(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Surya Grahan 2024 : आजचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
Solar Eclipse 2024 : यंदाच्या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 2 ऑक्टोबरला होत आहे. या काळात 3 ग्रहांवर राहूची अशुभ दृष्टी राहील, ज्याचा परिणाम काही राशींवर होईल. या राशींच्या लोकांच्या जीवनात अडचणी वाढतील, आरोग्य समस्या उद्भवतील.
Surya Grahan 2024 : यंदा 2 ऑक्टोबरला पितृ पक्ष संपत आहे आणि याच दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे. 2 ऑक्टोबरला होणारं सूर्यग्रहण अनेक अर्थांनी विशेष मानलं जातं आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, या दिवशी सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitru Amavasya 2024) आहे. तर सूर्यग्रहण (Surya Grahan 2024) कन्या राशीत होणार असून ग्रहणाच्या वेळी राहूची सूर्यावर पूर्ण दृष्टी असेल. याशिवाय शनि -सूर्य युतीमुळे या दिवशी अशुभ असा षडाष्टक योगही तयार होत आहे, ज्याचा वाईट परिणाम 5 राशींच्या लोकांवर होईल. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
ग्रहणाचा 'या' राशींना बसणार फटका
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण नुकसानीचं ठरेल. ग्रहणामुळे तुमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव वाढेल. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच काही कारणांमुळे अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही काही षड्यंत्राचे बळी होऊ शकता. या काळात तुम्हाला संघर्ष आणि वाद टाळण्याचा सल्ला दिला जातो, तसेच अतिवेगाने वाहन चालवणं आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. कार्यालयात विरोधकांशी सावधगिरीने काम करा, अन्यथा तुमच्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं जाऊ शकतं.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण वाईट ठरेल. या काळात तुमचं आरोग्य अचानक बिघडू शकतं आणि तुमच्या जीवनात आर्थिक समस्या वाढू शकतात. तुमच्या पूर्ण होत असलेल्या कामात अचानक अडथळे येऊ शकतात आणि तुमचं काम बिघडू शकतं. तुम्हाला तुमच्या विरोधकांकडून अपमान आणि पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात अचानक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
कर्क रास (Cancer)
सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात अनावश्यक समस्या वाढू शकतात. तुमच्या नोकरीतील सहकारी तुम्हाला विनाकारण त्रास देतील आणि तुमच्या दैनंदिन कामात अडचणी निर्माण करू शकतात. कामात आणि प्रकल्पांमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि मित्र आणि वरिष्ठांशी वाद टाळावे लागतील. घरात मुलांशी काही कारणाने मतभेद होऊ शकतात. या काळात तुम्हाला पैसे आणि गुंतवणुकीबाबत कोणतेही निर्णय घेणं टाळावं लागेल. यावेळी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
वृश्चिक रास (Scorpio)
सूर्यग्रहणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक आर्थिक समस्या उद्भवू शकतात. तुमचं पूर्ण झालेलं काम पैशामुळे अडकू शकतं. तुमच्या आयुष्यात नकारात्मकता आणि निराशा वाढू शकते. जुगार, सट्टेबाजी या काळात टाळा. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कोणत्याही करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते नीट वाचा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद टाळावा. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक गोष्ट इतरांशी शेअर करू नका.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण त्यांच्या आयुष्यात निराशा वाढवणारं मानलं जातं. महत्त्वाचे निर्णय घेणं तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतं. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. नवीन प्रकल्प काही दिवस पुढे ढकला. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अचानक असे काही निर्णय घ्यावे लागतील, ज्यांचा तुम्ही विचारही केला नसेल. विनाकारण अनावश्यक खर्च वाढतील. प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. पैशांशी संबंधित कोणताही निर्णय घेणं टाळा. कुठेही पैसे गुंतवणं टाळा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?