्यावर पेलावं लागतं. त्यात एखाद्या दिवशी संजूबाबाची कोठडी, सल्लूचा निकाल, अमक्या ढमक्याची रॅली असलं की संपलंच, जेवण सोडा साधं पाणी वेळेत प्यायला मिळालं तरी नशिब असतं.. संध्याकाळच्या अँकर्सची तऱ्हा त्याहून भारी. रेग्युलर बुलेटीन आलेच पण त्यासोबत यांच्या विश्लेषक बुद्धीची परीक्षा रोज घेतली जाते. रोज चर्चेला नवा विषय. नवे पाहुणे, नव्या चर्चा, नवा अभ्यास, नवे मुद्दे, नवी भांडणं (वैचारिक) आणि बरंच काही. रोज काय विषय वाढून ठेवलाय याचा नेम नसतो. त्यामुळे पॉर्न टू पॉलिटीक्स असा भयंकर विस्तृत आवाका यांच्या अभ्यासाचा असतो (तसा तो प्रत्येक अँकरचा असावा हे माझं प्रांजळ मत आहे). हे अँकर्स ऑफिसला आल्यापासून याचं डोकं रात्री 10 नंतरच शांत होतं. कारण तेव्हा प्रश्न संपलेले असतात आणि दिवसभराची आवराआवरी सुरु होते. बरं काम संपलं म्हणून रिलॅक्स होता येत नाही. कारण रात्री काही घडलंच तर रात्रभर ऑफिसला मुक्काम ठरलेला असतो. मी या तिसऱ्या प्रकारात मोडते. अँकर, मग तो दिवसातल्या कोणत्याही प्रहरात काम करत असो, त्याच्यासमोर नवं आव्हान असतंच. त्याच्या सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींच्या अभ्यासाची कसोटी रोजच लागत असते. समोरच्याला वाटतं अँकर काय समोर आयतं मिळालंय ते वाचायचं काम करतो. पण असा विचार करणाऱ्यांना माझं चॅलेंज आहे, एकदा प्रॉम्पटर वाचून बघाच. अर्ध्या तासात तुमचं डोकं दुखायला लागेल याची खात्री मी देते. समोर सतत हलणारी अक्षरं वाचणं हा केवळ डोळ्यांनाच नाही तर मेंदूलाही थकवा देणारा प्रकार असतो. त्यातही तुमची विवेकबुद्धीही शाबूत ठेवावी लागते. समजा बातमी लिहिताना काही चूक झाली. एखादा संदर्भ किंवा एखाद्याचं नाव, पद चुकीचं लिहिलं गेलं तर ते स्वतः सुधारुन घ्यायचं असतं. माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा, एकदा असंच मी दिवसातलं शेवटचं बातमीपत्र वाचत होते. रात्री सव्वा अकरा वाजता समोर वाक्य होतं ‘देशाचे राष्ट्रपती मनोहर पर्रिकर आणि गोव्याचे मंत्री उपस्थित होते’. मी दोन सेकंदाचा पॉज घेतला.. मग लक्षात आलं की देशाचे राष्ट्रपती आणि मनोहर पर्रीकर यांच्यात स्वल्पविराम राहून गेलाय.. त्या दोन सेकंदात या वाक्यात काय चुकलंय ते ओळखून त्याप्रमाणे स्वतःच्या मेंदूत त्या वाक्याचे बदल करुन ते वाक्य बोलायचं असतं.. आता सांगा सोपं आहे...? अनेकदा ब्रेकिंग न्यूजचा सिलसिला सुरु राहतो, किंवा तुमचा अभ्यासाचा विषय सुरु असतो. एखाद्या वेळी संपादक सांगतात हा/ही अँकर बुलेटीन चांगलं करतायत त्यांनाच कंटिन्यू करा. अशा वेळी पोटात कावळे बोंबलत असतानाही चेहऱ्यावर ती भूक न आणता त्या बातम्या देणं सोपं आहे...? माझीच उपासमारीची एक कथा.. एके दिवशी रात्री 9 वाजता काही प्री-रेकॉर्डेड कार्यक्रम लागणार होता. जेवणासाठी तब्बल 1 तास मिळणार या विचारानंच मी खूष होते. इतक्यात बातमी आली की अब्दुल कलाम कार्यक्रमात चक्कर येऊन कोसळले, प्रकृती अत्यवस्थ आहे. मला 9 च्या हेडलाईन लाईव्ह घेऊन या ब्रेकिंग न्यूजची अपडेट द्यायची होती आणि 5 मिनिटांनंतर रेकॉर्डेड कार्यक्रम चालणार होता त्यामुळे त्यानंतर जेवणाचा मी निर्णय घेतला. मी 9 वाजता हेडलाईन वाचायला सुरुवात केली आणि तिसऱ्या हेडलाईनला प्रोड्यूसर कानात किंचाळला अब्दुल कलाम गेले आपल्याला बुलेटिन कंटिन्यू करायचं आहे. आणि पुढील दोन तास म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंत मी भुकेल्या पोटानं स्टुडिओत उभं राहून बुलेटिन केलं होतं. 11 वाजल्यानंतर तर भूकही मेली होती. बरं या दोन तासात देशाचे संरक्षण मंत्री, राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून, अणू शास्त्रत्रांपर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या होत्या. अर्थातच चिडचिड न करता, भूक मेंदूवर प्रभावी होऊ न देता, विवेक शाबूत ठेवून हे सगळं करायचं, सांगा सोप्पं आहे? लग्न झालेल्या अँकर्स त्यात विशेषतः स्त्री अँकर्सचे प्रश्न वेगळेच असतात. संसार आणि काम सांभाळणं ही अगदी तारेवरची कसरत. तुम्हाला एबीपी माझाची ज्ञानदा माहिती असेलच. ज्ञानदा चव्हाण ही ज्ञानदा कदम कधी झाली हे तुम्हाला उमगलंही नसेल. कारण आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल तिनं अगदी लीलया पेललाय. मी या लेखात आधी नमूद केल्या प्रमाणे जनरल शिफ्ट म्हणजे दिवसभरातलं हॅपनिंगचं ओझं खांद्यावर पेलणाऱ्या अँकर्सपैकी एक ज्ञानदा. तिच्या चेहऱ्यावर कायम एक आत्मविश्वास आणि फ्रेशनेस असतो. पण तुम्हाला माहितेय, ऑफिसमध्ये हॅपनिंगची गडबड सांभाळणारी ज्ञानदा ऑफिस ते घर दरम्यानच्या एक ते दीड तासाच्या प्रवासात गर्दीचा भार सोसते. सकाळी ऑफिसला येण्यापूर्वी नवरा, दीर आणि स्वतःचा डबा तयार करते आणि मग निघते. या शिवाय कुटुंबातल्या कमिटमेंट आज काय सोसायटी फंक्शन, उद्या काय चुलत सासूबाईंकडे पूजा, परवा आई-बाबांना भेटून जायचंय हे सगळं ती पाय रोवून हसतमुखानं सांभाळते. अर्थातच कुटुंबाची मदत असते पण एका जिवानं हे एवढं सगळं सांभाळणं, सांगा सोपं आहे? या सगळ्या तारेवरच्या कसरतीत कधी-कधी वाटतं आपण हरवत चाललोय का? आपल्याला भविष्य काय? या स्पर्धेत आपल्याला टिकता येईल? माझं अढळ पद कायम राहील? मिळणारा पगार संसारासाठी पुरेल? असे अनेक प्रश्न समोर येतात हो आमच्या.. पण तरी आम्ही तुम्हाला आमचा हसरा, आत्मविश्वासानं भरलेला चेहराच दाखवतो. सांगा हे सोपं आहे? आणि कोण कुठचा तो तामिळनाडूतला व्ही. शेखर म्हणतो 'संस्थेतल्या बिग बॉस सोबत झोपल्याशिवाय अँकर बनता येत नाही'. अहो अँकर बनणं ही एक तपश्चर्या आहे. ते काही तुमच्यासारखं राजकारणी बनण्याइतकं सोपं नसतं
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
Embed widget