Shattila Ekadashi : तिळाचं महत्त्व सहा अंगांनी सांगणारी 'षटतिला एकादशी'; मोक्ष प्राप्त करून घेणाऱ्या 'या' दिवसाचं महत्त्व काय?
Shattila Ekadashi 2024: एकादशीला तिळाचा वापर सहा प्रकारे केला जातो म्हणून या एकादशीला षटतिला एकादशी असे म्हणतात. जाणून घेऊया या एकदशीचा मुहूर्त आणि महत्त्व काय आहे.
Shattila Ekadashi 2024: पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी 6 फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी षटतिला एकादशी (Shattila Ekadashi 2024) आहे. या दिवशी एकादशीचा उपवास केल्यास मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे पौष महिन्यातील या एकादशीला विशेष महत्त्व आहे. या एकादशीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या एकादशीच्या पूजेला तिळाचा वापर केला जातो. या एकादशीला तिळाचा वापर सहा प्रकारे केला जातो म्हणून या एकादशीला षटतिला एकादशी असे म्हणतात. जाणून घेऊया या एकदशीचा मुहूर्त आणि महत्त्व काय आहे.
षटतिला एकादशी 2024 मुहूर्त (Shattila Ekadashi 2024 Muhurat)
- पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी 5 फेब्रवारीला संध्याकाळी 5 वाजून 24 मिनिटानी सुरू होणार असून 6 फेब्रुवारीला संध्याकाळी 4 वाजून 7 मिनिटांनी संपणार आहे.
- पुजेचा मुहूर्त - 6 फेब्रुवारी सकाळी 9.51 ते दुपारी 2.02 मिनिटे
उपवास सोडण्याची वेळ (Shattila Ekadashi 2024 Vrat Parana Time)
- 7 फेब्रुवारी सकाळी 7.04 मिनटे ते 9 वाजून 19 मिनिटे
- द्वादशी संपण्याची वेळ - दुपारी 2 वाजून 2 मिनिटे
कोणत्या सहा पद्धतीने तिळाचा वापर करावा? (How To use Til Six Ways)
षटतिला एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तिळ घालावे.
तिळाने स्नान करणे, तिळाचे उठणे लावणे, तीळाचे तर्पण करणे, तीळाचा हवन करणे, जेवणात तिळाचा वापर आणि तीळाचे दान केल्याने स्वर्गप्राप्ती होण्यास मदत होते.
- तिळाच्या पाण्याने स्नान
- तिळाचे उठणे लावणे
- तिळाचा हवन
- तिळाचा तर्पण
- जेवणात तिळाचा वापर
- तिळाचे दान
षटतिला एकादशीचे महत्त्व (Shattila Ekadashi Significance)
जीवनात यश मिळवायचे असल्यास एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडेसे पाणी, गंगाजल आणि काही तीळ मिसळून स्नान करावे. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी . या कृतीमुळे विष्णूचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो. वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होते आणि या व्रताची कथा ऐकल्याने व वाचल्याने मोक्ष प्राप्त होतो. या व्रताचे पालन केल्याने लोकांना त्यांच्या वाईट पापांपासून मुक्ती मिळते. या व्रताचे पालन केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. या दिवशी भगवान विष्णूची आराधना करून व्रत केल्यास लोक मोक्ष प्राप्त करतात. या दिवशी पूजा केल्यानंतर षट्तीला एकादशी व्रताची कथाही अवश्य ऐकावी, तरच उपासनेचे व व्रताचे पूर्ण फळ मिळते.
हे ही वाचा :