Shani 2024 : शनीवर पडणार सूर्याची शुभ दृष्टी; 16 सप्टेंबरपासून 'या' राशींचे अच्छे दिन सुरू, उत्पन्नाचे अनपेक्षित स्रोत होणार खुले
Surya Shani Parivartan 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 16 सप्टेंबरला न्याय देवता शनीवर सूर्याची शुभ दृष्टी पडणार आहे. याचा शुभ परिणाम 3 राशींवर पडेल, या राशींना सोन्याचे दिवस येतील.
Shani 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी संक्रमण करतात आणि इतर ग्रहांवर शुभ दृष्टी टाकतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर तसेच देश आणि जगावर दिसून येतो. यातच आता 16 सप्टेंबरला ग्रहांचा राजा सूर्य (Sun) कन्या राशीत प्रवेश करेल आणि शनीवर (Shani) शुभ दृष्टी ठेवेल. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. या लोकांना करिअर आणि व्यवसायात चांगले परिणाम पाहायला मिळतील. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
शनीवर सूर्याची शुभ दृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचं एखादं प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतं. तसेच, तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्व कामात तुम्हाला यश मिळू लागेल. तुमच्या आयुष्य खूप आनंदी होईल. यावेळी तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती दोन्ही मिळेल. तसेच व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.
कर्क रास (Cancer)
शनीवर सूर्यदेवाची दृष्टी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. जर तुमच्यावर काही कर्ज असेल तर तुम्ही ते या कालावधीत सेटल करू शकता. तसेच, तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर बरंच काही साध्य करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या कामाचं खूप कौतुकही मिळेल. जर आपण यावेळी आर्थिक परिस्थिती पाहिली तर या कालावधीत आपल्याला चांगला आर्थिक नफा मिळेल.
मीन रास (Pisces)
शनीवर सूर्यदेवाची दृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकतं. या काळात तुमचं धैर्य आणि शौर्यही वाढेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रचंड यश मिळेल. तुमचं मन प्रसन्न आणि समाधानी राहणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही मोठं यश मिळवू शकता. तसेच गुंतवणुकीतून नफाही मिळेल. यावेळी तुम्ही देश-विदेशात फिरू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: