Paush Pournima : उद्या वर्षाची पहिली पौर्णिमा; करा फक्त 'हे' एक काम, वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा, होईल धनवर्षाव
Paush Pournima 2024 Remedies : पौष पौर्णिमेच्या दिवशी भगवान आणि देवी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व असतं. असं केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे. या दिवशी काही खास उपाय केल्याने घरात लक्ष्मी नांदते.
![Paush Pournima : उद्या वर्षाची पहिली पौर्णिमा; करा फक्त 'हे' एक काम, वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा, होईल धनवर्षाव paush Pournima 2024 on 25 january puja upay of goddess laxmi for money and prosperity Paush Pournima : उद्या वर्षाची पहिली पौर्णिमा; करा फक्त 'हे' एक काम, वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा, होईल धनवर्षाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/24/082db66c99e39acd11501c65471a23fa1706087520180713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Paush Pournima 2024 Remedies : हिंदू धर्मात पौर्णिमेचा दिवस विशेष मानला जातो. उद्या, म्हणजेच 25 जानेवारी 2024 रोजी वर्षाची पहिली पौर्णिमा (Pournima) आहे. या दिवशी चंद्रासोबत भगवान विष्णूची पूजा केली जाते. याशिवाय या दिवशी स्नान आणि दान यांना विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यात (Paush Month) येणाऱ्या पौर्णिमेला पौष पौर्णिमा किंवा शाकंभरी पौर्णिमा देखील म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणार्या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी होय. दुर्गेच्या (Durga) या रुपाला हजारो डोळे होते, म्हणून तिला शाकंभरी असं नाव पडलं.
पौष पौर्णिमेचा मुहूर्त
मुहूर्त पंचांगानुसार, पौष पौर्णिमा तिथी 24 जानेवारी 2024 रोजी रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी सुरू होईल. पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 25 जानेवारी 2024 रोजी रात्री 11:23 वाजता संपेल. उदयोतिथीनुसार, 25 तारखेला पौष पौर्णिमेचं व्रत केलं जाईल. पौष पौर्णिमेला अनेक घरांत सत्यनारायणाचं पठण केलं जातं.
वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला बनतायत खास योग
यंदा पौष पौर्णिमेला काही खास योग तयार झाले आहेत, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढलं आहे. या वर्षी पौश पौर्णिमेला सर्वार्थ सिद्धी योद, अमृत सिद्धी योग, रवि योग आणि पुष्य योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला काही खास उपाय केल्याने घरावर देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात कधी पैशाची कमतरता जाणवत नाही.
पहिल्या पौर्णिमेला करा हे खास उपाय
1. पौष पौर्णिमेला सकाळी लवकर स्नान करुन तुळशीला पाणी घाला. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा, असं केल्याने तुमच्या घरात कायम लक्ष्मीचा वास राहील.
2. वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करा. लक्ष्मीला पिवळ्या कवड्या वाहा आणि दुसऱ्या दिवशी त्या कवड्या तुमच्या पाकिटात आणि तिजोरीत ठेवा.
3. पहिल्या पौर्णिमेला पित्रांच्या नावे दान केल्याने पुण्य लाभतं. या दिवशी गरजूंना अन्नधान्य, जेवण, कपडे, चप्पल इत्यादी दान केलं पाहिजे.
4. पौष पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्घ्य द्यावा. या दिवशी चंद्राला पेलाभर दूध, पाणी, साखर आणि सफेद फुलांनी अर्घ्या दिला पाहिजे.
5. पौष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद दाखवावा. यानंतर लक्ष्मी मंत्राचा जप करावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)