एक्स्प्लोर

Mangala Gauri 2024 : आज श्रावणातील पहिली मंगळागौर; कशी करावी स्थापना? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

Mangala Gauri 2024 Puja : श्रावण महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी मंगळागौर हा सण साजरा केला जातो. महिला मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. यंदा मंगळागौरी कधी साजरी केली जाईल जाणून घ्या तिथी आणि पूजा विधी

Shravan 2024 : श्रावण महिना हा अनेक व्रत-वैकल्यांनी भरलेला असतो. यात मंगळागौर (Mangala Gauri 2024) व्रत हे श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केलं जातं. महिला मोठ्या उत्साहाने मंगळागौर साजरी करतात.

शंकराला मिळवण्यासाठी देवी पार्वतीने अनेक व्रतं केली होती, त्यातील महत्त्वाचं व्रत म्हणजे मंगळागौरी व्रत. हे व्रत विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात, तर अविवाहित महिला चांगला नवरा मिळावा म्हणून करतात. यंदा मंगळागौरी कधी साजरी केली जाईल, तिथी आणि पूजा विधी जाणून घ्या.

पहिली मंगळागौर तिथी

हिंदू पंचागानुसार, पहिला श्रावणी सोमवार हा 5 ऑगस्टला झाला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 6 ऑगस्टला पहिली मंगळागौर साजरी केली जाईल.

संपूर्ण मंगळागौर तिथी

पहिली मंगळागौर : 6 ऑगस्ट 2024 
दुसरी मंगळागौर : 13 ऑगस्ट 2024 
तिसरी मंगळागौर : 20 ऑगस्ट 2024 
चौथी मंगळागौर : 27 ऑगस्ट 2024 
पाचवी मंगळागौर : 3 सप्टेंबर 2024 

मंगळागौर का साजरी करतात?

मंगळागौरला देवी पार्वतीची पूजा केली जाते. घरात सुख-समृद्धी यावी, चांगलं आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, नवविवाहित स्त्रियांनी मंगळागौरीचं व्रत केल्याने त्यांना सौभाग्य प्राप्त होतं. विवाहाच्या पहिली पाच वर्षे हे व्रत करावं लागतं.

मंगळागौर पूजा पद्धत

  • नवविवाहितेने सकाळी लवकर उठून लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापन करावी.
  • चौरंगावर शिवपिंड ठेवावी, त्यानंतर गणपतीचा फोटो ठेवून गणेश पूजन देखील करावं.
  • नंतर त्यासमोर कणकेच्या दिव्यांची आरास सजवावी.
  • मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवर शिव-मंगळागौरीचं आवाहन करावं.
  • देवीला विविध झाडांची पानं, फुलं वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करावी. मंगळागौरीची कहाणी वाचावी. महानैवेद्य अर्पण करावा. 16 दिव्यांनी आरती करावी. यानंतर षोडशोपचार पूजा करताना अखंड सौभाग्य प्राप्ती
  • आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्या करता देवीला 3 अर्घ्य द्यावीत.
  • मंगळागौरीसाठी महिलांना आमत्रंण द्यावे. त्यांना भोजन खाऊ घालावं, हळदी-कुंकू लावावं आणि वाण द्यावं.
  • संध्याकाळी आरती करावी. रात्रभर जागरण करावं. सुवासिनी महिला फुगड्या, झिम्मा, खेळत, गाणी गात मंगळागौर जागवतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shravan 2024 : तब्बल 71 वर्षांनंतर यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून; 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, महादेवाच्या कृपेने होणार अपार धनलाभ                

महत्त्वाच्या बातम्या

Guru Gochar 2026 : अवघ्या 12 तासांत गुरु ग्रहाचा मघा नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस, राजासारखं जीवन जगतील राशी
अवघ्या 12 तासांत गुरु ग्रहाचा मघा नक्षत्रात प्रवेश; 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस, राजासारखं जीवन जगतील राशी
Vastu Tips : तुम्हीही 'या' दिशेने देवाची आरती करताय? जाणून घ्या पूजा करण्याचे योग्य नियम, वास्तूशास्त्रात म्हटलंय...
तुम्हीही 'या' दिशेने देवाची आरती करताय? जाणून घ्या पूजा करण्याचे योग्य नियम, वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Gemini Monthly Horoscope November 2026: मिथुन राशीसाठी नोव्हेंबर महिना मेहनतीचा! 13 नोव्हेंबरनंतर कष्टाचं होणार चीज; मासिक राशीभविष्य वाचा
मिथुन राशीसाठी नोव्हेंबर महिना मेहनतीचा! 13 नोव्हेंबरनंतर कष्टाचं होणार चीज; मासिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
Maharashtra MLC Election : शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Embed widget