अतिवृष्टी, महापूर ते ओला दुष्काळ, राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, दिवाळी आधी शेतकऱ्यांना पैसे द्या, अन्यथा...
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यावेळी त्यांनी स्वतः ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केळी होती असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले.
Raju Shetti : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यावेळी त्यांनी स्वतः ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केळी होती. आता तेच म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही. त्यांनी दुष्काळ जाहीर करावा एवढी आमची मागणी आहे, ओला कोरडा त्यांनी पाहावं असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी टीका केली. दुष्काळ जाहीर करता येतं नाही तर विरोधी पक्षनेता असताना त्यांनी का दिशाभूल केली? असा सवलाही शेट्टींनी केला. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्याची बाजू घ्यायची आणि सत्तेत आल्यावर मात्र विसरायचं हे राज्यकर्त्यांचे कामं झाल्याचे शेट्टी म्हणाले.
राज्यात अतिवृष्टीने थैमाण घातलं आहे. शेतकरी मोडून पडला आहे. धाराशिवमध्ये राणी बारकूल नावाच्या महिला आंदोलन करत आहेत. त्यांच्या सासऱ्याला अतिवृष्टीमुळे धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्या भगिनीची समजूत घालून उपोषण सोडायला लावलं. पाच ते सहा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लोकांची भेट घेतल्याचे राजू शेट्टी म्हणाले. शेतकऱ्याला आता आधाराची गरज आहे. पण सरकार मीठ चोळण्याचे काम करत आहे. सोलापुरात देखील प्रचंड नुकसान झाले आहे, माती वाहून गेलीय, विहिरी बुजल्यात. पिकांची गिनती करता येणार नाही अशी स्थिती आहे. जलसंपदा आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाचा अभाव यामुळे हे झाल्याचे शेट्टी म्हणाले.
जिल्हा प्रशासन मात्र गाफिल राहिलं
अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टी होणार याचा अलर्ट होता. पाणी सोलापूरला यायला 18 तास लागतात याची सर्व माहिती घेऊन नियोजन करता आलं असतं. जिल्हा प्रशासन मात्र गाफिल राहिलं किंवा जलसंपदा विभागाने त्याबद्दल माहिती दिली नाही. सरकारने अत्यंत तुटपुंजी मदत देण्याचं सांगितलं आहे असे शेट्टी म्हणाले.
माढा तालुक्यातील एका केळी उत्पादक शेतकऱ्याचे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले
माढा तालुक्यातील एका केळी उत्पादक शेतकरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्या शेतकऱ्याला किमान 25 लाख रुपये मिळाले असते. पण आता सगळं गेलं जमीन साफ करायला 30 हजार खर्च येईल असे शेट्टी म्हणाले. पण त्याला सरकार फक्त 17 हजार देईल, 25 लाख गेले साफ करायला लागणारे 30 हजार ही मिळणार नाहीत असे शेट्टी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना कळलं आहे की शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसा रस्त्यात आहे
सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं आणि शेतकऱ्यांचा काही संबंध आहे का? हे तपसायला पाहिजे. एकनाथ शिंदे यांना कळलं आहे की शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसा रस्त्यात आहे. अजित पवार यांच्या लीला काय सांगाव्यात? असा टोला देखील शेट्टींना लगावला. ऊस उत्पदक शेतकऱ्याकडून 15 रुपये कमी करण्याचा निर्णय यांनी घेतलाय. आधीच उसाचा उत्पादन घटलंय त्यामुळे हा फटका बसलाय. त्यात अजित पवार यांचा जिजया कर आहे असे शेट्टी म्हणाले.
केवळ सभा घेणं आणि आश्वासन यापलीकडे काहीही केले नाही. यांच्यावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही. शेतकरी आत्महत्या करतायेत आणि हे कोटी रुपये मंडपला खर्च करून केवळ कार्यक्रम करतायेत. एवढ्या पैशात एखाद्या गावाचा प्रश्न सुटला असता. जर असं राहिलं तर नेपाळ, बांगलादेश सारखा देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेट्टींनी दिला.
दिवाळी आधी शेतकऱ्यांना पैसे द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना दिवाळी करु देणार नाही
अजित दादा म्हणतात पैशाचे सोंग करता येतं नाही. सरकारकडे पैसा नसतील तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना का रेटण्याचा प्रयत्न होत आहे. सर्वाधिक महाग कर्ज घेऊन तुम्ही करताय. ह्या रस्त्याचा विषय बाजूला ठेवा ना आणि तेच पैसे पूरग्रस्ताना द्या. शेतकऱ्यांना दिवाळी आधी हे पैसे द्या. जर दिवाळी आधी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अधिकारी कोणालाच दिवाळी करु देणारं नाही असा इशारा शेट्टींनी दिला.

























