Rajyog Budhadityayog : तब्बल 100 वर्षांनंतर बनणार दोन राजयोग; 'या' तीन राशींना लागणार जॅकपॉट, संपत्तीतही होईल भरभराट
Rajyog Budhadityayog : ग्रहांचा राजकुमार बुध 2 एप्रिल रोजी वक्री गतीने मेष राशीत मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर 9 एप्रिल वक्री गतीनेच मीन राशीत ग्रहांचं संक्रमण होणार आहे.
Rajyog Budhadityayog : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर अगदी बारकाईने नजर ठेवली जाते. या काळात मीन राशीत शुक्र आणि बुध ग्रहांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तर सूर्य आणि बुध या ग्रहांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. याचाच परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध 2 एप्रिल रोजी वक्री गतीने मेष राशीत मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर 9 एप्रिल वक्री गतीनेच मीन राशीत ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तर, मीन राशीत बुध ग्रहाच्या प्रवेशाने शुक्र आणि सूर्याशी संयोग होणार आहे. यामध्ये तीन राशींचं भाग्य उजळणार आहे. त्याचबरोबर या राशीच्या लोकांना समाजात मानसन्मान देखील तितकाच मिळणार आहे. या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
या राशींचे भाग्य उजळणार
1. वृषभ (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांना लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग फायदेशीर ठरणार आहे.कारण हे दोन्ही राजयोग वृषभ राशीत उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी तयार होणार आहेत.अशावेळी तुम्ही जर गुंतवणूक केली तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे.उत्पन्नाचे नवीन स्त्रोतही निर्माण होतील. त्याचबरोबर या राशीच्या लोकांना मुला-मुलीच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. शेअर मार्के आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
2. मीन (Pisces)
लक्ष्मी नारायण राजयोग आणि बुधादित्य राजयोग तयार झाल्यामुळे या राशींचे चांगले दिवस सुरु होणार आहेत. कारण हा राजयोग या राशीच्या कर्म भावावर तयार होणार आहे.तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये देखील चांगलं यश मिळणार आहे. व्यापाऱ्यांनाही चांगला धनलाभ होणार आहे.
3. सिंह (Leo)
या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मी नारायण राजयोग यांच्यासाठी फार अनुकूल ठरणार आहे.कारण हा राजयोग ग्रहाच्या राशीतून आठव्या घरात तयार होणार आहे. या दरम्यान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा जमीन देखील विकत घेऊ शकता. कुटुंबियांचा पाठिंबा तुमच्याबरोबर सदैव असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची तब्येतदेखील चांगली ठणठणीकत असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :