CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो?
Credit Score : तुमचा पॅन क्रमांक हा क्रेडिट रिपोर्टशी जोडलेला असतो. त्यामुळे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरत असाल तर आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल.
Credit Score : आपला सीबील स्कोर (CIBIL Score) म्हणजे आपली आर्थिक स्थिती नेमकी काय आहे याचा अंदाज होय. पूर्वीच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेला फाटा देत आता फक्त पॅन कार्डचा वापर करून आपला क्रेडिट स्कोर (Credit Score) तपासता येतो. सिबिल स्कोअर ही तीन अंकी संख्या आहे जी तुमची क्रेडिट काय आहे दर्शवते. हे गुण 300 ते 900 च्या दरम्यान असतात. तुमचा स्कोअर जितका जास्त असेल तितकी तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा योग्य अटींवर कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते. या स्कोअरवरून तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करू शकाल की नाही याचा अंदाज बँकाना येतो.
क्रेडिट रिपोर्टसाठी पॅन कार्ड का आवश्यक आहे?
भारतातील प्रत्येक करदात्याला 10 अंकी पॅन क्रमांक मिळतो. याद्वारे तुमचा आर्थिक डेटा लिंक केला जातो, जेणेकरून क्रेडिट ब्युरोला तुमचा क्रेडिट रिपोर्ट सहज मिळू शकेल. जेव्हा तुम्ही कर्ज किंवा क्रेडिटसाठी अर्ज करता तेव्हा ते कर्जदाराला तुमचा क्रेडिटरिपोर्ट समजण्यास मदत होते.
पॅन कार्ड बदलल्याने CIBIL स्कोअरवर परिणाम होतो का?
जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड हरवले असेल आणि डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज केला असेल तर त्याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर कोणताही परिणाम होत नाही. तुमचा मूळ पॅन क्रमांक तुमच्या क्रेडिट रिपोर्टशी जोडलेला असतो.
नवीन पॅन कार्ड बनवले तर?
जर तुम्ही दुसरे पॅन कार्ड बनवले तर ते तुमचा क्रेडिट रिपोर्ट गुंतागुंतीत होऊ शकतो. कारण प्रत्येक आर्थिक व्यवहार पॅन क्रमांकाशी जोडलेला असतो. यामुळे तुम्ही एकच पॅनकार्ड वापरावे अन्यथा अडचणी येऊ शकतात.
पॅन कार्ड वापरून CIBIL कसे तपासायचे?
या चरणांचे अनुसरण करून, तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर OTP शिवाय विनामूल्य ऑनलाइन तपासू शकता.
क्रेडिट स्कोअर तपासणी करणाऱ्या एखाद्या चांगल्या वेबसाइटला भेट द्या. तेथे तुमचा पॅन क्रमांक टाका. तुमची जन्मतारीख, फोन नंबर आणि ईमेल पत्ता याची माहिती द्या. अपडेट्स प्राप्त करण्यासाठी तुम्ही WhatsApp चा पर्याय देखील निवडू शकता. त्यानंतर Get a Free Credit Score यावर क्लिक करा आणि तुम्हाला तुमचा CIBIL स्कोर कळेल.
ही बातमी वाचा: