(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Scorpio Weekly Horoscope 2024 : वृश्चिक राशीसाठी पुढचे 7 दिवस आनंदाचे तितकेच आव्हानात्मक; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Scorpio Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा तूळ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Scorpio Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यातला तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा वृश्चिक राशीसाठी नेमका कसा असणार आहे? तूळ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा तूळ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (Scorpio Love Horoscope)
लव्ह लाईफच्या बाबतीत बोलायचं झाल्यास वृश्चिक राशीसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर मोकळेपणाने संवाद साधणं गरजेचं आहे. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल. तसेच, यामुळे तुमचा तुमच्या पार्टनरबरोबर इमोशनल बॉन्ड देखील वाढलेला दिसेल.
वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Career Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास उत्साहाचा असणार आहे. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील तसेच, प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही जी काही मेहनत घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल.
वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope)
आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात तुम्ही आर्थिक बाबतीत निर्णय घेताना बुद्धिमत्तेचा चांगला वापर करा. भावनिक होऊन विचार करु नका. तसेच, कोणालाही पैसे देताना आधी विचार करा. अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप होण्याची शक्यता आहे. तुमचे पैसे सकारात्मक कार्यात गुंतवा. यामुळे तुमच्या कार्यात कोणताही अडथळा येणार नाही.
वृश्चिक राशीचे आरोग्य (Scorpio Health Horoscope)
नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. या आठवड्यात तुमच्यावर कामाचा भरपूर ताण असणार आहे. त्यामुळे, सर्वात आधी तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. स्ट्रेबस मॅनेजमेंट अॅक्टिव्हिटी जसे की योग, व्यायाम, ध्यान करण्याला प्राधान्य द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या