Shani Gochar 2025 : शनीच्या राशी संक्रमणासाठी अवघे 9 दिवस बाकी; 'या' 3 राशींनी आत्तापासूनच राहावं सावध, लवकरच ओढावेल संकट
Shani Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च रोजी शनी कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे. हा दिवस अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे.

Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 या वर्षांतील सर्वात मोठ्ठं ग्रहाचं संक्रमण मार्च महिन्याच्या शेवटी होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. 29 मार्च रोजी शनी (Shani Dev) कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे.
शनीचं राशी परिवर्तन अजीच वर्षातून एकदा होते. शनी सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. याआधी शनीचं संक्रमण जानेवारी 2023 मध्ये झालं होतं. अशा प्रकारे शनीला राशीचक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षांचा कालावधी लागतो. शनीचं राशी संक्रमण पूर्ण होण्यासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. शनीचं हे राशी संक्रमण कोणत्या राशींसाठी कठीण असणार आहे. ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती 29 मार्चपासून सुरु होणार आहे. शनीचं मीन राशीत होणारं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फार कष्टकारी ठरणार आहे. या दरम्यान मेष राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर आर्थिक संकटं देखील येऊ शकतात. त्यामुळे पदोपदी तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं राशी संक्रमण नकारात्मक प्रभाव देणारं ठरणार आहे. या दरम्यान तुम्हाला अनेक वादविवादांचा सामना करावा लागणार आहे. या काळात तुमचे मित्रांबरोबर मतभेद होऊ शकतात. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तुम्हाला धनहानीचा सामनादेखील करावा लागेल. मात्र, या काळात कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक ठरु शकतो. कारण शनीचं राशी संक्रमण मीन राशीत होणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या काळात अनेक आव्हानं तुमच्यासमोर येऊ शकतात. तसेच, या काळात तुमचा आत्मविश्वास देखील कमी होईल. त्यामुळे या काळात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला नुकसानीचा सामना करावा लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology : आज नीचभंग योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींवर देवी लक्ष्मीची राहील कृपा, धन-संपत्तीत होईल भरभराट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

