Surya Grahan 2024 : 'या' 5 राशींवर असणार ग्रहणाचं सावट; पुढचे 15 दिवस चुकूनही 'ही' कामे करु नका
Surya Grahan 2024 : शनी आणि सूर्यामुळे जुळून येणारा षडाष्टक योग आणि सूर्यग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, हा काळ 5 राशींवर फारच अशुभ असणार आहे.
Surya Grahan 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, पितृ पक्ष (Pitru Paksha) 2 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच आज सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी समाप्त होणार आहे. तसेच, यावर्षी याच दिवशी सूर्य ग्रहण (Surya Grahan) लागणार आहे. पितृ पक्ष अमावस्येच्या दिवशी सूर्य ग्रहण लागणं फार अशुभ मानलं जातं. तसेच. याच दिवशी सूर्य आणि शनीचा षडाष्टक योग जुळून येणार आहे. याचाच अर्थ, सूर्य ग्रहणाच्या वेळी शनी आणि सूर्य यांची एकमेकांवर आठवी दृष्टी असेल. हा फार अशुभ योग मानला जातो.
शनी आणि सूर्यामुळे जुळून येणारा षडाष्टक योग आणि सूर्यग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. मात्र, हा काळ 5 राशींवर फारच अशुभ असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या 5 राशींना पुढचे 15 दिवस फार सांभाळून राहण्याची गरज आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहणाचं अशुभ सावट पुढचे 15 दिवस असणार आहे. या राशीच्या लोकांना प्रचंड धनहानीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, कोणतंही काम करताना पैशांचा व्यवहार मात्र करु नका. या काळात तुम्हाला तुमच्या तब्येतीची जास्त काळजी घेण्याची गरज आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी सुद्धा हे सूर्य ग्रहण आणि शनी-सूर्याचा षडाष्टक योग चिंतेत वाढ निर्माण करणारा आहे. यावेळी तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांबरोबर तुमचा वाद वाढू शकतो. यासाठी नेहमी रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांनी ग्रहणाच्या दिवसापासून ते पुढच्या 15 दिवसांपर्यंत सावधानता बाळगणं गरजेचं आहे. या काळात कोणालाही पैसे देऊ नका आणि कोणाकडूनही पैसे घेऊ नका. अन्यथा तुम्हाला प्रचंड धनहानीचा सामना करावा लागू शकतो.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी देखील सूर्य ग्रहणानंतर 15 दिवसांचा काळ फार आव्हानात्मक जाणार आहे. या दरम्यान तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, या काळात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. नंतर, पश्चात्ताप करावा लागू शकतो.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांनी पुढचे 15 दिवस आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घरात शाब्दिक वाद वाढण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात वाहन चालवताना तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: