(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Tips : घरातील 'या' वस्तू बनू शकतात आर्थिक संकटाचे कारण
Vastu Tips : वास्तूनुसार जर आपण रोजच्या गोष्टींकडे लक्ष दिले आणि घरात ठेवलेल्या काही वस्तू काढून टाकल्या तर त्याचा आपल्या जीवनावर चांगला परिणाम होतो.
Vastu Tips : कठोर परिश्रम घेऊन देखील अनेक वेळा एखादी व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. यामागचे कारण हे आहे की जाणूनबुजून किंवा नकळत तो छोट्या-छोट्या चुका करत असतो. त्याची त्याला स्वतःलाच जाणीव नसते. त्यामुळे घरातील सुख-समृद्धी हिरावून घेतली जाते. वास्तूनुसार जर आपण रोजच्या गोष्टींकडे लक्ष दिले आणि घरात ठेवलेल्या काही वस्तू काढून टाकल्या तर त्याचा आपल्या जीवनावर चांगला परिणाम होतो.
देवघरात फाटलेले आणि जुने देवाचे फोटो, तुटलेल्या मूर्ती ठेवू नका. त्यामुळे आर्थिक नुकसान होते.
जर घरामध्ये फाटलेले कपडे असतील तर ते काढून टाका. कारण ते शुक्र ग्रहाचा नाश करतात, ज्यामुळे जीवनात आर्थिक संकट सुरू होते.
घरात कबुतराने घरटे बनवले असेल तर ते लगेच काढून टाकावे. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटते.
घरातील फाटलेले आणि जुने शूज, चप्पल ताबडतोब काढून टाका. कारण त्यांना घरात ठेवल्याने व्यक्तीला अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते आणि त्याचा आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.
घरामध्ये महाभारत युद्धाचे चित्र, नटराजाची मूर्ती, ताजमहालचे चित्र, बुडणारी बोट, कारंजे, जंगली प्राण्यांचे चित्र, कबरी, काटेरी झाडांची चित्रे असतील तर ती काढून टाका. यामुळे नकारात्मक भावना वाढतात. ज्यामुळे जीवनात चांगल्या घटना घडणे थांबते.
जर घरात प्लास्टिकच्या वस्तू असतील तर त्या काढून टाका. कारण प्लास्टिकच्या अतिरेकाने घरात नकारात्मक ऊर्जा येते.
घरातील घड्याळ बंद असेल किंवा खराब झाले असेल तर ते घरात ठेवू नका. त्यामुळे कामात अनेक अडथळे निर्माण होतात.
घरामध्ये जुनी वर्तमानपत्रे ठेवली असतील तर ती ताबडतोब काढून टाकावीत. कारण त्यात साचलेली धूळ आणि मातीचा आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.
घरात खराब चार्जर, केबल्स, बल्ब यांसारख्या अनेक इलेक्ट्रिकल गोष्टी असतील तर त्या ताबडतोब काढून टाका. कारण खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.
आर्थिक चणचण असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
घरात खराब कुलूप पडलेले असतील तर हे खराब कुलूप ताबडतोब काढून टाका. कारण खराब कुलुपाप्रमाणे माणसाची प्रगतीही थांबते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :