एक्स्प्लोर

Holi 2026: यंदा होळी 2 की 3 मार्चला? चंद्रग्रहण, भद्राकाळ मुळे तारखेबद्दल लोकांमध्ये गोंधळ, पंचांगकर्ते मोहन दातेंची अचूक माहिती

Holi 2026: 2026 वर्षात होळी कधी आहे? 2 की 3 मार्च? यंदा भद्रा आणि चंद्रग्रहणामुळे होळीच्या तारखेबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

Holi 2026: होळी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते. मात्र यावर्षी, होलिका दहन आणि धुलिवंदनच्या तारखेबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा, होळी 2 मार्च की 3 मार्च रोजी साजरी होणार, याबद्दल लोकांना शंका आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ग्रह-तार्‍यांच्या हालचाली, चंद्रग्रहण आणि भद्रा काळामुळे, 2026 मध्ये होलिका दहन आणि धुलिवंदनच्या तारखेबाबत अनिश्चितता आहे. 2026 मध्ये होलिका दहन कधी होईल? धुलिवंदन कधी आहे? यंदा चंद्रग्रहण आणि भद्रा मुळे होळीच्या तारखांवर काही फरक पडणार का? पंचांगकर्ते मोहन दाते यांनी याबाबत अचूक माहिती दिली आहे. ती जाणून घ्या..

होलिका दहन कधी आहे? यंदा चंद्रग्रहण, भद्राची सावली? (Holi 2026)

हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 वाजता सुरू होईल आणि 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:07 वाजता संपेल. अशाप्रकारे, 2 मार्च रोजी होलिका दहन केले जाईल. पंचांगानुसार, 3 मार्च रोजी पहाटे 1:25 ते 4:30 पर्यंत भद्रकाल चालेल. भद्रकाल दरम्यान पूजा करण्यास शास्त्रांमध्ये मनाई आहे. त्यामुळे 2 मार्च रोजी होलिका दहन करू शकता. 

खाली दिलेल्या VIDEO मध्ये पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सविस्तर माहिती दिली आहे....

 

होलिका दहन 2026 चा शुभ काळ

पंचांगानुसार, या वर्षी होलिका दहनाचा शुभ काळ 2 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50 पर्यंत असेल. या काळात योग्य विधी करून होलिका दहन करणे शुभ आणि फलदायी ठरेल.

धुलिवंदन कधी आहे?

यंदा 3 मार्च रोजी धुलिवंदनाचा सण साजरा केला जाईल.

3 मार्च रोजी चंद्रग्रहण, सुतक कधी सुरू होईल?

3 मार्च रोजी संध्याकाळी भारतात अंशतः चंद्रग्रहण होईल. त्याला ग्रस्तोदित म्हणतात, म्हणजेच ते आधीच सुरू झाले असेल. भारतीय वेळेनुसार, ग्रहण दुपारी 3:00 वाजता सुरू होईल आणि त्याचा शेवटचा वेळ 6:48 वाजता असेल. हे ग्रहण संध्याकाळी 6:00 वाजता स्पष्टपणे दिसेल. या ग्रहणाचा सुतक काळ सकाळी 9:00 वाजता सुरू होईल. अशा प्रकारे, ग्रहणाचा कालावधी 3 तास ​​27 मिनिटे असेल. हे चंद्रग्रहण भारत, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दिसेल.

हेही वाचा,

March 2026 Monthly Horoscope: सज्ज व्हा! मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींचा मार्च महिना गेम पालटणार! कसा जाणार महिना? पैसा, नोकरी, प्रेम...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 : राग, अहंकारासह शारदीय नवरात्रीत चुकूनही 'या' गोष्टी करू नका; देवी होईल नाराज, घरावर ओढावेल संकट
राग, अहंकारासह शारदीय नवरात्रीत चुकूनही 'या' गोष्टी करू नका; देवी होईल नाराज, घरावर ओढावेल संकट
Vastu Shashtra: तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 'या' देवतांचे फोटो नाही ना? जीवनात संकट येण्याचे एक मुख्य कारण? वास्तुशास्त्र...
तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 'या' देवतांचे फोटो नाही ना? जीवनात संकट येण्याचे एक मुख्य कारण? वास्तुशास्त्र...
Shardiya Navratri 2026 : नवरात्रीत 'या' 7 महत्त्वाच्या गोष्टी घरी आणा; देवीचा असेल कायम वास, सुखाचा होईल वर्षाव
नवरात्रीत 'या' 7 महत्त्वाच्या गोष्टी घरी आणा; देवीचा असेल कायम वास, सुखाचा होईल वर्षाव
Shani Sade Sati: शनि साडेसाती सुरू असताना सोनं घालावं की नाही? शनि-सूर्याच्या शत्रूचा जीवनावर मोठा प्रभाव? ज्योतिषशास्त्र सांगते..
शनि साडेसाती सुरू असताना सोनं घालावं की नाही? शनि-सूर्याच्या शत्रूचा जीवनावर मोठा प्रभाव? ज्योतिषशास्त्र सांगते..

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेशकुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेशकुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Embed widget