Numerology Today 25 January 2024 : 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल; प्रयत्नांना यश मिळणार
Numerology Today 25 January 2024 : अंकशास्त्रानुसार तुमचं आजचं भविष्य काय? जाणून घ्या.
Numerology Today 25 January 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चढ-उताराचा असेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. आज तुम्हाला अधिक उत्साही वाटेल. तुमचं लव्ह लाईफ रोमँटिक असेल.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. तुम्ही कोणत्याही मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. आज किरकोळ आजार वाढू शकतात, त्यामुळे सतर्क राहा. ऑफिसमध्ये प्रलंबित समस्या ओझं ठरू शकते. घरगुती गोष्टी योग्यरित्या हाताळण्याची आवश्यकता पडू शकते.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. तुम्ही कोणत्याही नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिला असेल, तर त्याचा निकाल चांगला लागेल. आरोग्याची काळजी घ्या, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. इतरांचा राग करू नका. जीवनात आशावादी राहा.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. आज तुम्ही गुंतवणुकीसाठी काही चांगले पर्याय पहा. तुमची संपत्ती वाढवण्यासाठी काही सकारात्मक पावलं उचलण्यात तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज तुमची तब्येत उत्तम असेल. मालमत्तेचं कोणतंही प्रकरण सामंजस्याने सोडवलं जाईल. दिवस धकाधकीचा जाईल, संध्याकाळची वेळ तुम्हाला दिलासा देणारी असेल.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 असलेल्या लोकांचा दिवस तणावपूर्ण जाईल. कामाचा जास्त ताण घेऊ नका. लक्षात ठेवा, तुमचे मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य दोन्ही महत्त्वाचे आहेत. तणाव दूर करण्यासाठी आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ द्या. मित्र आणि जोडीदारासोबत भावना शेअर करणे चांगले राहील.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मालमत्तेचे कोणत्याही प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. 4 मूलांकाचे विद्यार्थी आज अभ्यासात चांगली कामगिरी करतील आणि त्यांचा नावलौकिक वाढवतील. आज तुम्हाला एखादी चांगली व्यक्ती भेटेल, त्या व्यक्तीशी तुम्ही मन भरुन बोलू शकता.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. आरोग्याच्या समस्येमुळे तुम्ही त्रस्त असाल आणि तुम्हाला तुमची एखादी योजना रद्द करावी लागू शकते. नोकरीसंदर्भात तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होता, ती पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही बचत सुरू केली नसेल तर तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. तुमचा आजचा दिवस व्यस्त असणार आहे. अविवाहित लोकांच्या जीवनात रोमांचक बदल घडू शकतात. तुमचा क्रश आज तुमच्याशी चांगल्या पद्धतीने बोलेल. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. करिअरचे निर्णय घेताना मुत्सद्दी दृष्टिकोनाचा अवलंब करा.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर सुरक्षित प्रवास करा. शैक्षणिक क्षेत्रात आज तुमचा मान-सन्मान मिळेल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. बरेच दिवसांपासून एखाद्या आजारांनी त्रस्त लोकांची स्थिती सुधारेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :