November Gochar 2024 : नोव्हेंबरमध्ये 'या' राशीत ग्रहांच्या मोठ्या हालचाली; पाण्यासारखा वाहत जाणार पैसा, आरोग्यही खालावणार
November Gochar 2024 : 15 नोव्हेंबरला कुंभ राशीत सर्वात मोठं परिवर्तन पाहायला मिळणार आहे. 15 नोव्हेंबरला शनी मार्गी होणार आहे. शनीचं मार्गी होणं काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरु शकतं.
November Gochar 2024 : नोव्हेंबरचा महिना सुरु झाला आहे. या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. या संक्रमणाचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार आहे. पण या सर्व संक्रमणात सर्वात मोठं संक्रमण एका राशीत होणार आहे. याचा परिणाम मिश्रित असणार आहे.
शनी ग्रह लवकरच आपलं राशी परिवर्तन करणार आहे. शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. आपल्याला माहीतच आहे की, कुंभ ही शनीची रास आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, या दरम्यान शनी आपल्या चालीत परिवर्तन करणार आहे. जून 2024 मध्ये शनीने कुंभ राशीत उलटी चाल सुरु केली होती. पण, 15 नोव्हेंबरला कुंभ राशीत सर्वात मोठं परिवर्तन पाहायला मिळणार आहे. 15 नोव्हेंबरला शनी मार्गी होणार आहे. शनीचं मार्गी होणं काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरु शकतं.
15 नोव्हेंबरला शनीचं राशी परिवर्तन
नोव्हेंबर महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. पण, नोव्हेंबर महिन्यात शनी राशी परिवर्तन नाही तर आपल्या चालीत बदल करणार आहे. न्याय आणि कर्मफळदाता शनी 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 11 मिनिटांनी आपल्या चालीत परिवर्तन करणार आहे आणि मार्गी होणार आहे.
शनी 2025 मध्ये आपल्या राशीत परिवर्तन करणार आहे. शनीचं हे राशी परिवर्तन पुढच्या चार महिन्यांनंतर होणार आहे. 15 नोव्हेंबरनंतर काही राशीच्या लोकांवा सावध राहण्याची गरज आहे.
कोणत्या राशीत होणार शनी परिवर्तन?
शनीचं परिवर्तन हे कुंभ राशीत होणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्ताचा असणार आहे. या राशीच्या लोकांना अनेक गोष्टीत लाभ मिळेल. तसेच, तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. तसच, जर तुम्हाला नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार उत्तम असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :