एक्स्प्लोर
Astrology : झूठ बोले कौआ काटे...लाख प्रयत्न करा पण 'या' राशींच्या लोकांशी खोटं बोलू नका; झटक्यात व्हाल 'चेकमेट'
Astrology : ज्योतिष शास्त्रानुसार, अशा अनेक राशी आहेत ज्या एका झटक्यात इतरांचं खोटं बोलणं पकडतात.या राशींसमोर तुम्ही लाख प्रयत्न करुनही खोटं बोलू शकत नाहीत.
Astrology
1/7

आपल्यापैकी अनेकजण अनेकदा आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी अनेकदा खोटं बोलतात. पण, असे बरेचसे लोक आहेत जे इतरांचं खोटं बोलणं एका झटक्यात पकडतात.
2/7

ज्योतिष शास्त्रात अशा अनेक राशींबद्दल सांगण्यात आलं आहे ज्या इतरांचं बोलणं लगेच पकडतात. या 4 राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
3/7

मेष रास - मेष राशीचे लोक दुसऱ्यांच्या मनातील गोष्ट अगदी सहज ओळखतात. मेष राशीच्या लोकांना माणसं पटकन ओळखता येतात. यासाठीच यांच्याशी कधीच खोटं बोलू नका.
4/7

वृश्चिक रास - वृश्चिक राशीचे लोक देखील इतरांचा चेहरा किंवा त्यांचं खोटं बोलणं लगेच ओळखतात. त्यामुळे यांच्यासमोर खोटं बोलू नका. ते झटक्यात पकडतील.
5/7

कुंभ रास - कुंभ राशीचे लोक तसे फार शांत स्वभावाचे असतात. इतरांना पारखण्याची यांच्यात चांगली क्षमता असते. त्यामुळे यांच्याशी खोटं बोलाल तर तुम्हालाच पश्चात्ताप होईल.
6/7

मीन रास - मीन राशीचे लोक हे आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार इतरांना पारखतात. तसेच, खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला हे पटकन ओळखतात. हे लोक वेळ आल्यावर तुमच्याकडून सत्य वधवूनही घेण्यात तरबेज असतात.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 08 Nov 2024 02:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























