एक्स्प्लोर
Vastu Tips : 'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
Vastu Tips : हिंदू धर्मात 33 कोटी देवांना पूजनीय मानलं जातं. देवाची, ईश्वराची भक्ती करण्यासाठी मूर्तीची स्थापना करतात. पण काही देव-देवतांची मूर्ती घरातच्या देव्हाऱ्यात ठेवणं योग्य नाही.
Vastu Tips
1/7

वास्तूशास्त्रानुसार, देव्हाऱ्यात कधीही शनी देव आणि काली माताची मूर्ती ठेवू नये. वास्तूशास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं.
2/7

तसेच, काल भैरवची मूर्तीसुद्धा घरातील देव्हाऱ्यात ठेवू नये. कालभैरव देव हा भगवान शंकराचं रौद्र स्वरुप आहे.
3/7

देवी दुर्गेचं महिषासुर मर्दिनी रुप, तसेच, देवी चंडिकेचं रौद्र रुप अशा देवी-दैवतांचे फोटो कधीही घरात लावू नये असं वास्तूशास्त्रात सांगितलं आहे.
4/7

ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माते आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का घरातील देव्हाऱ्यात किंवा बाहेर कधीच यांची पूजा केली जात नाही. याचं कारण म्हणजे माता सावित्रीच्या शापामुळे ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही.
5/7

पूजेच्या खोलीत तुटलेली मूर्ती ठेवू नये, त्यामुळे वास्तूदोष होतात.
6/7

घरातील देव्हारा नेहमी ईशान्य दिशेला असावा. या दिशेने जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा असते.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 08 Dec 2024 01:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
बातम्या
बातम्या





















