Shani Gochar 2024 : दिवाळीनंतर शनीची सरळ चाल, 2025 पर्यंत 'या' राशींचा सुरु होणार 'गोल्डन टाईम'; एकामागोमाग मिळतील शुभ संकेत
Shani Gochar 2024 : दिवाळीनंतर शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे. याचाच अर्थ सरळ चाल चालणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे.
![Shani Gochar 2024 : दिवाळीनंतर शनीची सरळ चाल, 2025 पर्यंत 'या' राशींचा सुरु होणार 'गोल्डन टाईम'; एकामागोमाग मिळतील शुभ संकेत Shani Gochar 2024 saturn margi in aquarius horoscope these 3 zodiac signs will start golden time astrology marathi news Shani Gochar 2024 : दिवाळीनंतर शनीची सरळ चाल, 2025 पर्यंत 'या' राशींचा सुरु होणार 'गोल्डन टाईम'; एकामागोमाग मिळतील शुभ संकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/25/5dd2dae3ccaaaaf627a5a3674b149daa1729823860325358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, यंदा दिवाळीनंतर (Diwali 2024) अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. यामध्ये कर्मफळदाता शनीचा (Shani Dev) सुद्धा समावेश आहे. सध्या न्यायदेवता असलेला शनी (Lord Shani) दिवाळीनंतर कुंभ राशीत मार्गी होणार आहे. याचाच अर्थ सरळ चाल चालणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीचं मार्गी होणं वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमच्या कामात चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला नवीन काम करण्याची संधी मिळेल. तुमचं प्रमोशन देखील होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमचं ध्येय गाठण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच, तुमचा बॅंक बॅलेन्स वाढेल. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचे संबंध चांगले असतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या कालावधीत तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. त्याचबरोबर अनेर दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढलेली असेल मात्र तुम्ही काम प्रामाणिकपणे आणि मन लावून कराल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, घरात शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल. लवकरच घरात शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. घरात शुभ कार्याचं आयोजन केलं जाईल.
मकर रास (Capcricorn Horoscope)
शनीची मार्गी अवस्था मकर राशीच्या लोकांसाठी फार लाभदायी असणार आहे. या दरम्यान तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली दिसेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. तुमच्या संवादशैलीत सुधारणा होईल. तसेच, कोणाकडून जर तुम्ही पैसे उधार घेतले असतील तर ते परत करा. तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही अनेक कल्पना शेअर कराल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 25 October 2024 : आज शुक्रवारचा दिवस कोणत्या राशींसाठी ठरणार भाग्याचा? जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)