Surya Grahan 2024 : आज वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; आजच्या दिवशी 'या' चुका टाळाच, अन्यथा वर्षभर सोसावे लागतील कष्ट
Surya Grahan 2024 : वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आज 2 ऑक्टोबरला लागणार आहे. आज ग्रहणाच्या दिवशी काही विशेष नियम पाळले पाहिजे, ते नेमके कोणते? जाणून घ्या
Surya Grahan 2024 : वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण (Solar Eclipse 2024) आज, म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी आहे. हे सूर्यग्रहण खूप खास आहे, कारण या दिवशी सर्वपित्री अमावस्याही पडत आहे. सूर्यग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो आणि त्यातच त्याला अमावस्येची जोड मिळाल्याने काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यग्रहण सुरू होण्याच्या सुमारे 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. या काळात कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य करण्यास मनाई आहे. यंदा सूर्यग्रहण रात्री होणार आहे. त्यामुळे ते भारतात दिसणार नाही आणि सुतक काळही वैध मानला जाणार नाही. परंतु सूर्यग्रहणाचा परिणाम 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होणार आहे. सूर्यग्रहण काळात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? जाणून घेऊया.
सूर्यग्रहण 2024 वेळ (Solar Eclipse 2024 Time)
वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9.12 पासून सुरू होईल आणि 3.17 पर्यंत चालेल. त्यामुळे ते भारतात दिसणार नाही. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अंटार्क्टिका, आर्क्टिक, अटलांटिक महासागरात हे ग्रहण दिसणार आहे.
सूर्यग्रहण काळात काय करावं?
- सूर्यग्रहण काळात जप आणि तपश्चर्येसोबत ध्यान करणं शुभ मानलं जातं. शास्त्रानुसार, या दिवशी सूर्यग्रहणामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा असते, त्यामुळे या काळात विष्णूसह इतर देवांच्या नामाचा जप करावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात आनंद टिकून राहतो.
- सूर्यग्रहणाच्या काळात आपल्या क्षमतेनुसार दान करण्याची इच्छा दाखवा. ग्रहण संपल्यानंतर काही वस्तू एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला द्या.
- सूर्यग्रहणानंतर स्नान करणं शुभ मानलं जातं. यासोबतच देवाच्या मूर्तींवर गंगाजल शिंपडून त्यांना पवित्र करा.
- सूर्यग्रहणाच्या वेळी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात तसेच घरभर पसरते. त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावं.
सूर्यग्रहण काळात काय करू नये?
- सूर्यग्रहण काळात काही काम करणं शुभ मानलं जात असलं तरी काही कामं ही टाळली पाहिजे. सूर्यग्रहण काळात देवी-देवतांच्या मूर्तींना स्पर्श करण्यास मनाई आहे. त्यामुळे या काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात किंवा पडदे लावले जातात.
- सूर्यग्रहण सुतक काळ सुरू झाल्यावर कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य करण्यास मनाई आहे.
- चंद्रग्रहणाच्या सुतक काळापासून ते मोक्षकाळापर्यंत अन्न खाऊ नये, कारण या काळात वातावरणाचा सर्वाधिक नकारात्मक प्रभाव पडतो.
- शास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी शारीरिक संबंध टाळावेत. ग्रहण काळात झोपणं निषिद्ध आहे.
- गर्भवती महिलांनी चाकू, सुया यांसारख्या धारदार वस्तूंपासून दूर राहावं.
- गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण अजिबात पाहू नये, या काळात घराबाहेर पडू नये.
- सूर्यग्रहण संपल्यानंतर स्नान आणि दान करण्यासोबतच काही मंत्रांचा अवश्य जप करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: