(Source: Poll of Polls)
Solapur Barshi news: बार्शीत हृदयद्रावक घटना, नदीत वाहून जाणाऱ्या चिमुकल्याला बापाने वाचवलं पण नदीने डेव्हिडला गिळलं
Solapur Barshi News : बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला येथे एक हृदयद्रवक घटना घडली आहे. यात पुराच्या पाण्यात बुडालेल्या 6 वर्षीय चिमुकल्याला वाचवताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Solapur Barshi News : राज्यात गेल्या 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने (Rain) सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. या पावसाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसला. दरम्यान मराठवाड्यातील (Marathwada Rain) धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आला होता. असे असताना हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहे. अशातच या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला येथे एक हृदयद्रवक घटना घडली आहे. यात पुराच्या पाण्यात बुडालेल्या 6 वर्षीय चिमुकल्याला वाचवताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला येथे काल (5 ऑक्टॉबर) दुपारी 2 च्या सुमारास हि हृदयद्रवक घटना घडलीय.
Solapur Barshi Accident News : चिमुकल्याला बापाने वाचवलं, पण....
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण उर्फ डेव्हीड सतीश बनसोडे असे 42 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. डेव्हीड आणि त्यांचा 6 वर्षीय मुलगा अनुग्रह हे धामणगाव दुमाला येथील नागझरी नदीवर असलेल्या कोल्हापूर बंधाऱ्याजवळ नदी पाहण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी चिमुकल्या अनुग्रहचा पाय घसरून तो पाण्यात पडला. यावेळी क्षणाचा ही विलंब न करता वडील डेव्हीड बनसोडे यांनी पाण्यात उडी मारली . अनुग्रहला पाण्याच्या बाहेर ढकलले. मात्र स्वतःला पाण्याच्या प्रवाहात पोहता न आल्याने गटांगळ्या खात ते पाण्यात बुडाले. यावेळी घटनास्थळी उपस्थित लोकांनी डेव्हीड याना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं.
हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ (Father Dies While Saving 6 Year Old Boy)
दरम्यान, डेव्हीड यांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर बार्शीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पाण्यात बुडालेल्या चिमुकल्या अनुग्रहला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. बार्शीत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जातेय.
Nanded News: शेतकरी माय-बापाच्या कष्टाचे लेकींनी केले सोने! दोन्ही मुली एमबीबीएससाठी ठरल्या पात्र
नांदेडच्या नायगांव तालुक्यातील किन्हाळा गावातील दोन मुली ह्या एमबीबीएससाठी पात्र ठरल्या आहेत. गावातील अल्पभूधारक शेतकरी हणमंत भोसले यांच्या ह्या मुली आहेत. हनुमंत भोसले यांना साक्षी आणि दिव्या अशा दोन मुली आहेत, मात्र या जोडप्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलींना शिक्षण दिलंय. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत मुलींनी रात्रंदिवस अभ्यास केला. त्यातून ह्या दोघी आता एमबीबीएससाठी पात्र ठरल्या आहेत. गरिबीची जाणीव ठेवत मुलींनी केलेल्या या कष्टाचे सर्वत्र कौतुक होतंय.
आणखी वाचा




















