Numerology: लग्नानंतर 'या' जन्मतारखेच्या लोकांचं असं बदलतं नशीब की, थेट बनतात कोट्यधीश, केतूचा मोठा प्रभाव, अंकशास्त्रात म्हटलंय..
Numerology: अंकशास्त्रानुसार, आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल सांगणार आहोत. ज्यांचे लग्नानंतर नशीब चांगलेच चमकते. त्यांच्या सर्व इच्छा हळूहळू पूर्ण होतात.

Numerology: अनेक जणांचा हा विचार असतो की, आधी करिअर करू, पैसा कमावू आणि मग लग्न करू, वास्तविक पाहता असा विचार आताच्या काळात करणे अत्यंत गरजेचा आहे. कारण आजकाल महागाई इतकी वाढली आहे. की पैसा कमवणे काळाची गरज आहे. त्यासाठी अनेकजण खूप मेहनतही करतात. मात्र त्यांना मनासारखे यश मिळत नाही. त्यांचे स्वप्न सत्यात उतरत नाही. अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर काही जन्मतारखेचे लोक असे असतात, ज्यांचे नशीब लग्न केल्यानंतरच चमकते. जाणून घ्या त्या लोकांबद्दल...
लग्नानंतर कोणता मूलांक जास्त फायदे देतो?
अंकशास्त्रात, व्यक्तीची जन्मतारीख खूप महत्वाची आहे, कारण त्याच्या मदतीने तुम्ही जीवनाच्या विविध पैलूंबाबत जाणून घेऊ शकता. व्यक्तीच्या जन्मतारखेच्या संख्या जोडून मूलांक काढला जातो. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म महिन्याच्या 21 तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 2+1=3 असेल. अंकशास्त्रात, 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकांचा विचार केला जातो. असेही मानले जाते की, मूलांक एखाद्या व्यक्तीच्या कारकिर्दीवर तसेच त्याच्या स्वभावावर परिणाम करतो. त्याच वेळी, तुम्ही मूलांकावरून तुमच्या प्रेम जीवनाबद्दल देखील जाणून घेऊ शकता. अंकशास्त्रानुसार, आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखेच्या लोकांबद्दल सांगणार आहोत की लग्नानंतर कोणत्या जन्मतारखेच्या लोकांना जास्त फायदे होतात?
केतू ग्रहाच्या प्रभावाखाली..
अंकशास्त्रानुसार, आज आपण मूलांक 7 बद्दल सांगणार आहोत. ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 7 मानला जातो. ही संख्या केतू ग्रहाच्या प्रभावाखाली असते. केतूच्या प्रभावामुळे या संख्येचे लोक अंतर्मुखी, चिंतनशील आणि आध्यात्मिक स्वभावाचे मानले जातात. तसेच, या संख्येचे लोक भाग्यवान असतात आणि लग्नानंतर त्यांचे नशीब चमकते असेही म्हटले जाते.
लग्नानंतर नशीब कसे बदलते?
अंकशास्त्रज्ञांच्या मते, 7 क्रमांकाच्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत दिखावा करायला आवडत नाहीत, परंतु ते अत्यंत प्रेमळ असतात. तसेच, असे मानले जाते की लग्नानंतर या लोकांना त्यांच्या कारकिर्दीत प्रगतीची शक्यता वाढू लागते. एकंदरीत, त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी असते. यासोबतच, असे मानले जाते की हे लोक 2, 5 आणि 9 क्रमांकाच्या लोकांसोबत चांगले जोडी जमते.
त्यांच्यात ही खासियत
अंकशास्त्रानुसार, हे लोक कोणासमोरही आपला मुद्दा मांडण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि ते खूप निर्भय असतात. धार्मिक स्वभावाचे असल्याने, हे लोक दानधर्मात भरपूर पैसे खर्च करतात. यासोबतच, जर आपण शिक्षणाबद्दल बोललो तर, हे लोक उच्च शिक्षण घेतात आणि त्यांच्या मेहनतीने यश मिळवतात. त्यांना बुद्धिमान लोकांशी मैत्री करायला आवडते.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Sign: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचे नशीब पालटणारे! जबरदस्त बुधादित्य राजयोग बनतोय, इच्छा पूर्ण होणार, बक्कळ पैसा हाती
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















