Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याला मीन राशीत 5 ग्रहांचा होणार 'महादुर्लभ संयोग'; 'या' राशींच्या घरात होणार धन-संपत्तीचा वर्षाव
Gudi Padwa Lucky Zodiac Signs 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला सूर्य मीन राशीत असणार आहे. अनेक शुभ योग जुळून येणार आहेत.

Gudi Padwa Lucky Zodiac Signs 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 30 मार्च रोजी गुढी पाडव्याचा (Gudi Padwa) सण साजरा केला जाणार आहे. या दिवसापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होणार आहे. तसेच, ज्योतिष शास्त्रानुसार, हा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या दिवशी गुढी पाडव्याबरोबरच सूर्य ग्रहण देखील असणार आहे. त्याचबरोबर, मीन राशीत 5 मोठे ग्रह एकत्र येणार आहेत. त्यामुळे 4 राशींच्या (Zodiac Signs) लोकांसाठी हा काळ फार शुभकारक ठरु शकतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला सूर्य मीन राशीत असणार आहे. त्याचबरोबर बुधादित्य योग, अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांसारखे अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. ग्रहांचा हा शुभ संयोग कोणत्या राशींसाठी शुभकारक असेल ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
हिंदू नववर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुम्हाला अप्रात्यक्षिक धनलाभ देखील होऊ शकतो. तसेच, तुमच्या करिअरमध्ये अनेक यशाच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. या कालावधीत तुमचं एखादं मोठं स्वप्न लवकरच पूर्ण होईल. तसेच, जे अविवाहीत आहेत त्यांचा लवकरच विवाह होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी अनेक अर्थांनी हा शुभ योग असणार आहे. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. अनेक ठिकाणी तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. त्यामुळे तुम्हाला या कालावधीत मानसिक शांती लाभेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
नवीन वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी शुभवार्ता घेऊन येणार आहे. या काळात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तसेच, पैसे गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. पैशांची बचतही कराल.
मकर रास (Capricorn Horoscope)
हिंदू नववर्ष मकर राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. कारण या राशीच्या लोकांची 29 मार्च रोजी शनीची साडेसाती संपणार आहे. त्यामुळे तुमची अनेक संकटांपासून सुटका होईल. विशेषत: व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ फार चांगला जाणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Gochar 2025 : शनीच्या राशी संक्रमणासाठी अवघे 9 दिवस बाकी; 'या' 3 राशींनी आत्तापासूनच राहावं सावध, लवकरच ओढावेल संकट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

