Vastu Tips : घरातील जिन्याखाली चुकूनही ठेवू नका 'या' 5 वस्तू; अन्यथा आयुष्यभरासाठी व्हाल कंगाल
Vastu Tips : वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊन घराचं निर्माण केलं तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
Vastu Tips For Home : प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात मेहनत करतो पण त्यात त्याला किती यश मिळेल हे त्याच्या मेहनतीबरोबरच त्याच्या नशीबावरही अवलंबून असते. धार्मिक मान्यतेनुसार, आपल्या भाग्याचा संबंध वास्तू शास्त्राशी (Vastu Shastra) देखील जोडण्यात आला आहे. जर, आपण वास्तूशास्त्राचे (Vastu Tips) नियम लक्षात घेऊन घराचं निर्माण केलं तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. आज आपण अशा 5 गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या घरातील जिन्याच्या खाली चुकूनही ठेवू नयेत.
घरातील जिन्याखाली कोणत्या गोष्टी ठेवू नयेत?
कुटुंबियांचा फोटो
अनेकदा आपण पाहिलं आहे की, काही लोक घरातील जिन्याच्या खाली रिकाम्या जागा दिसल्यास कुटुंबियांचा फोटो लावतात. वास्तू शास्त्राच्या नियमांनुसार, हे फार चुकीचं आहे. अशा पद्धतीने जिन्याच्या खाली कुटुंबियांचा फोटो लावल्याने घरात वाद सुरु होतात. घरात अशांतता पसरते.
डस्टबिन
वास्तू शास्त्रात सांगितल्याप्रमाणे घराच्या जिन्याखाली कधीच डस्टबिन ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. तसेच, याचा परिणाम घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्यावरही होतो.
शौचालय बनवू नका
घराच्या जिन्याखाली चुकूनही शौचालय किंवा स्वयंपाकघर बनवू नका. वास्तू शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, असे केल्याने घरात अनेक संकटं येऊ लागतात. आणि आजाराचं वातावरण निर्माण होतं.
देव्हारा ठेवू नका
अनेक लोक जिन्याच्या खाली रिकामी जागा दिसताच तिथे देवाचं मंदिर, देव्हारा बसवतात. हे करणं फार अशुभ मानलं जातं. जिन्यावरुन खाली उतरताना पायातील चपलांची, बूटांची माती खाली मंदिरात पडते. यामुळे देव-दैवतांचा अपमान होतो.
दागिन्यांचं कपाट
जिन्याच्या खाली दागिन्यांचं कपाट देखील अनेकजण ठेवतात. घरात अनेकांचा वावर होतो. पाहुण्यांसह बाहेरचे लोकही कधी घरात कामासाठी येतात. अशा वेळी दागिन्यांचं कपाट समोर असल्याने लोकांची वाईट नजर फिरू शकते. त्यामुळे शक्यतो दागिन्यांचं कपाट या ठिकाणी ठेवू नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :