![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shani Dev : शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे 5 राशींचं भाग्य उजळणार; राजासारखं जीवन जगणार 'या' राशी, सुखसोयींमध्ये होणार अमाप वाढ
Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो, त्यामुळे शनीच्या चालीचा परिणाम एखाद्याच्या आयुष्यात दीर्घकाळ राहतो. काहींना शनीमुळे शुभ परिणाम मिळतात, तर काहींची जीवनात अधोगती होते.
![Shani Dev : शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे 5 राशींचं भाग्य उजळणार; राजासारखं जीवन जगणार 'या' राशी, सुखसोयींमध्ये होणार अमाप वाढ saturn transit 2024 shani nakshatra parivartan effects on these zodiac signs will get lucky horoscope rashibhavishya may 2024 shani marathi news Shani Dev : शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे 5 राशींचं भाग्य उजळणार; राजासारखं जीवन जगणार 'या' राशी, सुखसोयींमध्ये होणार अमाप वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/30/b928155c68e92d07b477ac8042248bde1714446636187713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shani 2024 : ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani) विशेष महत्त्व आहे. या ग्रहाच्या चालीचा परिणाम व्यक्तीच्या संपत्तीवर, आरोग्यावर, प्रगती, नोकरी-व्यवसाय आणि नातेसंबंधांवर होतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेव हा सर्वात संथ ग्रह मानला जातो. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी शनिदेवाला सुमारे अडीच वर्षं लागतात. शनि वेळोवेळी आपली राशी बदलतो आणि नक्षत्रही बदलतो. आता 6 एप्रिलला शनिदेवाने पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे.
सध्या पूर्वाभाद्रपदाच्या प्रथम चरणात शनि स्थित आहे. 12 मे रोजी सकाळी 8 वाजून 7 मिनिटांनी शनि पूर्वाभाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल. शनीचा हा टप्पा 18 ऑगस्टपर्यंत राहील. शनीच्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रातील प्रवेशामुळे काही राशींचं भाग्य खुलेल. गरिबातला गरीब माणूस देखील राजासारखं जीवन जगेल. कोणत्या राशीसाठी (Zodiac Signs) शनीचा पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश शुभ राहील? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
शनीच्या नक्षत्र बदलाचा चांगलाच फायदा मेष राशीच्या लोकांना होईल. या काळात तुमचे प्रेमसंबंध चांगले राहतील. तुम्ही तुमच्या नातेसंबंधांना खूप गांभीर्याने घ्याल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. अविवाहित लोक या काळात प्रेमात पडू शकतात. तुमचं व्यक्तिमत्व इतरांना आकर्षित करेल. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात तुमचं नाव आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल आणि प्रदीर्घ प्रलंबित कामं यशस्वीपणे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास परत येईल आणि या काळात पदोन्नतीची देखील शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे चांगले परिणाम मिळतील.
मिथुन रास (Gemini)
शनि ऑगस्टपर्यंत पूर्वाभाद्रपद नक्षत्रात राहील, या काळात तुमच्या घरी सुख नांदेल. तुम्ही एखाद्या शुभ कार्याचं आयोजन देखील करू शकता. नवीन वाहन खरेदी देखील केली जाईल. हा काळ व्यावसायिकांना चांगली संधी देईल. परंतु मालमत्तेशी संबंधित कायदेशीर बाबींकडे लक्ष द्यावं लागेल. या काळात नोकरी आणि व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कामावर तुमच्या कामाचं कौतुक होईल.
सिंह रास (Leo)
पुढील 4 महिन्यांच्या काळात तुमच्या जीवनात अनेक बदल घडतील. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीचं मन जिंकण्यात यशस्वी व्हाल. तुमचं लव्ह लाईफ बहरेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीचा तुम्हाला फायदा होईल. सहलीला जाण्यासाठी वेळ अनुकूल आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुमच्या घरात शांतता नांदेल.
कन्या रास (Virgo)
शनीच्या बदलत्या चालीमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर पडेल, ज्यामुळे तुम्ही इतरांच्या नजरेत अधिक आकर्षक व्हाल. तुम्हाला भरीव आर्थिक लाभ मिळेल आणि शाब्दिक वादात तुम्ही नेहमी विजयी व्हाल. या काळात तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल.
धनु रास (Sagittarius)
ऑगस्टपर्यंत धनु राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असेल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि व्यावसायिकांची भरभराट होईल. परंतु, तुम्हाला तुमचा हट्टीपणा सोडावा लागेल, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. तुमची लव्ह लाईफ रोमान्सने भरलेली असेल. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या लोकांना फायदा होईल. इतर क्षेत्रात प्रवास करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळाक खर्चावर नियंत्रण ठेवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Jayanti 2024 Date : यंदा शनि जयंती नेमकी कधी? जाणून घ्या तारीख, मुहूर्त, महत्त्व आणि उपाय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)