Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत, म्हणजे डबल लाभ! संध्याकाळी करा फक्त 'हे' एक काम; सुटतील सर्व समस्या
Som Pradosh Vrat 2024 : पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत अजिबात चुकवलं नाही पाहिजे. या दिवशी महादेवाची आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात.
![Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत, म्हणजे डबल लाभ! संध्याकाळी करा फक्त 'हे' एक काम; सुटतील सर्व समस्या Som Pradosh Vrat 2024 in pitru paksha gives double benefit solves all problems by doing wealth strong Mahadev puja shubh muhurta see here Pradosh Vrat 2024 : आज पितृपक्षातील सोम प्रदोष व्रत, म्हणजे डबल लाभ! संध्याकाळी करा फक्त 'हे' एक काम; सुटतील सर्व समस्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/10/be1b4120084f7a29b0ac9be7bf6ea45b1715349142802499_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pradosh Vrat 2024 : हिंदू धर्मात प्रदोष व्रताला फार महत्त्व आहे. हा शुभ दिवस भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला हे व्रत पाळलं जातं. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत (Pradosh Vrat) 30 सप्टेंबर रोजी, म्हणजेच आज पाळण्यात येणार आहे. सोम प्रदोष व्रतादिवशी (Som Pradosh Vrat 2024) महादेवाची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
भगवान शकंराला प्रसन्न करण्यासाठी सोम प्रदोष व्रताचा दिवस हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. सोम प्रदोष व्रत मुलांच्या सुखासाठी, लवकर विवाह होण्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी पाळलं जातं. सोम प्रदोष व्रत पूजेचा शुभ मुहूर्त कोणता? पूजा कशी करावी? हे जाणून घेऊया.
संध्याकाळी 'या' शुभ मुहूर्तावर करा शंकराची पूजा (Pradosh Vrat Shubh Muhurta)
प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळातच भगवान शंकराची पूजा केली जाते. प्रदोष काल हा नेहमी सूर्यास्तापूर्वी 45 मिनिटं आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटं चालतो. पंचांगानुसार, आज महादेवाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:45 ते 7:34 पर्यंत असणार आहे.
सोम प्रदोष व्रत पूजा विधी (Som Pradosh Vrat Puja Vidhi)
या दिवशी भाविकांनी सूर्योदयाआधी उठून स्नान करावं. घर स्वच्छ करावं. देवाची पूजा करावी. शंकराच्या फोटोची पूजा करावी. शिवलिंगावर बेल वाहावं. जमल्यास दूध पाण्याने अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. त्याचप्रमाणे महाकाल शंकराच्या महामृत्युंजय जपाचंही पठण करावं.
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्।
उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।
संध्याकाळी प्रदोष पूजा अधिक फलदायी मानली जाते, म्हणून शंकराची पूजा प्रदोष काळातच करावी. उपवास करणाऱ्या व्यक्तीने सात्विक भोजनानेच उपवास सोडावा. यानंतर 108 वेळा 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करून हवन करावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)