(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pitru Paksha 2022 : पूर्वज नाराज झालेयत? ‘या’ 6 गोष्टी देतात पूर्वसंकेत! जाणून घ्या पितृदोष दूर करण्याचे उपाय...
Pitru Paksha 2022 : पितृ पक्षातील पंधरवड्यात लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करून पिंडदान करतात. मात्र, जर पूर्वज तुमच्यावर काही कारणांनी नाराज असतील, तर त्याचे काही दुष्परिणाम देखील भोगावे लागतात.
Pitru Paksha 2022 : हिंदू धर्मात पितरांच्या अर्थात मृत पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी तर्पण आणि श्राद्ध करण्याचा नियम आहे. पितृ पक्षाच्या (Pitru Paksha 2022) 15 दिवसांत लोक आपल्या पूर्वजांचे पिंड दान करतात. यंदा पितृ पक्ष 10 सप्टेंबरला सुरू होत आहे आणि 25 सप्टेंबरला संपत आहे. शास्त्रानुसार असे मानले जाते की, या 15 दिवसांसाठी पितरं पृथ्वीवर येतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांसह राहतात. त्यांच्यासोबत अन्न आणि पाणी देखील ग्रहण करतात.
घरातील व्यक्तींच्या या सेवेवर प्रसन्न होऊन, ते आपल्या वंशजांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. मात्र, जर तुमचे पूर्वज नाराज असतील तर, याचे दुष्परिणाम देखील दिसतात. या दरम्यान, असे काही संकेत मिळतात की, ज्यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज असल्याचे कळते. अशावेळी त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे. कोणत्या गोष्टी पूर्वजांच्या नाराजीचे संकेत देतात, त्याबद्दल जाणून घेऊया...
‘हे’ संकेत वेळीच ओळखा!
* पितृदोष असेल, तर प्रचंड मेहनत करूनही त्याचे योग्य फळ मिळत नाही.
* व्यक्ती नेहमी तणावाखाली असते आणि व्यक्तीच्या प्रगतीत अडथळा येतो.
* पूर्वजांच्या नाराजीचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवरही होतो. काही लोकांच्या वैवाहिक जीवनात समस्या येतात.
* अविवाहितांच्या लग्नात अनेक अडथळे येतात.
* मृत पूर्वज रागावले असतील, तर उपासनेचे कोणतेही शुभ फळ मिळत नाही.
* पितृदोषामुळे पूर्वज पुन्हा पुन्हा स्वप्नात दिसतात आणि काही विशेष संकेत देतात. त्यामुळे शुभ कार्यातही अडथळे येतात.
पितृदोष दूर करण्याचे उपाय
काही सोपे उपाय करून तुम्ही पितृदोष दूर करू शकता. यासाठी पितृ पक्षात पिंड दान अवश्य करावे. पितरांच्या शांतीसाठी विधीवत पूजा करणे फायदेशीर ठरेल. या काळात कावळे आणि इतर प्राणी-पक्ष्यांना खायला द्या. जाणकार पंडितांशी संपर्क साधा आणि पितृदोष शांतीसाठी पूजा करा. भगवान शंकराची उपासना करा. महादेवाचे ध्यान 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय च धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात' या मंत्राचा रोज एक माळ अर्थात 108 वेळा जप करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :
Pitru Paksha 2022 : कधीपासून सुरु होतोय पितृपक्ष पंधरवडा? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व
Swapna Shastra: ही 3 स्वप्ने कोणाला सांगू नयेत, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान