Kumar Ashirwad IAS : धाडसी निर्णय घेणारा धडाकेबाज जिल्हाधिकारी! उद्ध्वस्त जमिनीच्या बदल्यात सरकारी जमिनीचा पर्याय, खरडवलेल्या शेतीला धरणांतून मोफत माती
Solapur Flood : सोलापुरातील मोडलेली शेती पुन्हा उभा करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरसावले असून शेतकऱ्यांना पर्यायी जमीन देण्यासाठी त्यांनी अभ्यास समिती गठीत केली आहे.

सोलापूर : मराठवाड्यातील पूरस्थितीने या भागातील शेतकरी पूर्ण मोडकळीस आला, त्यांचं होतं नव्हतं ते सगळं संपून गेलं. सोलापुरातही या पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशा स्थितीत या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (Kumar Ashirwad) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यांच्या शेतातील माती पूर्णपणे खरडून गेली आहे, ज्यांचे कायमस्वरुपी नुकसान झाले आहे त्यांना शेतीसाठी पर्यायी जमीन देऊन पुनर्वसन करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक अभ्यास समिती गठीत केली आहे.
सोलापुरातील पुरानंतर शेतीची भयावह स्थिती समोर आली. अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून जाऊन त्या ठिकाणी दहा-बारा फुटांचा खड्डा पडल्याचं समोर आलं. या शेतकऱ्याला सरकारी नियमानुसार जरी मदत दिली तरी त्यामुळे त्याचे झालेले नुकसान कधीच भरून निघणार नाही. त्यामुळेच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
Solapur Flood News : अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
कायमस्वरूपी नुकसान झालेल्या शेतीसाठी पर्यायी जमीन देऊन पुनर्वसन करता येईल का याच्या अभ्यासासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती गठीत केली आहे. अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालची ही समिती पुनर्वसन कायद्याचा अभ्यास करून एका आठवड्यात अहवाल देणार आहे. तो अहवाल जिल्हाधिकारी राज्य सरकारला पाठवणार आहेत.
Solapur Collector Decision : धरण आणि तलावातून माती मोफत
ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे त्यांना जवळच्या धरण किंवा तलावातून माती मोफत देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मनरेगा माध्यमातून माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मोफत माती देण्यात येणार आहे.
Kumar Ashirwad News : शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासन धावलं
पूरग्रस्त सोलापूरकरांची दिवाळी आनंदी करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. DPDC च्या निधीतून पूरग्रस्त भागातील 11 हजार कुटुंबाना दिवाळी किट वाटप करण्यात येणार आहे. तर शासकीय कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक मदतीतून तयार केलेले किटचेही वाटप सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते होनमुर्गी गावात हे किट वाटप झाले.
टूथब्रश, टूथपेस्ट, अंघोळीचे आणि कपडे धुवायचा साबण, मेणबत्ती, केसाचे तेल ते गहू, साखर, हरभरा डाळ, तेल, गूळ अशा दिवाळीला लागणाऱ्या 25 वस्तू या दिवाळी किटमध्ये आहेत.
जिल्हा नियोजन निधीतून पूरग्रस्ताना पुढच्या आठवड्यापासून किट वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा पुरवठा विभागामार्गफत बाधित कुटुंबाना हे किट वितरित केले जाणार आहे. याचं आठवड्यात किट साहित्य खरेदी प्रक्रिया केली जाणार असून दिवाळीपूर्वी बाधित कुटुंबियांना किट दिले जातील
याशिवाय जिल्हा परिषद कर्मचारी, सहकारी बँक विविध संस्थाच्या माध्यमातून जमा झालेल्या सुमारे 1 कोटी 60 लाख रुपयांचे देखील मदत किट तयार करण्यात आले आहेत.
अक्षयपात्रा या नामांकित संस्थेच्या माध्यमातून बाधित कुटुंबाना किट वाटप करण्यात येत आहेत. पुढील तीन-चार दिवसात सर्व बाधित कुटुंबाना हे किट वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे सोलापुरातील पूरग्रस्त भागातील बाधित कुटुंबियांची जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात सोय होण्यास मदत होणार आहे.
ही बातमी वाचा:
























