एक्स्प्लोर

Horoscope Today 25 October 2024 : आज शुक्रवारचा दिवस कोणत्या राशींसाठी ठरणार भाग्याचा? जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 25 October 2024 : सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 25 October 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमचं मन क्रिएटिव्ह कामात जास्त रमेल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. मात्र, आज कोणत्याही कामाला घेऊन घाई करु नका. कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या. तसेच, कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात जाईल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्ही ठरवलेली कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे तुमची खूप चिडचिड होऊ शकते. मात्र, रागाच्या भरात  जवळच्या माणसांच्या भावना दुखवू नका. तुमची तब्येत चांगली असेल फक्त कोणत्याच गोष्टीचा मानसिक त्रास घेऊ नका. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या कुटुंबात लवकरच शुभ कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील. तसेच, तुमच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुमच्या कार्यक्षेत्रात मोठं परिवर्तन दिसून येईल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. वातावरणातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही दिसून येईल. जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करु इच्छित असाल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. जर तुमच्या आयुष्यात अनेक दिवसांपासून तणाव असेल तर तो हळुहळू दूर होईल. नवीन प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी ही वेळ चांगली आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. एकाच वेळी अनेक कामांचा ताण असल्या कारणाने तुमची धावपळ होऊ शकते. जर तुम्ही आज वाहन चालवणार असाल तर काळजीपूर्वक चालवा. आज तुमच्या व्यवसायातही नुकसान होण्याची शक्यता आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला फार काळजी घ्यावी लागणार आहे. दीर्घकालापासून सुरु असलेला आजार पुन्हा डोकावू शकतो. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या कारणाने विद्यार्थी फार खुश असतील. तुम्ही सोडलेल्या जुन्या नोकरीतून तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. अनेक दिवसांपासून तुमच्या तब्येतीत काही तक्रारी जाणवत असतील तर त्या लवकरच दूर होतील. मित्रांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तुमची वैवाहिक स्थिती चांगली असेल. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. एखाद्या विवादात्मक परिस्थितीपासून तुम्ही दूर असाल. तसेच, जुन्या चुकांमधून तुम्ही काहीतरी बोध घ्याल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. जर तुम्हाला एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्हाला तुमचा एखादा जुना मित्र भेटू शकतो. फक्त आज घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. कुटुंबातील वातावरण धार्मिक असेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. अनेक दिवसांपासून सुरु असलेले काम आज संपुष्टात येईल. त्यामुळे तुम्ही खूप खुश असाल. आज तुम्ही तुमच्या संपत्तीशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. गुंतवणुकीसाठीही आजचा दिवस चांगला आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 25 October 2024 : आजचा शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Urmila Kothare Car Accident :उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना उडवलं,कारचा चक्काचूरPrajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PCSuresh Dhas on Prajakta Mali :माफी मागणार नाही, चुकीचं बोललो नाही, प्राजक्ता माळीची मागणी फेटाळलीChhatrapati Sambhajiraje Speech Beed : हे छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारले, घणाघाती भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Prajakta Mali Full PC : सुरेश धस माफी मागा, प्राजक्ता संतापली,आईसमोर रडली, UNCUT PC
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Video: मी माफी-बिफी मागत नसतो, प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच सुरेश धस बोलले, नेमकं काय म्हणाले
Devendra Fadnavis : अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
अंजली दमानियांच्या ट्विटबाॅम्बनंतर बीडमध्ये हवेत फैरी करणाऱ्या छपरींवर फडणवीसांच्या कारवाईची AK-47 अखेर धडाडली; घेतला तगडा निर्णय!
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते;  प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे? मी दीड महिन्यांपासून शांत होते; प्राजक्ता माळीने सगळंच काढलं
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
बीडमधील नेत्याच्या घरून 1992 पासून IAS अधिकारी गायब; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक दावा
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
मनोज जरांगे 8 व्या नंबरवर, शेवटी संभाजीराजे; बीडच्या मोर्चात पहिलं कोण बोललं, 9 नेत्यांची जोरदार भाषणं
Beed Morcha : तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
तुम्हाला पद कशाला, आमचे मुडदे पाडायला? धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, वाल्मिक कराडला अटक करा; बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चात नेत्यांचा आक्रोश
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
उर्मिला कोठारेच्या कारचा चुराडा, भीषण अपघाताचे फोटो
Embed widget