एक्स्प्लोर

Holi 2023: यंदा होळीवर भद्राची सावली? संभ्रम दूर करा, जाणून घ्या होलिका दहनाची योग्य वेळ

Holi 2023: यंदा होलिका दहनावर भद्राची सावली आहे की नाही? महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात होलिका दहन कधी? जाणून घ्या होलिका दहनाची योग्य वेळ

Holi 2023: होलिका दहन हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. होलिका दहन हे वाईटावर चांगल्याची मात असल्याचे प्रतीक मानले जाते. दुसऱ्या दिवशी धुळवड खेळली जाते. होलिका दहनाच्या दिवशी भद्राकाल नक्कीच पाळला जातो. होलिका दहनाबद्दल शास्त्रात असे म्हटले आहे की हा सण पौर्णिमेच्या रात्री साजरा करणे सर्वोत्तम आहे. शास्त्रानुसार फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी जर भद्राचा प्रभाव असेल तर होलिका दहन करू नये, जाणून घ्या 2023 मध्ये होलिका दहन कधी आहे, या वर्षी होलिका दहनावर भद्राची सावली असणार की नाही? जाणून घ्या

 

2023 मध्ये होलिका दहन कधी?

फाल्गुन पौर्णिमा तिथी 6 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4.17 ते मंगळवार, 7 मार्च 2023 ते सायंकाळी 6.09 पर्यंत राहील. उदयतिथीनुसार होलिका दहन हा सण 6 मार्चलाच साजरा केला जाणार आहे. होलिका दहनासाठी पौर्णिमा तिथी सर्वोत्तम मानली जाते. शास्त्रानुसार होलिका दहन हे पौर्णिमेला भद्रा काळ वगळून करावे. विशेष स्थितीत भद्रा मुख आणि भद्रापुच्छ सोडून होलिका दहन करता येते. पण यासोबत प्रदोष काळात ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्याच दिवशी होलिका दहन करावे, अशीही मान्यता आहे. 

 

महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात होलिका दहन कधी?

पंजाब, महाराष्ट्र, जम्मू, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये 6 मार्च रोजी प्रदोष कालावधीत पौर्णिमा आहे. अशा परिस्थितीत या राज्यांमध्ये 6 मार्चला होलिका दहन केले जाऊ शकते. तर पूर्व भारतात, 7 मार्च रोजी प्रदोष काळात पौर्णिमा तिथी असेल. या दिवशी भद्राकाळ नसेल. म्हणूनच होलिका दहन 7 मार्चला करणे उत्तम मानले जाईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहणार नाही. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये 7 मार्चला होलिका दहन आणि 8 मार्चला रंगोत्सव साजरा केला जाईल. जिथे 7 मार्चला सूर्यास्त 6.10 मिनिटांच्या आधी होईल, तिथे 7 मार्चला होलिका दहन होईल. तसेच भद्रा काळचा मुहूर्त 6 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 4.48 पासून सुरू होईल आणि 7 मार्च 2023 रोजी पहाटे 5.14 पर्यंत राहील. 

 

होलिका दहनला आपण भद्राकाळ का पाहतो?

होळीच्या पौराणिक कथेनुसार भद्रा काळात होलिका दहन अशुभ मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार भद्राचे वर्णन अशुभ मानले गेले आहे. यामध्ये होलिका दहनाचा दोष आहे. असे मानले जाते की यमराज हा भद्राचा स्वामी असल्यामुळे या योगात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. तर, होलिका दहन हे भद्रा पूंछमध्ये केले जाऊ शकते, कारण यावेळी भद्राचा प्रभाव खूपच कमी असतो. होलिका दहनाच्या 8 दिवस आधी होलाष्टक सुरू होते, जो अशुभ काळ मानला जातो. पंचांग गणनेनुसार होलाष्टक सोमवार, 27 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 8 मार्च, बुधवारपर्यंत वैध असेल. धार्मिक मान्यतांनुसार होलाष्टकादरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Astrology : ब्रेकअपला जबाबदार असतो पत्रिकेतील 'हा' ग्रह दोष, प्रेमसंबंधात येतो दुरावा, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 19 July 2026 : आज रविवारच्या दिवशी 'या' 7 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 7 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार 'हा' मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! पॉवरफुल उभयचर राजयोगासह अनेक शुभ योग बनतायत, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! पॉवरफुल उभयचर राजयोगासह अनेक शुभ योग बनतायत, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
Horoscope Today 19 July 2026 : आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने अडचणींतून होणार सुटका, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने अडचणींतून होणार सुटका, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 19 जुलैची तारीखच ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; हातात पैसा येणार? वाचा लकी राशी
19 जुलैची तारीखच ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; हातात पैसा येणार? वाचा लकी राशी

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget