एक्स्प्लोर

Solapur BJP News: सोलापूरमध्ये तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला भाजप आमदाराची उपस्थिती, म्हणाला, 'दमदाटी करणाऱ्यांना लाथा घाला'

Solapur BJP News: सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भाजप आमदार विजय देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Solapur News: अलीकडच्या काळात राजकारणातील नेत्यांचा गुन्हेगारांशी असलेला संबंध हा चिंतेचा विषय असताना सोलापूरमधील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोलापूरमध्ये एका तडीपार गुंडाने (Tadipar Criminal) आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाजप आमदार विजयकुमार देशमुख (MLA Vijaykumar Deshmukh) यांनी उपस्थिती लावली होती. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन त्यांनी भाजपच्याच (BJP) शहराध्यक्षाला सुनावले. शहर अध्यक्षांचे वागणे चुकीचे आहे, असे विजयकुमार देशमुख यांनी म्हटले. तसेच बाहेरील पक्षातून भाजपमध्ये येऊन कार्यकर्त्यांना दमदाटी करणाऱ्यांना कमरेत लाथ घाला, असा सल्लादेखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे. यामुळे भाजप पक्षातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. 

सोलापूर आणि धाराशिवमधून तडीपार असलेल्या श्रीशैल हुळ्ळे याने आयोजित केलेल्या जनसंवाद बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख यांनी हजेरी लावली होती. समाजाची बैठक का घेतली असं काही लोकं म्हणतात, जर असं कोणी दमदाटी करत असेल तर त्याच्या कमरेत लाथ घाला, त्यात कसलीही हयगय करू नका. कोणीतरी कुठल्या तरी पक्षातून इकडं आमच्याकडं चमचेगिरी करत यायचं, इथं येऊन दादागिरी करत असेल तर खपवून घेऊ नका, आपण सगळे वीरशैव लिंगायत आहोत, असे देशमुख यांनी म्हटले.

भाजप कार्यकर्त्यांनी समाजाची बैठक घेऊ नये असे जर भाजप शहराध्यक्ष यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. मी स्वतः वीरशैव आहे, समाजाला एकत्रित करण्यासाठी मी एक काय दहा बैठक घेईन, समाजाचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास, असे विधान भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमात केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तडीपार करण्यात आल्यानंतर देखील शहरात फिरत असल्याने श्रीशैल हुळ्ळे विरोधात पोलिसांनी गुन्हा देखील नोंद केला आहे. त्यामुळे एका तडीपार गुंडाला पाठीशी घालत आमदार विजय देशमुख यांनी कार्यक्रमला उपस्थिती लावत केलेल्या विधानाची सध्या सोलापुरात जोरदर चर्चा रंगली आहे. मात्र, तडीपार गुंडासोबत व्यासपीठावर बसणाऱ्या आणि स्वत:च्याच पक्षावर दुगाण्या झाडणाऱ्या विजय देशमुख यांच्यावर भाजप नेतृत्त्वाकडून काही कारवाई केली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

इतर बातम्या

बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी वादग्रस्त वक्तव्य बुमरँग, शिंदे गटातील सगळ्यांनी हात वर केले, आता रामदास कदमांची सारवासारव

जिथे मनसेने परप्रांतीयांच्या कानाखाली जाळ काढला, तिकडेच शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांकडून हिंदी भाषिकांसाठी पायघड्या, आयुक्तांना म्हणाले....

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar Land Scam : पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणी फडणवीस अजितदादा काय म्हणाले?
Pawar Land Politics: 'चौकशी होईपर्यंत राजीनामा द्या', Eknath Khadse यांची मागणी, Ajit Pawar अडचणीत
Ajit Pawar on Parth Pawar : पार्थच्या कथित जमीन घोटाळ्यावर अजित पवारांचे मोठे विधान
Omkar Beat Case :'ओंकार' हत्तीला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Parth Pawar Case : पार्थ पवार जमीन प्रकरणी चौकशी समिती गठीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत धावत्या लोकलमधून 4 जण खाली पडले; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule on Parth Pawar: पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Embed widget