Vastu Tips For Kitchen : तुमच्या घरात 'या' वस्तू कधीच कमी पडू देऊ नका; अन्यथा वाईट वेळ सुरु व्हायला वेळ लागणार नाही
Vastu Tips For Kitchen : वास्तूशास्त्रात किचनमध्ये कोणत्या गोष्टी कधीच रिकाम्या असू नयेत याविषयी सुद्धा सांगण्यात आलं आहे. अन्यथा तुम्हाला नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.
Vastu Tips For Kitchen : वास्तुशास्त्रात (Vastu Tips), स्वयंपाकघराच्या संबंधित देखील अनेक नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचं जर तुम्ही योग्य पालन केलं तर तुम्हाला त्याचे अनेक शुभ परिणाम मिळू शकतात. वास्तूशास्त्रात, तुमच्या स्वयंपाकघरात कधीच कोणत्याच गोष्टीची कमी पडू देऊ नका. अन्यथा तुम्हाला तुम्हाला नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. तसेच, घरात आर्थिक, आरोग्याच्या दृष्टीने आणि सुख-समृद्धीच्या दृष्टीने देखील अने समस्या निर्माण होऊ शकतात. स्वयंपाकघरातील हे पदार्थ नेमके कोणते ते जाणून घेऊयात.
'या' गोष्टी कधीच रिकाम्या ठेवू नका
अनेक लोकांची सवय असते की घरातील मसाले संपल्यानंतरच ते नवीन मसाले खरेदी करतात. पण, वास्तूशास्त्राच्या नियमांनुसार, ज्या पण भांड्यात तुम्ही मीठ ठेवता त्याला कधीच रिकामं ठेवू नका. यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मकता वाढू शकते. त्याचबरोबर स्वयंपाकघरात कधीही मोहरीचं तेल संपवू नका.
'या' गोष्टीची विशेष काळजी घ्या
हळद हा मसाल्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. हळदीशिवाय जेवणाला चव येत नाही. त्याचबरोबर हळदीचा वापर अनेक मंगल कार्यात, समारंभात देखील केला जातो. वास्तूनुसार, स्वयंपाकघरात हळदसुद्धा कधी कमी पडू देऊ नका. जर हळद संपायला आली असेल तर तिला वेळीच खरेदी करा. कारण, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
धन-संपत्तीबाबत समस्या वाढू शकतात
भारतीय संस्कृतीत पीठ हा आपल्या आहारातला एक महत्त्वाचा घटक आहे. वास्तूशास्त्रानुसार, घरात तांदूळ, गहू, पीठ असणं म्हणजे धनधान्याची बरकत असण्याचं लक्षण आहे. जर तुमच्या किचनमधील पीठ संपलं असेल तर तुमच्या मान-सन्मानात तडजोड होऊ शकते. त्याचबरोबर घरातील तांदूळही कधी कमी पडू देऊ नका कारण याचा थेट संबंध शुक्र ग्रहाशी आहे. यामुळे तुम्हाला पैशांच्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच, घरात सुख-शांतीदेखील राहत नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :