Continues below advertisement
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

सोलापूरमधील शेतकरी, पूरग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी, 10 हजार अन् धान्य कधी मिळणार? खरीपाच्या पीक पाहणीबाबत मोठी बातमी
पूरग्रस्त गावात चमकोगिरी करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याला खडेबोल सुनावणारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कोण?
पूर आलेल्या गावात शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंची चमकोगिरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुनावलं, स्पष्टच बोलले...
पावसाचा धुमाकूळ! सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाला नदीचे स्वरुप, वाहतूक विस्कळीत
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय! रविवारी सुट्टीच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालय राहणार सुरु 
तलाठी म्हणाला सगळं पोहोचलंय, पूरग्रस्त म्हणाला एक बिस्कीटचा पुडासुदीक नाय मिळाला; कृषिमंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामस्थांचा आक्रोश
पेरलं होतं आशेचं बीज, पावसाने वाहून नेली सगळी स्वप्नं...; एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, सोलापूरवर शोककळा!
शेतकरी हा लाखांचा पोशिंदा,त्याला जगवण्याचे प्रयत्न सर्वांनीच करावे, राजकारण आणू नये : अजित पवार
सोलापूर-पुणे महामार्ग बंद, केवळ पायी पूल ओलांडण्याची परवानगी; प्रवासी ताटकळले, चालत निघाले
गावं जलमय, शेती पाण्याखाली; सीना नदीला पूर का आला? शिवसेना नेत्यानं सांगितलं कारण, चौकशीची मागणी
शेतकरी म्हणाले, दादा ओला दुष्काळ जाहीर करा, अजित पवार थांबवत म्हणाले, 'एक मिनिट...'
मराठवाड्यात पावसाचं थैमान! सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद, जनजीवन विस्कळीत
मराठवाड्यात जलप्रलय! गेल्या 70 वर्षाच्यात प्रथमच सीना नदीचे रौद्ररूप; पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा
सोलापूरमध्ये धडकी भरवणारा पाऊस, सीना नदीच्या पाण्यात 2 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कौतुकास्पद! नवरात्र उत्सवात डॉल्बीसह लाईट वापरास मनाई, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा हाहाकार! काढणीला आलेलं उभं पीक पाण्याखाली, बळीराज्यावर ओल्या दुष्काळाचे संकट
अतिवृष्टीचा दणका, बळीराजाला फटका! पिकात छातीएवढं पाणी, सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टक शेती पाण्याखाली 
सीना नदीला पूर; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला, शेती पिकांचं मोठं नुकसान, पुराच्या वेढ्याची दृश्यं
स्टेट बँकेवर सर्वात मोठा सशस्त्र दरोडा! बँक कामकाज संपत असताना एकाची रेकी, मास्कधारी साथीदार येताच बंदुकीच्या धाकात तासभरात 1 कोटी 4 लाख रोख अन् तब्बल 20 किलो सोनं लुटलं
'धुम' स्टाईलने स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत डांबलं, 1 कोटी रक्कम तब्बल 12-13 किलो सोनं लुटलं
शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी ते शेतमालाचे दर, बच्चू कडूंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, मुख्यमंत्री फडणवीसांवरही टीका  
हिंमत असेल तर दुबईत जाऊन पीच उखडून दाखवा; ज्योती वाघमारे कडाडल्या, ठाकरेंना काय काय म्हणाल्या?
सोलापुरात दिवसभर मुसळधार पाऊस अन् रात्री अफवांचा पूर; मगर दिसल्याच्या चर्चेने खळबळ, खोडसाळपणामुळे संपूर्ण यंत्रणा लावली कामाला, नेमकं काय घडलं?
कला केंद्रातील पूजाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; गोविंदकडे बंदुक कुठून आली? पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद
Sponsored Links by Taboola