Sankashti Chaturthi 2024 : संकष्ट चतुर्थीनिमित्त जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि तुमच्या शहरानुसार चंद्रोदयाची अचूक वेळ
Sankashti Chaturthi 2024 : संकष्ट चतुर्थीचा उपवास हा गणपतीला समर्पित केला जातो. या दिवशी विधिपूर्वक बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते.
Sankashti Chaturthi 2024 : हिंदू पंचांगानुसार, आज संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) आहे. हिंदू धर्मात आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे. आजचा दिवस गणपतीला ही तिथी समर्पित असून या दिवशी गणपतीची विधीवत पूजा केली जाते. पंचांगानुसार, आषाढ कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी बुधवार 24 जुलै 2024 रोजी आहे. संकष्ट चतुर्थीचा (Sankashti Chaturthi) उपवास हा गणपतीला समर्पित केला जातो. या दिवशी विधिपूर्वक बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते अशी भावना आहे.
असं म्हणतात की, ज्या व्यक्तीवर श्री गणेशाची कृपा आहे. त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात तसेच त्या भाविकाच्या सर्व इच्छाही पूर्ण होतात. कष्ट चतुर्थीच्या या व्रतात चंद्रदर्शनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. चंद्रदर्शनाशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते. त्यानुसार, तुमच्या शहरात चंद्रोदयाची वेळ काय आहे जाणून घेऊया.
संकष्ट चतुर्थी तिथी आणि मुहूर्त (Sankashti Chaturthi 2024 Shubh Muhurta)
चतुर्थी तिथी प्रारंभ - 24 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
चतुर्थी तिथी समाप्त - 25 जुलै रोजी पहाटे 04 वाजून 19 मिनिटांनी चतुर्थी समाप्त होईल.
संकष्ट चतुर्थी 2024 चंद्रोदय वेळ
संकष्ट चतुर्थीला 24 जुलै रोजी रात्री 9.00 वाजून 50 मिनिटांनी चंद्रोदय होईल. संकष्ट चतुर्थीला चंद्राची पूजा करतात, त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाही. राज्यातील विविध शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेगवेगळ्या असतात.
तुमच्या शहरात चंद्रोदय कधी?
मुंबई - 09.48
बीड - 09.36
सांगली - 09.40
पुणे - 09. 44
सावंतवाडी - 09.42
रत्नागिरी - 09.45
सोलापूर - 09.35
कोल्हापूर - 09.41
नागपूर - 09.23
सातारा - 09.43
अमरावती - 09.29
नाशिक - 09.45
अकोला - 09.32
अहमदनगर -09.40
औरंगाबाद - 09.38
पणजी - 09.42
भुसावळ - 09.37
धुळे - 09.41
परभणी - 09.32
जळगाव - 09.38
नांदेड - 09.29
वर्धा - 09.25
उस्मानाबाद - 09.34
यवतमाळ- 09.27
भंडारा - 09.21
चंद्रपूर - 09.22
बुलढाणा - 09.35
इंदौर- 09.38
ग्वाल्हेर - 09.31
बेळगाव - 09.40
मालवण- 09.44
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: