Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा लाभदायी असेल. ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास भरपूर असणार आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकाल.तसेच, तुमच्या कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल. तुम्ही जे कार्य कराल त्यात तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचा पूर्ण पाठिंबा असेल. या काळात आठवड्याच्या शेवटी व्यापारी वर्गातील लोक कामाच्या निमित्ताने परदेशात जाण्याची शक्यता आहे. तसेच, विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
नवीन आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्ही जे कोणतेही निर्णय घ्याल त्याला तुम्ही पूर्णपणे जबाबदार असाल. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. तसेच, जे तरुण नवीन नोकरीच्या सोधात आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा महत्त्वाचा असणार आहे. या काळात अनेक चढ-उतार तुमच्यासमोर असतील याचा तुम्ही धैर्याने सामना कराल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तमाव जाणवेल. पण अतिविचार करणं टाळा. अन्यथा तुमच्या तब्येतीवर त्याचा परिणाम दिसून येईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील त्या तुम्ही योग्यरित्या पार पाडणं गरजेचं आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात सावध राहण्याची गरज आहे. या काळात तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. या काळात धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, तुमच्या कुटुंबातील वातावरण सामान्य असेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला व्यवसायात चांगला लाभ मिळेल. मात्र, कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात कोणतेही नकारात्मक विचार मनात आणू नका. तसेच, तुम्ही जे कोणतंही क्षेत्र निवडाल त्यात तुम्हाला शंभर टक्के प्रामाणिक असणं गरजेचं असणार आहे. या काळात कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार चांगला असणार आहे. आठवड्याचा सुरुवातीचा काळ फार लाभदायक असणार आहे. आठवड्याच्या मध्यात तुमचं मन कोणत्या तरी विचाराने चिंतेत असेल. तुमचा आत्मविश्वास कमी होईल. तसेच, शिक्षकांचं तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: