Abu Muhammad al Jolani Damascus : सिरीयाचे बंडखोर अबू मोहम्मद अल - जोलनी राजधानी दमास्कसमध्ये दाखल
Abu Muhammad al Jolani Damascus : सिरीयाचे बंडखोर अबू मोहम्मद अल - जोलनी राजधानी दमास्कसमध्ये दाखल
पश्चिम आशियातील सीरियामध्ये अध्यक्ष बशर अल-असाद यांची 24 वर्षांची राजवट बंडखोरांनी उलथवून टाकली आहे. हयात तहरीर अल-शाम (HTAS) या बंडखोर संघटनेचा नेता अबू मोहम्मद अल-जोलानी याने राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्याचा दावा केला. देशातील सरकारी रेडिओ केंद्र आणि टीव्ही चॅनेल्स बंडखोरांनी ताब्यात घेतले आहेत. तर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांचा ठावठिकाणा कुणालाच लागत नसून ते देश सोडून पळून गेले आहेत. तहरीर अल-शाम संघटनेचा म्होरक्या अबू मोहम्मद अल-जोलानी याने बशर अल असाद यांच्याविरुद्ध बंड करत गृहयुद्धच पुकारलं होतं. कधी काळी अबू मोहम्मद अल-गोलानी अल कायदामध्ये कार्यरत होता. पण 2016 मध्ये त्याने अल-कायदाशी संबंध तोडले आणि स्वतःची संघटना स्थापन केली. राष्ट्राध्यक्ष देश सोडून गेले सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देश सोडून पळून गेल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. त्याची पुष्टी सीरियाच्या लष्कराने केल्याचंही रॉयटर्सने म्हटलंय. त्यामुळे आता सीरियातून बशर अल असद यांची राजवट संपुष्टात आली आहे. दरम्यान, सीरियन पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलालींनी बंडखोरांच्या हाती सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. आपण सीरियातच राहू आणि लोक निवडतील त्याच्यासोबत काम करू असं पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलाली यांनी म्हटलं आहे.