ABP Majha Headlines : 9 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, विरोधी पक्षनेतेपदसाठी आवश्यक असणाऱ्या जागा देखील महाविकास आघाडीला मिळाल्या नाहीत. त्यामुळं महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? अशी चर्चा सुरु आहे. याच विषयावरुन काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीनं अर्ज भरला नाही. पण त्याबदल्यात विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी या नेत्यांनी प्रस्ताव ठेवला, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरेंची मागणी देवेंद्र फडणवीस मान्य करणार का?, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. देवेंद्र फडणवीस सकारात्मक- 1999 पासून ची परंपरा होती. सत्ताधाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्षपदस्थ तर विरोधकांकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद...भाजप आणि शिवसेनेच्या काही चुकांमुळे ही परंपरा खंडित झाली होती. त्यामुळे ही परंपरा पुन्हा सुरू करावी आणि उपाध्यक्ष पद मिळावं अशी विनंती आम्ही देवेंद्र फडणवीसांसमोर केली. आमच्या या मागणीवर देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) देखील सकारात्मकता दिसली, असं भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सांगितले.