(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shattila Ekadashi : शास्त्रशुद्ध पद्धतीने एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा कशी करावी? जाणून घ्या सविस्तर विधी
Shattila Ekadashi : षटतिला एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. षटतिला एकदशीची पूजा विधिवत केल्यास त्याचा लाभ होतो. जाणून घेऊया या व्रताचा विधी काय? तो कसा करावा?
Shattila Ekadashi : एकादशीचे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीच्या तिथील ‘षटतिला एकादशी’ (Shattila Ekadashi) म्हणून ओळखले जाते. या दिवशी व्रत ठेऊन भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. षटतिला एकादशीला तीळ दान केल्याने पुण्य मिळते. असेही मानले जाते. षटतिला एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. षटतिला एकदशीची पूजा विधिवत केल्यास त्याचा लाभ होतो. जाणून घेऊया या व्रताचा विधी काय? तो कसा करावा?
षटतिला एकादशीला तिळाचे महत्त्वही सांगितले जाते. या दिवशी तिळाचा वापर करणे शुभ मानले जाते. तीळ हे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. तीळ हे उष्ण प्रभावाचे असल्याने थंडीत याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ घालेलल्या पाण्याने आंघोळ करणे, तिळायुक्त पदार्थ खाणे चांगले मानले जाते. अर्थात ‘षटतिला एकादशी’ आयुर्वेदातील आणि आहारातील तिळाचे महत्त्व अधोरेखित करते.
षटतिला एकदशीचा पूजा विधी कशी करावी?
- सकाळी लवकर उठून तिल घातलेल्या पाण्याने स्नान करावे
- देवघरात दिवा लावावा
- भगवान विष्णूला पवित्र गंगाजलाने अभिषेक करा
- त्यानंतर भगवान विष्णूला फुल आणि प्रिय तुळस अर्पण करा
- शक्य असेल तर दिवसभर उपवास करावा
- पूजेनंतर आरती करावी
- त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा
- भगवान विष्णूला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीचे पान ठेवा. तुळशीशिवाय भगवान विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत
- भगवान विष्णूबरोबर महालक्ष्मी मातेची देखील पूजा करावी
- या दिवशी जास्तीत जास्त वेळ नामस्मरण करावे
एकदशीच्या पूजेसाठी लागणारी सामग्री?
- भगवान विष्णूचा फोटो किंवा मूर्ती
- फुले
- नारळ
- सुपारी
- फळे
- लवंग
- धूप
- दिवा
- तूप
- पंचामृत
- अक्षता
- तुळशी पत्र
- चंदन
- मिष्ठान्न
कोणत्या सहा पद्धतीने तिळाचा वापर करावा? (How To use Til Six Ways)
- तिळाच्या पाण्याने स्नान
- तिळाचे उठणे लावणे
- तिळाचा हवन
- तिळाचा तर्पण
- जेवणात तिळाचा वापर
- तिळाचे दान
माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि रोग, दुःख इत्यादीपासून मुक्ती मिळते. तसेच, या दिवशी व्रत केल्यास कन्यादान, हजारो वर्षांची तपश्चर्या आणि सुवर्णदान यांसारखे पुण्य प्राप्त होते, असेही मानले जाते.
हे ही वाचा :