Shani Jayanti 2024 : आज शनी जयंतीला जुळून आलाय सर्वार्थसिद्धी योग! 'या' 3 राशींवर असणार शनीदेवाची कृपा, धनसंपत्तीत होईल अपार वाढ, हाती घेतलेलं कामही होईल पूर्ण
Shani Jayanti 2024 : शनिदेवाला कर्मफळदाता आणि न्यायदेवतेच्या रूपात मानले जाते. शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात.
Shani Jayanti 2024 : वैशाख महिन्याच्या अमावस्या तिथीला शनि जयंती (Shani Jayanti) साजरी केली जाते. शास्त्रानुसार असं म्हणतात की, या दिवशी सूर्यदेव आणि शनि देव यांचा जन्म झाला होता. अनेक लोक ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या तिथीला देखील शनी जयंती साजरी करतात. शनिदेवाला कर्मफळदाता आणि न्यायदेवतेच्या रूपात मानले जाते. शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात.
वैशाख महिन्यातील शनी जयंती आज साजरी केली जातेय. त्याचबरोबर आज सर्वार्थ सिद्धी योग देखी बनतोय. तसेच, शनी सध्या आपल्या मूळ कुंभ राशीत स्थित आहे त्यामुळे आजचा दिवस अनेक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीवर शनीदेवाची कृपा असणार आहे. या राशीच्या लोकांकडे पैशांची आवक वाढणार. तसेच, या दरम्यान तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली असणार आहे. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर कर्जाची परतफेड करण्यासाठी हीच ती योग्य वेळ आहे. कुटुंबीयांबरोबर तुमचे चांगले सलोख्याचे संबंध असतील. तुम्हाला नशीबाची पूर्ण साथ मिळेल. जे नोकरदार वर्गातील लोक आहेत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. नोकरदी पगारवाढ किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांवर देखील शनीदेवाची विशेष कृपा असणार आहे. या राशीच्या लोकांचा ओढा आध्यात्माकडे जास्त असेल. त्याचबरोबर धार्मिक गोष्टींकडेही नव्याने पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन तयार होईल. या दरम्यान तुम्हाला समाजासाठी काहीतरी चांगलं काम करावंसं वाटेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीला घेऊन जास्त चिंता करू नका. जर कठीण प्रसंग आलाच तर बुद्धिमत्ता आणि धैर्याने संकटावर मात करा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीची मूळ रास कुंभ आहे. त्यामुळे शनीची कुंभ राशीवर देखील कृपादृष्टी असणार आहे. या राशीच्या लोकांना काहीतरी नवीन करण्याची संधी मिळू शकते. शनीदेवाच्या कुंभ राशीत असल्याने तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडतील.मात्र, शनीच्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरु आहे. त्यामुळे थोडी अडचण निर्माण होऊ शकते. पण, तुमच्यावर शनीदेवाची कृपा असल्या कारणाने तुम्ही या संकटावर देखील मात करू शकाल. कुटुंबीयांबरोबर चांगला वेळ जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :