Guru Vakri 2024 : दिवाळीआधी गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचा अडचणींचा काळ होणार सुरू, नोकरी-व्यवसायात आतापासूनच थोडं सावध
Guru Vakri 2024 : गुरू ग्रह नवरात्रीत उलटी चाल चालायला सुरुवात करेल. गुरू एकदा वक्री झाला की 3 राशींचं जगणं मुश्किल होईल, त्यांना पावलोपावली अडचणींचा सामना करावा लागेल.
Guru Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, सर्व 12 राशींचा थेट संबंध हा नवग्रहांशी असतो. जेव्हा एखाद्या ग्रहाची चाल किंवा स्थिती बदलते तेव्हा त्याचा चांगला, वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. जेव्हा एखादा ग्रह उलटी चाल चालतो, तेव्हा काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आता येत्या काळात गुरू (Jupiter) ग्रह उलटी चाल चालणार आहे, ज्यामुळे 3 राशींचा अडचणींचा काळ सुरू होईल.
ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञानाचा कारक मानलं जातं. येत्या 9 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजून 1 मिनिटाने गुरू वृषभ राशीत उलट चाल चालेल, म्हणजेच तो वक्री होईल. 5 फेब्रुवारीपर्यंत गुरूचा याच अवस्थेत वृषभ राशीत मुक्काम असेल. हा काळ काही राशींसाठी अडचणींचा ठरू शकतो. या काळात तुम्ही घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी, असा सल्ला ज्योतिषींकडून दिला जातो. या राशी नेमक्या कोणत्या आहेत? जाणून घेऊया.
9 ऑक्टोबरपासून कठीण काळ होणार सुरू
तूळ रास (Libra)
गुरू ग्रह वृषभ राशीत उलट चाल चालेल तेव्हा याचा सर्वाधिक फटका तूळ राशीला बसू शकतो. या काळात तुम्हाला जवळच्याच व्यक्तीकडून धोका मिळण्याची शक्यता निर्माण होते, त्यामुळे सावध राहा. लहान-लहान गोष्टींवरून आपले इतरांशी खटके उडू शकतात. फेब्रुवारीपर्यंतच्या काळात नातेसंबंध सांभाळा, आपल्याकडून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. संयम राखा.
धनु रास (Sagittarius)
गुरू ग्रह वृषभ राशीत उलट चाल चालेल, तेव्हा याचा वाईट परिणाम धनु राशीवर होऊ शकतो. या राशीचा स्वामी ग्रहच गुरू आहे, त्यामुळे तो उलट झाल्यानंतर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात विशेषतः आरोग्याची काळजी घ्या, पोटासंबंधित व्याधी उद्भवू शकतात. नोकरी-व्यवसायात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मीन रास (Pisces)
मीन राशीचा देखील स्वामी गुरू आहे, त्यामुळे त्याच्या उलट चालीचा परिणाम मीन राशींवर देखील होईल. त्यामुळे या काळात तुम्ही काळजी घ्यायला हवी. विशेषतः तुम्ही नातेसंबंध सांभाळावे. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कोणताही निर्णय हा कुटुंबियांच्या संमतीने घेतला तर उत्तम राहील. या काळात तुमचे नोकरीत कोणाशी तरी वाद होऊ शकतात, त्यामुळे सावध राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :