सोलापुरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे, मराठा समाजाकडून स्वागत
सोलापुर शहरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयाचे मराठा समाजाकडून स्वागत करण्यात आले आहे.
Solapur : सोलापुर शहरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयाचे मराठा समाजाकडून स्वागत करण्यात आले आहे. सोलापूर शहरातील 7 पैकी 7 गुन्हे मागे तर सोलापूर ग्रामीणमधील 60 पैकी 49 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. सोलापूर ग्रामीण मधील उर्वरित 11 गुन्हे मागे घेण्याची देखील प्रक्रिया सुरु आहे.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेचे मराठा समाजाकडून स्वागत
सोलापुर शहरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. सोलापूर शहरातील 7 पैकी 7 गुन्हे मागे तर सोलापूर ग्रामीणमधील 60 पैकी 49 गुन्हे मागे घेतले आहेत. सोलापूर ग्रामीण मधील उर्वरित 11 गुन्हे मागे घेण्याची देखील प्रक्रिया सुरु झाली आहे. सोलापूर शहरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतल्याची पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी माहिती दिली आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेचे मराठा समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे.
मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता
मराठा समाजातील युवकांना कुणबी दाखले देण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू झाल्यानंतर आता मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय .सप्टेंबर 2025 पर्यंत दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत . याआधी मार्च 2025 पर्यंत दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली होती .आता या निर्णयामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईतील आंदोलनाच्या दरम्यान दाखल झालेले गुन्हेही मागे घेतले जाणार आहेत . आतापर्यंत 800 हून अधिक गुन्हे दाखल झाले असून त्यातील जवळपास 450 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत .मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनात ही एक महत्त्वाची मागणी होती. मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने सरकारने घेतलेला निर्णय यांची अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते . त्यानुसार, आंदोलनावेळी 5 लाख रुपयांच्या खाली नुकसान झालेल्या मराठा आंदोलकांचे गुन्हा मागे घेण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता . पाच लाखांच्या खालील जवळपास 400 ते 450 गुन्हे मराठा आंदोलकांवर दाखल आहेत .हे सगळे गुन्हे आता मागे घेतल्या जाणार असल्याने मराठा आंदोलकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशातच आता सोलापूर शहरातील 7 पैकी 7 गुन्हे मागे तर सोलापूर ग्रामीणमधील 60 पैकी 49 गुन्हे मागे घेतले आहेत. सोलापूर ग्रामीण मधील उर्वरित 11 गुन्हे मागे घेण्याची देखील प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळं मराठा आंदोलकांना एक प्रकारे मोठा दिलासा मिळाला आहे.






















